लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 09

Story Info
मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग९'.
1.8k words
5
254
00

Part 9 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 04/28/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

घाईगडबडीत पवन घरी आला. दरवाजा उघडताच त्याची बुबळ विस्फारली. दिवाणखान्यात चारही बाजूला अंधार आणि फक्त अंधारच होता त्याच्यामुळे विस्फारून अंधारात काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता त्याने समोर पाहिलं तर सुबोध खोलीबाहेर बसलेला. काहीही हालचाल न करता एका बाजूला मान टाकून तो व्हीलचेअर बसल्याचं त्याला जाणवले. दबक्या पावलांनी पवन हळूहळू अंधाराचा अंधारात तोल सावरत पुढे गेला. पण त्याला अचानक त्याच्या पाठी एक खुसपट आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी आपल्या पाठी असल्याची जाणीव त्याच्या शरीराने त्याला दिली. त्याच्या मानेवरचे केस ताठ उभे राहिले.

समोर असलेल्या सुबोध कडे लक्ष ठेवून "आपण आपल्या घरात एकटे नाही आहोत" हा विचार त्याच्या मनात चमकला. काही कृती करणार त्याच्या अगोदरच त्याच्या पायावर,घोट्याजवळ एक जोरदार वार झाला. जोरात ओरडून तो तसाच खाली पडला आणि नेमक त्याच डोकं सोफ्याच्या दांड्यावर आदळल.

त्याच्या कपाळावर खोप पडली आणि चेहऱ्यावरून रक्त वाहू लागले. त्याला जेवढे काही अंधारात दिसत होतं ते सुद्धा दिसण आता बंद झालं, तरी देखील हात हालवत तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हाताला कसलीतरी वस्तू लागली. त्याचा हात सोफ्या खाली गेला होता. पीठाने माखलेल्या त्याचा हाताला धाग्याने बांधले लिंबू आणि एक पिशवी लागली. ती पिशवी बाजूला सारण्याच्या नादात पिशवीतील समान बाहेर पडले. त्यात पवनच महागडं घड्याळ होतं, सुबोधच्या काही वस्तू आणि अझलानचा मोबाईल फोन होता.

पवन ने तो फोन खोलण्याचा प्रयत्न केला पण पासवर्ड बरोबर येत नव्हता. मोबाईलच्या त्या लॉक स्क्रिन च्या प्रकाशात तो पुढे सरकला आणि उघड्या डोळ्याने समोरून एक हलणारी सावली त्याला दिसू लागली. अचानक व्हीलचेअर हलु लागली आणि त्यावर असलेला देह सुटण्यासाठी धडपड करू लागला. त्या सावलीने व्हीलचेअरला मागून पकडलं तसा पवनच्या कानावर एक आवाज आदळला. सुबोधचा आवाज,

"घरात कोणी आहे का? पवन,पवन कुठे आहेस तू? वाचव मला कुठे आहेस?"

पवनने मोबाईल तिथेच सोडला आणि एका हाताने आपली जखम दाबत, गुडघे जमिनीला घासत घासत आणि वर सरकवत उठण्याचा प्रयत्न करू लागला. जरा पाय हालवतात त्याला त्याच्या पायावर झालेल्या वाराची जखम ठनकत. तो डोळे फाडून अंधारात पाहण्याचा प्रयत्न करू लागला.

ती सावली आता पुढे व्हीलचेअर सरकवत घेऊन चालली होती. ती जंगलाच्या दिशेने चालली होती. आपली सगळी शक्ती एकवटून सरपटत कसाबसा पवन दरवाजाजवळ गेला. नेहमीप्रमाणे धुक्यात बुडालेल ते जंगल खूपच भेसूर वाटत होतं उंच उंच वाढलेला झाडातून त्यांच्या फांद्या आता हे ढगाळ वातावरण भेदतील की काय असं वाटत होतं. अंधार होता.

