मी तुला ओळखतो

Story Info
जेव्हा तुमच्या ओळखीचा तुम्हाला gr वर भेटतो!
1.7k words
3.88
417
00
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

एक मस्त दुपार तुम्ही नुकताच तुमचा 'कार्यक्रम' आटपलेला असतो आणि मस्त जेऊन तुम्ही पाय पसरून टीव्ही पाहत असता. पूर्ण दिवस तुमच्याकडे प्लेस असते आणि संध्याकाळच्या 'कार्यक्रमासाठी' तुम्ही ग्राइंडर वर बोटे फिरवत असता. अचानक एका ब्लॅक प्रोफाइल वरून 'हाई' असा मॅसेज येतो स्थळ जवळचं आहे म्हणून तुम्ही चॅट सुरू करता आणि जसा चॅट रंगात येतो तसा समोरच माणूस मी तुला ओळखतो असा मॅसेज टाकतो.

आणि मग पुढे...

तो प्रसंग आणि ही कथा शृंगारिक नाही पण त्या परिस्थितीने नक्कीच माझा घाम काढला होता. तोच माझा हा प्रसंग इथे मांडत आहे!(आमचा चॅट मी तसाच्या तसा मराठीत भाषांतरित केला आहे. त्यामुळे कथा जर कंटाळवाणी वाटू शकते!)

टीव्ही ला पेनड्राइव्ह लावून मी मस्त पैकी टोटल धमाल पाहत होतो. खुर्चीत बसलेलो पाय टिव्हीकडे करून टेबल वर पसारले होते आणि नजर टीव्ही कडे हात वेफेर च्या वाटीत. अचानक मोबाईल कंपित झाला. मी नजर टाकली तर मोबाईल स्क्रीनवर ग्राइंडरच नोटिफिकेशन दिसलं. दुसऱ्या हाताने फोन हातात घेतला.

"मी घरी पोहोचलो" म्हणून त्याचा मॅसेज आला.

मी पण त्याला "थँक्स फॉर कमिंग आई होप यु एन्जॉय❤️" असा रिप्लाय दिला.

तेवढ्यात अजून मॅसेज आलेले ते बघत होतो त्यात 'फ्रेन्डस' म्हणून एक ब्लॅंक प्रोफाइल होती. अंतर कमी होत म्हणून मी पण उत्तर दिलं.

फ्रेन्डस:- हाई.

मी:-हाई.

फ्रेन्डस :- तू खूप क्युट दिसतोस.

मी:- धन्यवाद.

फ्रेन्डस :- यु फ्रॉम?

मी:- पनवेल.

फ्रेन्डस:- हा तुझा खरा फोटो आहे का प्रोफाइल वर?

मी:- हो!

फ्रेन्डस:- मग तुला काय काय आवडत?

(मी त्याला माझ्या आवडी निवडी सांगितल्या)

मी:- तुला काय आवडत?

फ्रेन्डस :- सेम जे तुला.

मी:- ओके.

फ्रेन्डस :- आत्ता काय करतोयस तू?

मी:- टीव्ही पाहतोय.

फ्रेन्डस :- फ्री आहेस का?

मी:- नाही.

(खरं तर मी एकटाच होतो घरी पण मला कोणाला भेटायची इच्छा नव्हती म्हणून मी थाप मारली).

फ्रेन्डस:- ओह☹️☹️!

मी:- काय झालं?

फ्रेन्डस :- तू फ्री नाहीस ना.

मी:- हा.

फ्रेन्डस :- मला वाटलं आपण भेटू शकतो.

मी:- सॉरी डिअर.

फ्रेन्डस:- 💔💔

मी:- 😬

फ्रेन्डस :- हा😟

फ्रेन्डस :- मी फक्त नॉर्मल भेटी साठी पाहत होतो.

मी:- हा पण मी आता फ्री नाही ना!

(पोट भरून जेवलो होतो म्हणून आळस चढला होता मला.)

फ्रेन्डस :- ओह. मी तुझे अजून फोटो पाहू शकतो का?

