स्वप्न भंग Ch. 04

Story Info
स्वप्न भंग. .!
3.1k words
3.67
206
00
Story does not have any tags

Part 4 of the 7 part series

Updated 06/11/2023
Created 10/05/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here
Dkshi
Dkshi
2 Followers

आज काम काहिच नसल्यानं निवांतपणे दीपक आज शेताकडे आला होता.. हिरव्यागार शेतात वर पडणारया किंचीत गरम उन्हात एकटाच मस्त गाणगुनगुनत सगळीकडे फेरफटका मारला आणि केनॉलच्या कडेला आला.. त्या मस्त खळखळून वाहणार पाणी बघुन.. शेजारच्या कट्ट्यावर गेला.. शूज काढून पँट फ़ोल्ड करुन त्या कट्यावर बसला.. हळुवारपणे पाय पाण्यावर ठेवले.. आणी पाय पाण्यात सोडताच एक थंड लहर पाण्यातून शरीरात आलि.. त्या थंड पाण्याच्या लहरींने वरची सुर्याची उष्णता विरुन गेली.. मस्त पाय हलवत...पाण्यावर आपटत त्या वाहत्या पाण्याची हलचाल टिपत आपल्याच विचारात गुंग झाला.. पाण्यात पाय तसेच हलवत त्याने इकडेतिकडे पहिले.. दुरपर्यंत कोणाचीच हलचाल नव्हती.. कुठेतरि पक्ष्यांचे किंचीत आवाज.. ती पानांची सळसळ.. वार्याचा किंचीत आवाज..

मस्त वाटत असताना अचानक त्याने एक दिर्घ श्वास सोडला.. एक अनामिक हुरहुर मनात दाटून आलि.. ती शांतता एकदम एकट एकट फील करुन देऊ लागली.. त्या मनातल्या कल्लोळाच लक्ष विचलित व्हाव म्हणून त्याने कापाळावर आठ्या पाडत मोबाइल कडे पहिले.. बराच वेळ पाहिलाच नव्हता.. त्यान तो हातात घेत लॉक उघडलं.. शांतपणे श्वास घेत मोबाइल चाळू लागला.. whats app चेक करत आलेलया msg चा ढिग फक्त स्क्रॉल करत पाहू लागला.. का माहित पण आता मनात कोणाशीच बोलायची किंवा आलेला msg पहायची इछा नव्हती.. लोकांनी टाकलेले whtas app स्टेटस पहात असताना एकदम त्याच्या चेहर्यावर हस्य आले मूड एकदम स्विन्ग झाला.. मगाशी वाटणारी हुरहुर एकदम विसरुन गेला.. हळुवारपणे हार्टबीट्स वाढले.. एक किंचीत स्माइल देत त्यान इकडेतिकडे पहात पुन्हा मोबाइल मधे पहिले.. खरच भारी दिसत होती ती.

आज तिने आकाशी आणी आंबा कलरच्या साडी वरचा फोटो टाकला होता.. बस आता पुढच स्टेटस जाणून घ्यायचे थांबले.. बोट स्क्रीनवर ठेवून त्याने स्टेटस होल्ड केले.. बास तिला सोडून बाकि पहायची इछा मेली.. ती होतीच लावण्यवती.. तिला पहाताच सर्व जगाचा विसर पडावा इतकी देखणी. आज तिने फोटो नाही तर जणु कित्येक्याच्या हृदयावर जणु अणुबॉंब टाकला होता.. या साडी वर ती एकदमच बोल्ड दिसत होती.. तिच ते रुप अगदीच घायाळ करनार होत.. एका मादक नजरेने क्यांमेर्याकडे पहात होती.. पण त्या फ़ोटोत पहता जणु आस वाटत होत की ती भेदक नजर फोटो पहानार्याच ह्रदय भेदून जात होती..