व्हीलचेअर सरकवत जंगलाच्या दिशेने ती सावली आत जंगलात चालत होती. ते पाहून दरवाजाच्या चौकटीचा आधार घेऊन पवन उभा राहिला आणि चालू लागला. पण मध्ये एक नजर त्याने आपल्या पायाकडे टाकली त्याचा घोटा फुटला होता. त्याला रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हत म्हणून तो अडखळत रांगत तो त्या सावलीचा पाठलाग करू लागला. झाडाच्या वाळलेल्या काटका त्याच्या तळव्यात घुसत होत्या.

काट्या-कुट्या त्याच्या गुडघ्याला टोचत होत्या. पवन लवकरात लवकर त्या सावली जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. अचानकपणे तो थांबला. कारण त्या सावलीने व्हाईलचेअर वर असलेल्या माणसाला खाली पाडल. तडफडत तो देह खाली पडला आणि पुढे काय होतं जे काही घडणार होता त्या अगोदर पवन जोरात ओरडला. पण तो आवाज तिथेच दबून राहिला. त्या सावलीने एक तीक्ष्ण,लांब,टोकदार, अणकुचीदार वस्तूने खाली असलेल्या देहावर वार करायला सुरुवात केली.

रात्रीच्या काळोखातून एक अगदी क्षीणसर आवाज पवनच्या कानावर आला होता. सुबोधचा आवाज. तो किंचाळला होता. त्या किंचाळीत प्राणभय होते. क्षणमात्र पवन होता तिथेच हबकून उभा राहिला आणि तो आवाज पुन्हा आला. काळोख्या रात्रीच्या वाऱ्यावर तरंगत आलेली सुबोधची किंचाळी पवनसाठी रक्त गोठविणारी होती .

न जाणे किती वेळा पोटावर कधी छातीवर ती सावली त्या तीक्ष्ण,लांब,टोकदार,अणकुचीदार वस्तू भोकसत राहिली. नंतर ती आकृती त्या देहाच्या पायाला पकडून सरकवण्याचा प्रयत्न केला. पवन आता सावलीच्या खूपच जवळ आला होता. एका छोट्याशा खड्ड्यात त्या सावलीने तो देह ढकलून दिला आणि ती आत पळत सुटली. पवन देखील जोरात तिचा पाठलाग करत होता. शेवटी तो त्या सावलीच्या जवळ आला आणि त्याला हे कळून चुकलं होतं, की हा मानव निर्मित प्रकार आहे. त्या सावलीच्या खरा चेहरा आता लवकरच पवनसमोर येणार होता.

बाजूला असलेल्या झाडीतुन ,खाचखळग्यातून , वाळक्या पानाकाटक्यातून पवन एकदाही न थांबता,न अडखळता पळत होता. त्याचा आवाजाच्या दिशेचा अंदाज अचूक होता.

समोर एक वठलेलं झाड होतं. पवन विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर पाहत होता. झाडाला एक हात टेकून ती काळी सावली उभी होती. नाही आता ती सावली नाही. एक व्यक्ती आहे. सावलीच रूप घेऊन हे सगळं कटकारस्थान करत होती. आपला जखमी घोटा सरकवत पवन ने त्या सावलीला मागून करकचून मिठी मारली.

आपले दोन्ही हात त्या व्यक्तीच्या दोन्ही हात,छाती आणि पोटाभोवती गुंडाळले. तस ती व्यक्ती तडफडू लागली. आपलं खरं रूप समोर येईल या भीतीने पवनच्या गुडघ्यावर जोर जोरात लाथा मारू लागली. कधी डावीकडे कधी उजवीकडे झिडकारून त्या सावलीने पवनला पाठी पाडण्याचा प्रयत्न केला, पण पवने मिठी घट्ट केली.

त्या व्यक्तीला दुसरा काही पर्याय दिसला नाही. आपल्या हातातील धारदार शस्त्र तिने घट्ट पकडलं. त्या वक्तीने आपला हात कोपऱ्यात उचलला आणि पाठी असलेल्या पवनच्या पोटात आपले हत्यार घुसवले. एक दोन वेळा पवनच पोट फाडत आतड्यामध्येत घुसळत ती टोकदार वस्तू पवनच्या पोटात शिरली तसा पवन पाठी सरला. थरथरत पुढे पोटावर पडला. त्या व्यक्तीने पाठी वळूनही न पाहता पळून जाण्याचा प्रयत्न पण केला पवन आपल्या हातांनी त्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. तो व्यक्ती जोरजोरात पवनच्या तोंडावरती लाथा मारू लागला.

