लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 14

Story Info
लस्ट इन फॉग सिजन१ मधील घटनांची उकल!
1.3k words
4.2
233
00

Part 14 of the 14 part series

Updated 06/10/2023
Created 06/06/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

बेचारा पवन मी संकटात आहे माझ्यावर हल्ला झाला आहे असे समजून तडफडून उठला. अजलान वर हल्ला करून मी खूप थकलो होतो म्हणून एका झाडाला हात टेकून मी उभा राहिलो पण माझी पाठ पवन कडे होती. पवन माझ्या जवळ आला हे माझ्या लक्षात देखील आले नाही. अशाच बेसावध क्षणी त्याने मला मागून मिठी मारली. तो काही मला ओळखू शकला नाही पण त्याच्या या मिठीने माझे चांगलेच धाबे दणाणले. माझी मती खुंटली त्याला झिडकारून पाठी पाडण्याचा प्रयत्न केला. पण तो काही मला सोडायला नव्हता मला दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता म्हणून मी माझ्या हातातील धारदार शस्त्र घट्ट पकडले आणि पवनच्या पोटावर त्याने वार केला. मला जाणवलं की ते शस्त्र पार पवनच्या पोटाच्या आत घुसले आहे, तसा मी भयंकर घाबरलो मी त्याला लाथ मारून पाठी ढकललं आणि हिसका देऊन पुढे आलो.

"तू सुबोधला मारलं मी सोडणार नाही तुला" एवढा पवनचा आवाज माझ्या कानावर पडला. एवढ्या साऱ्या जखमा होऊन देखील पवन परत उठला होता तो परत माझा पाठी येण्याचा प्रयत्न करू करत होता मी कसाबसा पवनला चुकवून बाजूला सरकलो, पण पवन काही थांबला नव्हता तो पुढेच येत होता. अचानक तो त्या ठिकाणी पोहोचला जिथे टिण्या बेशुद्ध पडला होता. पवन टिण्या जवळ जाताच बेशुद्ध पडल्याचे पडलेल्या त्याच्या पायाला लागून पवन धडपडला. मी बाजूला राहून हे दृश्य बघतच होतो मला परत एकदा वाटलं की माझं भांडण फुटणार पण जे काही घडलं ते अगदीच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होतं.

पवनचा असा गैरसमज झाला की ती काळी सावली म्हणजे टिण्याच आहे. त्याने त्याचा चेहरा न बघता त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्याने टिण्याला पाहिलं तेव्हा मात्र तो चांगलाच दचकला. त्याचा तोल जाऊन तो एका दगडावर आपटला. तो पुरता बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर मी त्याच्या जवळ गेलो त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठत नव्हता काय करावं सुचत नव्हतं, मात्र त्याचे श्वास अर्धवट चालू होते त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून मी जंगल पार करत दर घराजवळ पळत सुटलो. मी घराजवळ जातच मागच्या दरवाजाच्या उंबरठ्याची ठेच लागून मी जमिनीवर आपटलो. मी प्रचंड घाबरलो होतो पवन ची काळजी आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे फारच दमछाक झाली होती पण अचानक माझ्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि मला समोर रघू दिसला.मी कसं बसं हात करून त्याला जंगलाच्या दिशेने जाण्यास सांगितले आणि मी माझे डोळे मिटले.

मी दोन-तीन दिवस शुद्धीवर नव्हतो आलो तसाच बेशुद्ध पडून होतो माझ्या मनात त्यावेळी शुद्धीत नसताना पवन आणि माझ्या भेटीची क्षणचित्रे राहून राहून डोळ्यासमोर येत होती माझ्या जीवाला एक वेडी आस लागली होती की आता तरी मी आणि पवन एकत्र राहू. माझ्या अंगावरच्या जखमा बऱ्यापैकी भरल्या होत्या. डॉक्टर नेगी माझ्या बाजूला चेहरा पाडून बसले होते. कसबसं उठत मी त्याच्याकडे पाहिल. काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज मला आला ओठ खेळवत मी डॉक्‍टरांना विचारलं,

"पवन कुठे आहे?"

डॉक्टर अडखळत म्हणाले "आपण याविषयी नंतर बोलु तू सध्या आराम कर."

मी मोठ्या आवाजात परत तेच वाक्य म्हणालो,"पवन कुठे आहे?"

त्याच्या लाल डोळ्यातून अश्रूंची धार टपकत होती, हाताच्या घट्ट केलेल्या मुठ्या पाहून डॉक्टरांना मला सांगणं भाग पडलं, "पवन आता या जगात नाही."