मी:- सॉरी डिअर.

फ्रेन्डस :- का?

मी:- प्रोफाइल वर आहे ना माझा फोटो.

फ्रेन्डस :- मग काय झालं? मी अजून एक नाही का मागू शकत? प्लिज.अभिषेक!

(मी दचकलो माझं नाव पाहून. साधारणपणे मी ग्राइंडर 'अभि' एवढंच नाव सांगतो. पण ह्याला तर पूर्ण नाव माहीत आहे.)

मी :- पण मग तुझा फोटो पाठव

फ्रेन्डस :- तू अभिषेक आहेस ना?

मी:- माहीत नाही.

(मी त्याला टाळण्यासाठी म्हणलो)

फ्रेन्डस:- मला माहित आहे तू मी पाहिलं आहे तुला कॉलेज मध्ये.

फ्रेन्डस:- आणि बस मध्ये पण.

मी:- कोणतं कॉलेज. खरंच?

फ्रेन्डस:- तेच कॉलेज जे हायवेवर आहे.लोणावळा जवळ.

मी:- आणि तू?

फ्रेन्डस:- टोल नाक्याजवळ आहे तुझं कॉलेज

मी:- हा हा हा.

मी:- मी पाहू शकतो का तुला?

फ्रेन्डस:- हसतोयस का?

मी:- हसत नाही मी

3 वेळा हा बोलो रे😂

(खरं तर मी घाबरलेलो पण मला हे त्याला दाखवून नव्हतं द्यायच).

फ्रेन्डस:- अभिषेक!

मी:- ओह डिअर.तू मला अस्वस्थ करत आहेस आता.

फ्रेन्डस:- दुसऱ्या वर्षाचा विध्यार्थी, रोल नंबर 18,नेहमी दुसऱ्या बाकावर बसणार...एक केटी आहे तुला

बरोबर?

(त्याला माझ्या बद्दल सगळं माहीत होत. माझी भीती वाढत चालली होती)

मी:- हा

फ्रेन्डस:- मला ब्लॉक नको करुस.

मी:- एवढा सगळं माहीत आहे माझ्याबद्दल तुला?

फ्रेन्डस:- बरोबर आहे की नाही

मी:- ओएमजी.

फ्रेन्डस:- हा.वर्ग मित्र आहे तुझा.

(आता मात्र माझी चांगलीच टरकली. टेबल वरचे पाय मी पटकन खाली घेतले)

मी:-कोण?

फ्रेन्डस:- एवढं तर माहीतच असणार मला तुझ्याबद्दल.

मी:- नाही! मी तुला ओळखत नाही आणि नाही तुझ्याबद्दल मला काही माहीत आहे.

फ्रेन्डस:- मी ओळखतो तुला...खूप चांगलं.

उद्या भेटूच कॉलेज ला.

मी:- ओह डिअर.

फ्रेन्डस:- समोरा समोर.

मी:- सॉरी उद्या सुट्टी आहे.

फ्रेन्डस:- हा तर सोमवारी ये. कॉलेज काही पळून जात नाही

मी:- हा ते तर यावच लागेल😅

फ्रेन्डस:- आणि आपण पण कुठे पळून जाणार आहोत

मी:- माहीत नाही

फ्रेन्डस:- हॉस्टेल मध्ये जाऊ?

मी:- इथे खूप विचित्र लोक आहेत.

नाही (मी हॉस्टेल मध्ये जाण्यास नकार दिला).

फ्रेन्डस:- मग कुठे?

मी:- तुझी इच्छा असेल तर आपण भेटू आत्ता.

फ्रेन्डस:- आत्ता?

मी:- हो!

(माझ्या कडे पर्याय नव्हता. विचार केला ह्याला घरी बोलवून बोलावं उगाच वर्गात काही नको पसरायला.)

फ्रेन्डस:- आपण सोमवारी भेटू सरळ.माझ्या बाकीच्या मित्रांना पण कळू दे.

मी:- मी अस अनोळखी लोकांना नाही भेटू शकत... अस करू नकोस.