"तू सुबोधला मारलं मी सोडणार नाही तुला" पवन ओरडू लागला. त्या व्यक्तीने लाथा मारणं बंद केल आणि एक हिसका देऊन आपला पाय सरकवला आणि सरपटत अंधारात ती व्यक्ती सटकली.

पोटातील जखम सावरत पवन उठला. त्याला त्याच्या जखमांच्या विसर पडला होता. राग, दुःख, हतबलता त्याच्या सगळ्या भावना उंचावून आल्या होत्या. काहीही झालं तरी ती व्यक्ती कोण आहे हे माहित केल्याशिवाय तो शांत बसणार नव्हता.

एका हाताने आपल्या पोटावरची जखम घट्ट पकडत लंगडत लंगडत पवन त्या व्यक्तीच्या दिशेने जाऊ लागला. अचानक त्याला पालापाचोळा चुरडल्याचा आवाज ऐकू आला. तो थांबला. नक्कीच ती व्यक्ती असणार या आशेने त्याने येणार आवाजाच्या दिशेने पाऊल उचलले. त्याचा अंदाज बरोबर निघाला एक व्यक्ती झाडाला धरून उभ राहण्याचा प्रयत्न करत होती.

एक तीक्ष्ण,लांब,टोकदार,अणकुचीदार लाकूड त्या व्यक्तीच्या बाजूला खाली पडलं होतं. हाच तो पवन मनातल्यामनात म्हणाला. आपली सगळी शक्ती एकटवून सुबोधच्या किंकाळ्या मनात आठवून त्याने एका हाताने ते लाकूड उचललं आणि दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीच्या दंडाला हात धरून तिला मागे फिरवल. क्षणाचा ही विलंब न करता आपल्या दुसऱ्या हाताने ते लाकूड तिच्या गळ्यात घुसवल. एक विचित्र चित्कार त्याच्या कानावर पडला. रक्ताची एक पिचकारी पवन च्या तोंडावर उडाली. ती व्यक्ती तडफडू लागली.

कसबस आपल्या गळ्यातून ते टोकदार लाकूड त्या व्यक्तीने बाहेर काढलं आणि स्वतःच अंग खाली झोकून दिल. तिथेच निपचित पडून राहिली. पवन पुढे आला. रक्ताने भरलेला चेहरा हात फिरवून साफ केला आणि त्या व्यक्ती कडे पाहू लागला. त्याच्या समोर टीन्या पडला. होता त्याचा गळा पूर्णपणे फाटला होता आणि डोळे सताड उघडे आकाशाकडे पहात होते. एवढे पाहून पवनला भोवळ आली आणि त्याने आपलं डोकं तसेच जमीन निश्चिंतपणे ठेवून दिलं. त्याचे अर्धवट श्वास चालू होते.

इकडे पवन आपल्या घरी येऊन गेल्याची बातमी रघुला कळाली होती त्याला अंदाज आला नक्कीच काहीतरी बरं-वाईट झाल असणार, म्हणून तो केव्हाच पवनच्या घराकडे येण्यासाठी निघाला होता. सोबत काही गावकरी देखील आले होते. घराजवळ जाताच त्यांना कळालं घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे अंधार आहे. सोबतीला आणलेल्या विजेरीच्या प्रकाशात दिवाणखान्यात शिरले घरातलं सामान अस्ताव्यस्त होतं. रघुने आपल्या विजेरीचा प्रकाश दिवाणखान्यात फिरवला.

त्या प्रकाशात त्याने पाहिलं की अंगभर जखमा आणि फाटके कपडे घेऊन सुबोध रांगत घराबाहेर येऊ पाहत आहे. सगळे गावकरी पुढे सरसावले "कोणीतरी पाणी आणारे" रघु ओरडला पण सुबोध हातवारे करून जंगलात जाण्याचा इशारा करत होता. दोन गावकरी त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेले आणि बाकीचे आत जंगलात सुबोधने कसेबसे इशारे करत आपल्या खोलीतील डॉक्टर नेगीचे कार्ड गावकऱ्यांना दाखवून बोलण्याची विनंती केली आणि डोळे मिटून सुबोध बेडवर शांत झाला.