ह्याची अवस्था त्या नजरेनं घायाळ झाली.. कदाचित याच रुपात तिने प्रत्यक्षात समोर असे पाहिले आस्ते तर नक्किच ह्रदयात पाणी झाले असते.. तिचा गोरापान चेहरा आणी हात त्या बाकि डार्क रंगात उठुन दिसत होते.. तशी तर ती कोणत्याही रंगात खुलून दिसायची.. निसर्गाने बनवलेल्या काहि मौल्यवान कलाकृती सगळया रंगा ढंगात छान दिसतात त्यातली ती एक निसर्गाची देण होती.. ती आखीव रेखीव बोटं तिथ खुलून दिसत होती.. उजवा हात तिने मोकळा सोडला होता.. ते मोकळ्या सोडलेल्या रेशमी केसाची बट त्या उजव्या गोर्यापान दंडावर मुक्त रेंगाळत होती.. त्याला त्या केसांचा किंचीत हेवा वाटला.. मोकळे सोडलेले केसांची आणखी एक बट जणु चंद्र कोरिकडेला एखादा काळा ढग यावा आणी ती पांढरी शुभ्र कोर उठुन दिसावी अशी ती लावण्याचि मुर्ती भासत होती.. तिच्या त्या संपुर्ण शरीराची ठेवण अक्षरशः कोरीव केलेल्या एखाद्या मुर्ती प्रमाणे भासू लागली.. पण काही केल्या लक्ष पुन्हा पुन्हा त्या भेदक नजरेत जात होत.. त्याच भेदक नजरे बरोबर त्या आखीवदार नाकाखाली उमटलेली गुलाबी ओठावरची किंचीत हस्याची लकेर तिची भेद्कता संपवून एक गोड लहर मनात आणत होती.. तिची ती नजर आणी हास्याची खेळी तीच्या कडे पहानार्याला चेहर्यावरच खीळवून ठेवणारी होती.. बस जणु त्याने तिच्या सुमुखात अडकून रहाव आणि तिच्या सर्वांगावर दुर्लक्ष व्हाव अशी ती होती...

तिच्या त्या हर एक फोटो त्याच्या विचारत येउन जणु स्लाइड शो त्याच्या मनात सुरु झाला.. तस तर तिची ओळख होण्याअधी पासुन तिच्या सौंदर्याबद्दल कौतुक तो एकत आला होता.. जेव्हा तिला पहील्यांदा पाहिल तेव्हा ही तीच रूपगर्विता आहे याची कल्पना नव्हती.. ती खरच अप्रतिम दिसत होती.. तिचा तो रुबाब.. हलचाल.. बोलण्याची वागण्याची पद्धत.. त्यान समजल होत त्या पेक्षा कित्येक पटीने ती भारी दिसत होती..

त्या नंतर तिने कित्येकदा वेगवेगळे फोटो टाकले होते प्रत्येक फ़ोटोत ती पौर्णिमेच्या चंद्रकले प्रमाणे खुलून दिसायची..

झरझर तिचे फोटो त्याच्या नजरेसमोर येऊ लागले.. या साडीतर जबरदस्त दिसत होती.. जणु नवतरुणी.. त्याला ती किनार आणी रंग तिला खुलवत होता...

काही दिवसांपूर्वी तिने तो गुलाबी ड्रेस घालून टाकलेला फ़ोटो तर हार्टबीट्स वाढवणारा होता.. तो गुलाबी पणा.. तिच्या गालावरची गुलाबी लाली.. आणी गुलाबी ओठ.. आणी गळ्यावरचा तिळ सगळं कस गुलाबी तिच्या नसानसात भिनला होतं.. कदाचित तिचा तो गुलाबी रंग जणू त्या ड्रेसवर उतरला होता.. तिचे ते किंचीत मोकळे सोडलेले रेशमी केस.. तीच्या त्या अंगावरची बट जणु तिला नजर लागु नये म्हणून रेंगळत होती.. तिची ती खळी पडणारी स्माइल खरच तिच वेड लावणारी होती..

पण त्याला आवडलेला तिचा तो गॉगल घालुन पिवळ्या साडीतला फोटो या जगातलं सगळ्यात उत्तम सौंदर्य याची प्रचिती देणारा होता.. ती अल्लड तरुणी भासत होती. त्या सुन्दर टोकदार नाकाखाली तिच ते फिक्कट गुलाबी ओठावरच हस्स्य मनमोहक होत.. ती का इतकी सुन्दर आणि गोड आहे याचा प्रश्न पडावा अशी ती लोभस होती..

बस तिच्या त्या प्रत्येक फोटोच कौतुक कराव आस त्याला नेहमी वाटायच.. का माहीत पण तिच्यापुढ व्यक्त व्हायला त्याला कधी भिती वाटलीच नाहि.. तिच्याशी बोलताना त्याला विश्वासाच आगदी Secure फील होयच.. जे काही मनात येइल तो तिला बिनधास्त बोलुन दाखवायचा.. कित्येकदा तिला ते कौतुक खोटं वाटायच.. खर तर ती खरच समजुतदार आणी स्वभावाने भारी होती.. ती न चिडता त्याच बोलणं एकय्ची.. कित्येकदा विषय चेंज करायची किंवा रिप्लाई न देता त्याकडे दूर्लक्ष करायची..