फ्रेन्डस:- का?

मी:- 😓

(माझे हातथरथरत होते मला पंखा चालू असून सुद्धा घाम सुटला होता)

फ्रेन्डस:- माझे बाकीचे मित्र पण ग्राइंडर वापरतात.

मी:- पण मला हे नाही आवडत.

फ्रेन्डस:- आणि त्यातले काही तर पूर्ण टॉप आहेत.

मी:- मी या सगळ्यात एवढा नाही पडत.

फ्रेन्डस:- पण तू तर प्रोफाइल वर बॉटम आहेस अस लिहलं आहेस ना?मग काय अडचण?

मी:- हो. मला ही गोष्ट सगळ्यांना नाही माहीत होऊन द्यायची

फ्रेन्डस:- पण मला तू हवा आहेस.माझा प्रियकर म्हणून

फ्रेन्डस:- 😍😍

मी:- खरंच😧

(या वेळी मात्र मी रिलॅक्स झालो. पण मला नक्की कळत नव्हत की आमच्या वर्गात असा पण एक बावळट आहे जो मला पसंद करेल?)

फ्रेन्डस:- आपण कॉलेजमध्ये एकत्र वेळ घालवू शकतो तसच अजून दुसऱ्या ठिकाणी पण!

मी:- जर तू खरंच मला ओळ्खतोस तर तुला माहीत आहे मी वर्गात कसा आहे ते.

फ्रेन्डस:- हो

फ्रेन्डस:- तुला रेलशनशिप नकोय का?

हो मला माहित आहे. तू वर्गात शांत असतोस. मार्यदित मित्र असलेला तेही फक्त प्रवासात सोबत असावी म्हणून.कोणत्याही इव्हेंट मध्ये सहभाग न घेणार

मला कळत नाही तू आमच्यात मिक्स का नाही होत?

मी:- हे बघ मला बरं नाही वाटत. अचानक कोणी तरी मला बोलतो मी ओळखतो तुला आणि ही गोष्ट मला अजून अस्वस्थ वाटतंय. आणि मी या अगोदर हा त्रास झेललाय.

फ्रेन्डस:- अरे काळजी नको करुस.आपल्यात हा झालेला संवाद कोणालाच कळणार नाही.मी काही वाईट मुलगा नाही. विश्वास ठेव माझ्यावर.

मी:- मी असा कसा शांत होऊ?

फ्रेन्डस:-अरे मी पण हे अँप वापरतो.

मी:- मी नाही ओळखत तुला😥.

फ्रेन्डस:- तू ओळ्खतोस.

मी:- आणि ह्या अँप वर खुप विचित्र माणसं आहेत.

फ्रेन्डस:- तू मला माझ्या फोटो साठी विचारलं नाही. एवढा चॅट होऊन सुद्धा?

मी:- मी विचारलेला! चॅटमध्ये वर जाऊन बघ.

(मी त्याला फोटो मागितला होता पण मॅसेज एवढ्या फास्ट येत होते की त्याने पाहिलं नसावं.)

फ्रेन्डस:- हा.पण तू एका अनोळखी माणसाबरोबर एवढं कस बोलू शकतोस तेही त्याच्या फोटो न बघता? तेच तू वर्गात शांत बसतोस?मला कळत नाही हे

मी:- मला पण नाही कळत

(आणि खरंच मला पण नाही कळालं)

फ्रेन्डस:- आता?

मी:- मी घाबरलोय खूप

फ्रेन्डस:- आता तरी मला फोटो पाठव म्हणून सांगणार आहेस की नाही?

मी:- मला नाही पाहायचा आता.

फ्रेन्डस:- बघ अरे तुला बरं वाटलं

मी:- आणि नाही वाटलं तर?

फ्रेन्डस :- मला पाहिल्या नंतर तुला नक्कीच आराम वाटेल.

मी:- मी थरथरतोय.