ते ऐकताच मी एक जोरात हंबरडा फोडला. मी आपल्या आजूबाजूलाच सामान दोन्ही हाताने फेकून दिलं. उशा फाडून फेकून जोरजोरात ओरडू लागलो "नाही नाही असं नाही होऊ शकत" मी जोरात भिंतीवर डोकं आपटायला जाणार तेवढ्यात डॉक्टर नेगीने मला पकडले आणि मला शांत करू लागले. त्याच्यासाठी हा अट्टाहास केला तोच या जगात राहिला नव्हता मला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले काही संवेदनाच माझ्या शरीरात उरल्या नव्हत्या त्यांनी मला ही बातमी दिली तेव्हा मी प्रचंड हादरून गेलो होतो.

"हे बघ आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते आमच्या हातात नव्हतं, इस्पितळात जाण्या अगोदरच त्याचा आणि अझलानचा मृत्यू झाला.मी खरच तुझी माफी मागतो. पण तू काळजी करू नकोस त्या दोघांनाही निर्दयपणे मारणारा स्वतादेखील विचित्र प्रकारे मेला आणि या कामात त्यांना साथ देणाऱ्याला माणसाला अटक देखील केली आहे."

मी गोंधळलो डॉक्टर काय बोलतायत मला कळेना. सगळकाही माझ्या वेडेपणामुळे झळ होत टीआर अटक कोणाला? माला काही कळलं नाही मी भोळेपणाने विचारल. "म्हणजे?"

"तू अजून बरा नाही झालास म्हणून मी म्हणालो की या विषयी आपण आता नको बोलायला."

"नाही! नाही हे जे काही प्रकरण आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळायला हव." मी हट्ट करून डॉक्टरांना म्हणाला.

डॉक्टर म्हणाले, "गावकऱ्यांचा कॉल आल्यानंतर मी इथे आलो. तू बेशुद्ध अवस्थेत होतास. गावकऱ्यांनी मला पूर्वकल्पना दिल्यामुळे मी ॲम्बुलन्स आणि माझे काही साथीदार घेऊन आलो. जेव्हा जंगलात तिघांच्या देखील डेडबॉडीज मिळाल्या तेव्हा मी घरात तपास केला. घराची झडती घेतल्यानंतर तुमच्या घरातला नोकर, म्हणजे टिण्याच्या खोलीमध्ये मला अझलानच सगळं सामान सापडल. पासपोर्टमुळे मला ओळख पटली."

"त्या सामानाबरोबर तुझ्या आणि पवनच्या काही वस्तू आणि काही रोख रक्कम देखील त्याच्या खोलीत सापडली. तसेच त्याच्या खोली जादूटोणा करण्याचं सामान आणि दिवाणखान्यात असेच जादूटोण्याचे सामान सापडलं होत. असं काही करून टिन्या तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, असा माझा अंदाज आहे. आणि जेव्हा त्याच पितळ उघड पडायला आल्यानंतर त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने तुझ्यावर हल्ला केला तेव्हा पवन तुला वाचवायला आला. त्याच झटापटीत पवन आणि त्याचा मृत्यू झाला." डॉक्टर म्हणाले.

हे तेच पवन आणि अझलानच सामान होत जे मी टिण्याच्या खोलीत लपवल होत. पुढे मागे काही झालं टिण्या तिच्यावर चोरीचा आळ आणि अझलांच्या खुनाचा आरोप लावता यावा म्हणून. पण त्यात असलेल्या जादूटोण्याच्या सामना बद्दल मला काहीच माहिती नव्हती ते कसाआलं हे त्या टिण्यालाच माहीत होतं

"हो मी एकटाच होतो घरात आणि अचानक सगळे दिवे विझले. पण अझलानचं प्रेत जंगलात कसं सापडलं? तो इथे नव्हता." मी माहीत असूनसुद्धा विचारलं.

"खरंतर टिन्याने सर्वात पहिला त्याच्यावर हल्ला केला. अझलानवर सर्वात पहिला हल्ला करून त्याच सगळं सामान आपल्या खोलीत लपवून ठेवल आणि अझलानला देखील कुठेतरी गायब केलं. जंगलातच त्याला जखमी करून ठेवलं असावं. अचानक अझलान गायब झाला असा संशय येऊ नये म्हणून तो पवनला मेसेज करत राहिला. त्याच्याकडे अझलानचा मोबाईल सापडला आहे."

अझलाणला तळघरात लपविल्यानंतर मीच पवनशी अझलाण म्हणून बोलत होतो. जेणेकरून त्याला वाटावं की तो सुखरूप घरी पोहोचला आहे. त्याच्या मोबाईल वरुण मीच मेसेज करत होतो.