तिच्या मनात खर तर नेहमी एक अनामिक भिती त्याला जाणवायची.. खर तर तिला त्रास द्यावा.. तिला वाईट वाटेल.. ती आडचणीत येइल.. किंवा तिला अवघड होईल आस हा वागायचा किन्वा बोलायचा नाहि.. तरी पण ती नेहमी तुटक रहायची..

तिच्या सौंदर्यासोबत ती हुशारही होती.. खरं तर सौंदर्य आणि हुशारी हे दोन्ही देण असलेल्या स्त्रिया मुळात कमी असतात त्यातील ती होती.. पण त्या अनामिक भिती आणि चिंतेत ती नेहमी असायची.. आणी तेच ते त्यला नेहमी खटकायच.. ती आनंदी.. निरोगी..खुश असावी.. असं नेहमी मनात यायच.. पण त्या बद्द्ल ती काहि विचारलं की टाळायची.. तिचा तो अवगुण तिला नेहमी मागे खेचतो हे त्याला जाणवायच.. एक बेस्ट सपोर्ट आणि ठामपणे तिच्या पाठी थांबल तर जगातील सर्वोत्कृष्ट.. सर्वोत्तम गोष्ट ती करु शकते अशी ती धौर्यशिल आणि कर्तुत्ववान सौंदर्यवती एका अनामिक भितीच्या बाणाने घायाळ झालेली पाहुन.. आणि ते आपल्यला समजू शकत नाहि.. त्यासाठी आपण काहिच करु शकत नाहि याला हतबल करायच..बकिच्याचे हक्क, अधिकार सोसत त्याच्या इच्छा, आकांक्षा आणी स्वप्न पुर्ण करण्यासाठी नात आणी जाबबदारीच्या ओझ्याखाली दाबलेली ती.. स्व्तःच्या इच्छा, आकांक्षा आणी स्वप्न गुंडाळून ठेवत इतरांना ते जाणवू नये म्हणून नेहमी कोणत्या तरी खोट्या हास्य आणि विषयात गुंडाळनारि ती होती हे त्यान जाणल होतं..

ह्यान एकटच किंचीत हसत पुन्हा आजुबाजूला पाहिल.. मोबाईल कडे पहात तो मांडीजवळ कट्यावर ठेवला.. आजुबाजूला पहात तिच्या त्या आठवणीत गुंग झाला.. ती नेहमी नवनवीन फोटो टाकायची..

का कोणास ठावूक ती एक वार्याची ऊबदार लहर ती आसपास असल्याची जाणिव देऊन गेली.. त्यांन शेजारी पाहिल तर ती त्याच्या शेजारी कट्यावर बसलेली..त्याच्याकडे पाहत त्या गोड हास्याने आजुबाजुचा निसर्ग खुलवत होती.. तो उबदार वारा नव्हता तर त्याने कट्ट्यावर ठेवलेल्या त्याच्या हातवार तिने हात ठेवला होता त्या तळहाताचा होता.. तो प्रेमळ स्पर्श हृदय बंद पडणारा होता

त्याने तिच्याकडे पाहिले.. ते अदभुत सौंदर्य खरतर अलौकिक होत.. त्याच्या त्या निरागस आणि प्रेमळ नजरेत पहात तिने एक गोड स्माइल दिली तिच्या त्या हास्याची लकेर वातावरणात अपोआप चैतन्य देऊन गेली.. नीळ्याभोर साडीत ती अप्रतिम दिसत होती.. तिच्या गोर्यपान देहावर ती साडी खलून दिसत होती.. तिचे ते फिक्कट ब्राऊन काळे केस त्या गोर्यापन रंगाला जणू उठावदार बनवत होते.. निम्याभागावर भांग पाडून मागे मानेजवळ बांधून मोकळे सोडलेले रेशमी केस.. चेहर्यावर एकाबाजुने किंचीत झुकलेले. काहि केस आणी बटा तिच्यात्या चंद्र्कोर असलेल्या चेहर्यावर रेंगळत... काही तिच्या त्या आखीव रेखीव कानावर आणी कानामागे अडकवलेले.. वर्याच्या झुळकेनी हलणारे.. मुलायम केस भारी दिसत होते.. अश्या केसाच्या स्टाईल मधे ती खूप छान दिसायची..

त्या चेहर्यावर पण तिच ते राजेशाही तेज, समोरच्याच्या चेहर्यावर लकाकी आणी आजुबाजुच्या वातावरणात झळाळी आणणार जाणवत होत..