(खरंच माझे हात थरथरत होते. तेव्हा मोबाइल स्क्रीनवर एक फोटो आला.नेट हळू चालत होत. हळू हळू तो लोड होत होता फोटो. शेवटी पूर्ण फोटो लोड झाला. आणि खरंच मी ओळखत होतो त्याला. माझा मित्र होता तो. खूप चांगला मित्रा पण वर्गातला नाही ग्राइंडरवरचाच!)

मी:- माकड😡😡😡😡😡😡😡😡😡

फ्रेन्डस:- सॉरी बाबू

मी:- मी जीव दिला असता

😡😡😡😡😡😡😡

मी:- किती घाबरलो मी

फ्रेन्डस:- सॉरी

मी:- हे अजिबात गमतीदार नव्हतं हा!

फ्रेन्डस:- खरंच सॉरी.मला नव्हतं वाटलं की तू एवढा घाबरशील.खूप जास्तच झालं ना!

सॉरी यार प्लिज प्लिज प्लिज...

मला खरंच नव्हतं वाटलं असं की तू एवढा घाबरशील

प्लिज अभि सॉरी

मी:- जाऊदे. ईट्स ओके

फ्रेन्डस:- खरंच एक्सट्रीमली सॉरी.मी मस्ती करायचा म्हणून केलं

मी:- मी समजू शकतो

फ्रेन्डस:- रीअली सॉरी

मी:- बास अरे त्यात काय एवढं

फ्रेन्डस:- नाही तरी पण

मी:- जाऊदे

फ्रेन्डस:- तू खूप टेन्शन मध्ये असशील ना चॅट करताना

मी:- खूप:

फ्रेन्डस:- मी एवढा नाही करायला पाहिजे होता.

मी:- सगळा टोटल धमाल टेन्शन मध्ये पाहिला😂😂😂😂

फ्रेन्डस:- सॉरी😔😔

मी:- अजून किती सॉरी येणार आहेत.

फ्रेन्डस:- जो पर्यंत तू नॉर्मल नाही होत.

मी:- झालो नॉर्मल.

फ्रेन्डस:- परत नाही करणार असं.

मी:- हा प्लिज😄

फ्रेन्डस:- आणि तू पण इतका वेळ कसा चॅट केलास एक फोटो पण न बघता. एकतर तू असा भोळा.

फ्रेन्डस मी:- 😢

मी:- हो ना खरंच.

फ्रेन्डस:- पण थँक्स हा.

मी:- का बरं?

फ्रेन्डस:- मला अंदाज तरी आला अस जर खरं झाला तर काय करायचं.

फ्रेन्डस:- 😱

फ्रेन्डस:- असा जर खरंच एखादा असतात तर. जरा जपून रे. अशा वेळी तू झोपणार पण नाही खूप टेन्शन घेशील.

मी:- हा ना.

फ्रेन्डस:- त्यापेक्षा बी सेफ!

मी:- नाही तर कायमचा झोपेन😂😂😂😂

फ्रेन्डस:- ये येड्या. असा काही बोलू नकोस.😡

मी:- तू काय करतोयस?

फ्रेन्डस:- बसलोय असाच म्हणून तर हा असा शैतांनी विचार आला ना!

😂😂😂😂😂😂😂

आमचा चॅट संपला. फोन वर बोलणं झालं. मी खूप रागवलो होतो त्याच्यावर. अगदी जीव द्यायचा विचार पण मनात येऊन गेला. पण शांत झाल्यावर कळलं की शेण,दगड,माती सगळं काही आपण खाल्लं आहे. मी फोन करून त्याला परत सॉरी बोलो.

तुषार नाव आहे त्याच. अजून ही माझा खूप चांगला मित्र आहे तो. मी नेहमी स्वतःचा फोटो ठेवतो ग्राइंडर प्रोफाइल वर तीच खोड मोडण्यासाठी त्याने हे सगळं केलं. ग्राइंडरवर आमची ओळख झाली. तो स्ट्रेट होता अजून ही आहे. रेलशन मध्ये पण आहे