"त्याचा साथीदार कोण?" मी विचारलं.

"रघु! टीण्याची अशी अवस्था बघून रघुने हंबरडा फोडला होता. त्याला सोडाव अशी विनंती तो पोलिसांना करत होता. त्याला संशयीत म्हणून पोलीस घेऊन चालले होते. पण तो 'मी निर्दोष आहे मी काहीही केलं नाही तिने नही काही केलं नाही तुम्ही नीट तपास करा ती दोन पत्र तिथेच त्याच घरात असतील' असं काहीबाही बडबडत होता."डॉक्टर म्हणाले.

ती पत्र खूप महत्त्वाची होती जे माझ्याकडे होती मी ती माझ्याजवलच ठेवली होती. आणि ही डायरी लिहायला घ्यायच्या आधी जाळून टाकली आणि ते धारधार क्षत्र सुद्धा!

डॉक्टरांनी मला त्याच्यासोबत येण्याचा हट्ट केला पण मी स्पष्ट नकार दिला माला या घरात एथेच राहायच होत.

लोक म्हणतात त्या घरात भूत आहे हे घर पछाडलेला आहे ते मला माहित नाही पण या घरात नक्कीच काहीतरी अशी शक्ती आहे जी माणसाला बदलवून टाकते मी नाही का बदललो जिवापाड प्रेम करणारा साधा मुलगा एक वेळ तीन तीन जणांचे खून करून येते आयुष्य आरामात राहतोय मला वाईट वाटलं पण मी पवन वर केलेलं प्रेम हे कधीच चला कळालच नव्हतं आम्ही फक्त एकमेकांच्या शरीराचे दीवाने होतो च त्यामुळे त्याच्या जाण्याचा मला फार दुःख झालं नाही आणि तिच्याशी तसाही माझा काही खास संबंध नव्हता या सगळ्यात रघु मात्र बिचारा अडकला.

दोन मनं फुलून आल्यानंतर, शरीर-मनाचं अंतर पार केव्हा होतं, ते समजूच नये, असा प्रीतीचा खेळ रंगावा अशी माझी इच्छा होती. पण दर दिवसागणिक मला जास्तीजास्तीच जाणवत गेलं ते हे की पवन कधीच दूर गेला आहे. तो आता माझा राहिलाच नव्हता. त्याच्या मनात त्याचं काम आणि माझं अपंगत्व इतकंच होता. इतका त्याचा स्वभाव कसा बदलला, याचं मला आश्चर्य वाटत होतं. पण खरी चूक माझीच होती. त्याचा स्वभाव असाच होता. पण हे मला आता समजायल होतं. त्याच शररिक आकर्षण मी प्रेम समजलो. त्याला माझ्याबरोबर असलेले हे अनैतिक संबंध समोर येतील याची नेहमीच भीती वाटायची. आपल पाप कधी ना कधी पुढं येईल सतत त्याला वाटत असावं. जो पर्यन्त अझलाण भेटला नव्हता तेव्हा तो माला आपरत होता. पण आता कोणीच नाही एथे ना पवन ना अझलाण.

पण माणूस पहा कसा असतो! जोवर त्या प्रीतीचे रंग त्याला खिळवून ठेवतात, तोवर तो म्हणतो की, प्रिय व्यक्ती प्रथम भेटलेला दिवसच सर्वांत भाग्याचा होता. पण जेव्हा ते रंग उडून जातात, तेव्हा तो म्हणायला लागतो की, किती भयानक दिवस होता तो. ज्या दिवशी हे प्रेमिक प्रथम भेटले तो दिवस तसाच असतो, पण मन मात्र ते उरलेलं नसतं. भावना हरवलेल्या असतात आणि एकमेकांना बघण्याची दृष्टी पूर्ण बदललेली. पण माझी आणि पवनची भेट झाली तो दिवस मला मात्र या अनेक दिवसांपेक्षा खूप वेगळा वाटतो आणि त्यापेक्षा हा दिवस! कारण आता माझ्या जवळ कोणीच नव्हतं आणि मी देखील कोणावर अवलंबून नव्हतो!

समाप्त

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 01 मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग१"in Gay Male
Me and Rajan ही माझी आणि कोल्हापूरच्या राजनची गे सेक्स स्टोरी आहे.in Gay Male
पावसाळ्यातील वसंत पावसाळ्यात दोन कामुक शरीरांनी वसंत कसा फुलवला वाचा या कथेत!in Gay Male
गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांनाही आनंदी करणारे गिफ्ट!in Gay Male
More Stories