तिची ती गुलाबाच्या पाकळी प्रमाणे नाजुक त्वचा.. त्या आखीव रेखीव भुवया.. ती जेव्हा आशी भुवयाची हलचाल करायची तेव्हा समोरच्याच्या मनात अपोआप गोड खदखद होयची.. त्या सुंदर भुवयाखाली त्या सुंदर भुवया मधून वाट काढत आलेल तिच ते टोकदार नाक तिच्या चेहर्यावर उठुन दिसायच.. ते चिमटीत पकडून हलवाव, तिला त्या हळूवार वेदनानी उगीचच छेडाव.. आस याला नेहमी वाटायच..... असणारे तिचे बोलके नयन.. तिची नजर तर दिलखेचक होती.. तीन त्याच्या नजरेत नजर घालुन पहातच याचा आतून जिव उल्हसित होयचा.. खरतर तिच्या नजरेतून बरच काहि बोलल जायच.. एकटक तिच्या नजरेत नजर घालुन पहावं.. शब्दापेक्षा तिच्याशी खूपकाही नजरेन बोलाव.. याची त्यला नेहमी आस लागलेली असायची.. तिच्या त्या नजरेतून आत शिरता येऊ नये म्हणून जणु डोळ्यांच्या बाजुला असणार्या किंचित काळ्या कडा.. त्या वर असणार्या पापण्या.. डोळ्याखाली तटबंदी असावी अशी लहान रेखा. भारि दिसायची.. त्याखाली त्या कमळपाकळी प्रमाणे असणारे तिचे किंचीत गुलाबी गाल लाजवाब होते..

गुलाबाच फुल घ्यावं आणी हळुवारपणे त्या गालावर फिरवाव हळुच त्यावर आपटून ते तसच फिरवत.. तिच्या त्या मस्त हनुवटी कडे याव आस ते सुंदर रुप होत.. तिची हनुवटी पण एकदम उठावदार होती.. अंगठा आणी चाफेकळी मधे ती हनुवटी धरावी आणी संपुर्ण तिचा चेहरा वाचत नजरेत नजर घालवीकी काय आस वाटून जायच... त्या सुंदर हनुवटी वर किंचीत असणारा खोलगट भाग.. आणी त्यावर असणारे ते नैसर्गिक गुलाबी ओठ अप्रतिम होते.. ते आखीव रेखिव ओठ जणू तिच्या सौंदर्याला निसर्गाने दिलेली देणगी होती.. तिने लाल साडी वर जेव्हा ते त्या रंगाला मैच केले होते.. तेव्हा लाल रंगात तर ते जणू डाळिंबाची जाणिव करुन देणारे भासत होते.. ती हसायची किंवा बोलायची तेव्हा त्यातून चमकणारे तिचे ते शुभ्र आखीव आणी एकसारखे दात.. अप्रतिम होते.. बस तिच ते हस्य हेच खुलवून टाकायचे.. त्या शुभ्र दात.. आणि नैसर्गिक गुलाबी देण घेउन त्याला तट असणारे ओठ.. ते मुलायम, चुटुकदार ओठ ब्स्स पहाताक्षणी त्यातिथेच खिळून जाव असे होते.. एखाद्या गुलाबात भरावा तसा त्या ओठात जणु मध निसर्गाने भरला असावा याची जाणिव करुन देणारे ते होते..

बस्स बघावं आणि आपोआप श्वास रोखून बघतच रहाव इतकी देखणी होती ती.. तिच्या त्या सौंदर्यात तो पुर्णपणे न्हाऊन गेला होता.. त्याची ती एकटक आणी भेदक नजर तिला एकदम ह्रदयाशी भेदत गेली.. ब्स्स तिने त्याची नजर थांबावी म्हणून त्याच्या उजव्या हातावरिल तिचा डावा हात दाबला. तिची ती मुलायम बोट त्यला फक्त स्पर्शाने "दीपक थांब" अशी जाणिव देऊन गेली.. त्या किंचीत मुलायम वेदनेन त्यांन हळुवारतेनं डोळे मिटले.. त्याची तिच्यावरची नजर बंद होताच जणू तो नजरेचा संवाद तुटला.... तिच्याकडे पाहणारी त्याची नजर थांबतच ती अचानक अस्वथ झाली.. पाहू नये म्हणून आता त्याला थांबवनारि ती श्वास तुटावा तशी ती तडफड होवू लागली.. ते नजर थांबवनारे तिचे हात अपोआप थांबले.. आता तिची बोट त्याच्या बोटावर सरकली.. खरच तिचा तो मुलायम प्रेमळ स्पर्श होता.. त्याच्या बोटाच्या खोबनीतून तिची बोट सरकली आणी तीन ते बोटात बोट गूंफले.. बस याला ते ह्रदयस्पर्शी होतं.. दीपक डोळे मिटून एका अनमोल क्षणी पोहोचला होता.. वार्याच्या एक झुळकेसोबत तिच्या त्या सुन्दर परफ्युमचा वास याच्या नाकातून नसानसात पोहोचला.. याच्या लयबद्ध श्वासाची हलचाल याला जाणवू लागली.. डोळे मिटले आणी याला आता जगाचा विसर पड्ला होता.. सगळ विसरुन फक्त तिच सोबत आहे याचीच त्यला जाणिव होती. ते पक्षी, सळसळ करणारी पाने, खळखळनार पाणी आणी वर्याचे आवाज केव्हाच विस्मरणात विरून गेले होते.. खर तर आता हिच त्याच जग झाली होती..