पण फक्त मित्र शोधायला ते अँप वापरत होता तो. आणि थोडी फार मजा मस्ती. त्यात तो एक दोन जणांना देखील भेटला. आम्ही पण भेटलो. रात्री शतपावली करायला जाताना मी बोलावलं त्याला. फोटोत दिसतो त्या पेक्षा उंच होता. अंगाने शिडशिडीत होता आणि माझ्या सारखाच चशमिश. आम्ही आमच्या एरिया मधेच फिरलो. दोघांनी आप आपले अनुभव सांगितले. रात्री चे अकरा वाजता आले म्हणून मी परत निघालो. पहिल्या भेटीत आम्ही फोन नंबर नाही शेअर केले. खरं तर त्याने विचारलं मला पण मीच बोलो की इतक्यात नको फोन नंबर.

अशा नॉर्मल भेटी खूप होतात. पण त्या भेटी 'प्लेस असेल तेव्हा कळवतो, भेटू तेव्हा!' अशा वाक्याने शेवट व्हायच्या. पण ही भेट वेगळी होती. आम्ही जवळच राहत होतो सो परत दुसऱ्या दिवशी भेटलो आणि नंबर ही घेतले एकमेकांचे. मग काय दिवसाआड भेटी होत होत्या. कधी खाण्यासाठी तर कधी असच फिरायला गप्पा मारायला. ओळख वाढली चॅट वाढला. व्हॅटसअँप वर डीपी बदलला की त्यावर लगेच एकमेकांना रिप्लाय देणं,काय खातो ते लगेच फोटो पाठवणं,मॅसेज नाही केला तर रुसवे फुगवे समजुत काढणे असं खूप काही सुरू झालं. त्यात आम्ही सगळं एकमेकांना सांगू लागलो. म्हणून तर त्याला एवढं सगळं माहीत होतं की माझा रोल नंबर काय मला केटी कोणती कॉलेज ची बस केव्हा कुठे येते जाते आणि अजून बरंच काही. माझ्या काळजीपोटी त्याने हे सगळं केलं. आणि खरंच मला ही माझी चूक कळाली. कधी वाटलं नव्हतं ह्या आशा अँप वर असा मित्र भेटेल. लोक तर भेटतात आणि मैत्री पण होते पण जास्त करून रंग-रूप पाहून शाररीक संबंध झाले की. पण आमच्यात अस काही नाही झालं. झाली ती फक्त नितळ मैत्री.आम्ही शरीराने अजून जवळ आलो नाहीत परत जवळ येऊ की नाही ते माहीत नाही पण मनाने नक्कीच जवळ आलो आहोत.

आज जेव्हा ही गोष्ट लिहायला घेतली तेव्हा "अगोदर तुझं नाव वापरायची परवानगी दे तुझ्या साठी सरप्राईज आहे" अस सांगितलं. त्याला मी हे अस काहीबाही लिहतो ते माहीत नाही पण आज कळेल त्याला ते आणि मला आशा आहे त्याला हे नक्कीच आवडेल.

समुद्रकिनारी फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे,आकाराचे,नक्षीचे दगड किंवा शिंपले सापडतात. आपण त्या गोष्टी मिळाव्यात म्हणून शोधत नसतो. त्या नकळतपणे आपल्याला दिसतात आणि आपण त्या जमा करतो. त्या शिंपल्यात मोती नसला तरी पण ती आपण आपल्याजवळ ठेवतो.

जसा मला माझा मित्र तुषार भेटला तसे तुम्हाला ही असेच काही मित्रा मिळाले असतील. कंमेंटमध्ये नक्की सांगा!

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

आशुची कलाकारी: टाकाऊ पासून टिकाऊ आशुची कलाकारी:- टाकाऊ पासून टिकाऊin Gay Male
किशोर आणि नरेश जेव्हा दोन भाऊ खूप वर्षा नंतर भेटतात.in Gay Male
Me and Rajan ही माझी आणि कोल्हापूरच्या राजनची गे सेक्स स्टोरी आहे.in Gay Male
पावसाळ्यातील वसंत पावसाळ्यात दोन कामुक शरीरांनी वसंत कसा फुलवला वाचा या कथेत!in Gay Male
लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
More Stories