काही दिवस, काही महिने, काही रात्री चालली विचित्र घटनांची मालिका आता थांबली होती काल रात्रभर चाललेला अभद्र आणि रक्ताचा सडा पाडणारा प्रकार देखील शांत झाला होता.

गावकर्यांनी पवनच्या घराबाहेर तीन प्रेतं ठेवली होती. डॉक्टर नेगी आणि त्याच्या बाजूला उभे असलेले इन्स्पेक्टर हताश पणे त्या प्रेताकडे पाहत होते. पवन,टिन्या आणि अझलान विचित्र प्रकारे आणि खूप सार्या जखमांसोबत जंगलात गावकऱ्यांना सापडले. मृत.

टिण्या आणि पवनला अग्नी देण्यात आला. आणि अझलानला दफनभूमीत दफन करण्यात आले. यादरम्यान सुबोध बेशुद्ध होता चार-एक दिवसानंतर तो शुद्धीत आला. अंगावरच्या जखमा बऱ्यापैकी भरल्या होत्या. तो अजून त्याच घरात स्वतःच्या खोलीत होता डॉक्टर नेगी त्याच्या बाजूला चेहरा पाडून बसले होते. कसबसं उठत सुबोधने त्याच्याकडे पाहिल. काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज त्याला आला ओठ खेळवत त्याने डॉक्टरांना विचारलं,

"पवन कुठे आहे?"

डॉक्टर अडखळत म्हणाले "आपण याविषयी नंतर बोलु तू सध्या आराम कर."

सुबोध मोठ्या आवाजात परत तेच वाक्य म्हणाला,

"पवन कुठे आहे?"

त्याच्या लाल डोळ्यातून अश्रूंची धार टपकत होती, हाताच्या घट्ट केलेल्या मुठ्या पाहून डॉक्टरांना त्याला सांगणं भाग पडलं, "पवन आता या जगात नाही."

ते ऐकताच सुबोधने एक जोरात हंबरडा फोडला. त्याने आपल्या आजूबाजूलाच सामान दोन्ही हाताने फेकून दिलं. उशा फाडून फेकून जोरजोरात ओरडू लागला "नाही नाही असं नाही होऊ शकत" तो जोरात भिंतीवर डोकं आपटायला जाणार तेवढ्यात डॉक्टर नेगीने त्याला पकडले आणि त्याला शांत करू लागले.

"हे बघ आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते आमच्या हातात नव्हतं, इस्पितळात जाण्या अगोदरच त्याचा आणि अझलानचा मृत्यू झाला.मी खरच तुझी माफी मागतो. पण तू काळजी करू नकोस त्या दोघांनाही निर्दयपणे मारणारा स्वतादेखील विचित्र प्रकारे मेला आणि या कामात त्यांना साथ देणाऱ्याला माणसाला अटक देखील केली आहे."

सुबोध गोंधळला डॉक्टर काय बोलतायत त्याला कळेना. "म्हणजे?"

"तू अजून बरा नाही झालास म्हणून मी म्हणालो की या विषयी आपण आता नको बोलायला."

"नाही! नाही हे जे काही प्रकरण आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळायला हव." सुबोध हट्ट करून डॉक्टरांना म्हणाला.

डॉक्टर म्हणाले, "गावकऱ्यांचा कॉल आल्यानंतर मी इथे आलो. तू बेशुद्ध अवस्थेत होतास. गावकऱ्यांनी मला पूर्वकल्पना दिल्यामुळे मी ॲम्बुलन्स आणि माझे काही साथीदार घेऊन आलो. जेव्हा जंगलात तिघांच्या देखील डेडबॉडीज मिळाल्या तेव्हा मी घरात तपास केला. घराची झडती घेतल्यानंतर तुमच्या घरातला नोकर, म्हणजे टिण्याच्या खोलीमध्ये मला अझलानच सगळं सामान सापडल. पासपोर्टमुळे मला ओळख पटली."

"त्या सामानाबरोबर तुझ्या आणि पवनच्या काही वस्तू आणि काही रोख रक्कम देखील त्याच्या खोलीत सापडली. तसेच त्याच्या खोली जादूटोणा करण्याचं सामान आणि दिवाणखान्यात असेच जादूटोण्याचे सामान सापडलं होत. असं काही करून टिन्या तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, असा माझा अंदाज आहे. आणि जेव्हा त्याच पितळ उघड पडायला आल्यानंतर त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने तुझ्यावर हल्ला केला तेव्हा पवन तुला वाचवायला आला. त्याच झटापटीत पवन आणि त्याचा मृत्यू झाला."

"हो मी एकटाच होतो घरात आणि अचानक सगळे दिवे विझले. पण अझलानचं प्रेत जंगलात कसं सापडलं? तो इथे नव्हता." सुबोधने विचारलं.

"खरंतर टिन्याने सर्वात पहिला त्याच्यावर हल्ला केला. अझलानवर सर्वात पहिला हल्ला करून त्याच सगळं सामान आपल्या खोलीत लपवून ठेवल आणि अझलानला देखील कुठेतरी गायब केलं. जंगलातच त्याला जखमी करून ठेवलं असावं. अचानक अझलान गायब झाला असा संशय येऊ नये म्हणून तो पवनला मेसेज करत राहिला. त्याच्याकडे अझलानचा मोबाईल सापडला आहे."

"म्हणून टिण्या आणि अझलान त्या सकाळी मला दिसले नव्हते." सुबोध बडबडला. "त्याचा साथीदार कोण?"

"रघु! टीण्याची अशी अवस्था बघून रघुने हंबरडा फोडला होता. त्याला सोडाव अशी विनंती तो पोलिसांना करत होता. त्याला संशयीत म्हणून पोलीस घेऊन चालले होते. पण तो 'मी निर्दोष आहे मी काहीही केलं नाही तिने नही काही केलं नाही तुम्ही नीट तपास करा ती दोन पत्र तिथेच त्याच घरात असतील' असं काहीबाही बडबडत होता."

सुबोध शांत बसला होता. "हे सगळं खरं नाही असू शकत." तो म्हणाला.

"हे बघ स्वतःला त्रास नको करून घेऊ! माझ्या मित्राचा मुलगा आहेस. तू मला माझ्या मुला सारखा आहेस! मी नेहमी तुझ्या मदतीला असेन. काही दिवसातच आता तुझ्या आई-बाबांना जाऊन एक वर्ष होईल. त्यात पवन पण वारला. तू इथे नको राहुस माझ्याबरोबर माझ्या घरी चल! तिथे तुला काही ही कमी पडणार नाही."

"नाही मी इथेच राहणार आहे." सुबोध संथपणे म्हणाला."पवनच घर आहे हे आणि मी ते सोडून जाणार नाही."

"पण एवढ्या मोठ्या घरात तू एकटा कसा राहणार." डॉक्टरांनी विचारले.

"मला काही वेळ राहू द्या इथे" सुबोध म्हणाला.

"तुला जस योग्य वाटेल मी येत जाईल अधून मधून"

संध्याकाळ झाली. सुबोध दिवाणखान्यात बसला होता. समोर शेकोटी पेटली होती. त्याच्या मांडीवर एक पत्र्याची पेटी होती. त्यात त्याच्या काही आठवणी, डायरी,फोटो,पत्र वैगरे होत. अजून काही खास गोष्टी देखील होत्या. शेकोटीची ऊब त्याच्या शरीराला लागत होती. पेटीतील एक एक वस्तू बाहेर काढून तो आपल्या आठवणी जाग्या करत होता. आता याच आठवणी सोबतच त्याने एकट जगायचा निर्णय घेतला होता.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
जिममध्ये गाळला घाम व्यायाम न करता जिममध्ये घाम गाळला.in Gay Male
गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांनाही आनंदी करणारे गिफ्ट!in Gay Male
Me and Rajan ही माझी आणि कोल्हापूरच्या राजनची गे सेक्स स्टोरी आहे.in Gay Male
More Stories