डोळे मिटले तरी तिच आत्ताच रुप प्रतिमा होऊन त्याच्या नजरेसमोर तरळत होत.. तोच त्याच्या उजव्या पायाच्या करंगळीला कसलासा मुलायम स्पर्श झाला.. आता तो स्पर्श घोट्यापर्यंत होत गेला.. आणी बंद झाला.. पुन्हा झाला.. तो स्पर्श अनिश्चीत पणे वारंवार होता.. स्पर्श होताना काहि तरी किंचीत घोट्याजवळ टोचत होत... ब्स्स त्याला जाणवलं तिच ते पाऊल होत.. अनमिक ओढीने जणु आपोआप ते धडकत होत.. ते धडकन थांबल.. तो स्पर्श तसाच चालु थांबला.. तिच्या त्या उबदार कोमल पायाच्या स्पर्श आणी थंडगार पैंजणांचा स्पर्श यान याची पायाची बोट आखडत दुमड़ली.. आणी पुन्हा सोडून आता हा सुधा तिच्या त्या पावलांना पावलानी स्पर्श करू लागला.. सोबत याच्या उजव्या हाताची बोट जवळ आली आणी तिच्या त्या गुंफलेल्या बोटाना आवळत एकमेकाना एका अनामिक ओढ आणी प्रेमळ स्पर्शाची जाणिव देउ लागली...

यान हात फिरवला आणी तिच्या तळहातात हात गुंफून बोट एका अनमिक ओढीने गच्च अवळली.. तिचा तो उबदार डाव्या हाताचा स्पर्श.. थोडा ओलसर पणा.. आणि तिचा तो मुलायम स्पर्श हवाहवासा वाटू लागला.. आता दोघांची मनगट एकमेकाना स्पर्श करु लागली दोघे एकमेकांकडे अपोआप झुकुन सरकल्याचे एकमेकांना जाणवू लागले.. एकमेकांच्या शरीराची उब लांबूनही जाणवू लागली.. एकमेकांच्या शरीराचा.. घामाचा.. गंध हवाहवासा वाटू लागला.. याचा कट्ट्या वरचा डावा हात उचलुन याने तिच्या डाव्या हातच्या पाठीमागे ठेवला.. तिचा डावा तळहात आता त्याच्या दोन्ही हातात सामवला गेला होता.. त्याच्या स्पर्शात तिला प्रेमळ काळजी.. आणि एक विश्वास जाणवू लागला.. एका अभिमानस्पद धौर्यने ती त्याच्याकडे पाहू लागली.. तिला एक दृढविश्वास त्याच्या बद्दल वाटू लागला.. त्याची शांत डोळे मिटलेली मुद्रा.. तिला आकर्षित वाटू लागली.. एका परिपूर्ण सुखाने.. तिच्या स्पर्शाने त्याच्या चेहर्यावर आलेली आनंदिहस्य मुद्रा तिला तिच्या सौंदर्य आणि उपस्तिथीची किंमत जाणवू देउ लागली.. त्याने हळूवारतेने डोळे उघडले आणि तिच्याकडे पहिले.. नेहमीप्रमाणे हिने एक भुवई उंचावत तिच्या त्या मादक नजरेने पाहिले पण त्याची ती नजर नेहमी सारखी नव्हती.. ती भेदक नजर सर्रर्र करत तिच्या नजरेतून काळजात घुसली.. अचानक तिच्या काळजात धस्स झालं.. एक गुंगी आल्यासारखं झाल.. त्याला तिची ती अस्वस्थता जाणवताच त्यान त्याची उजव्या हाताची बोट आणखी आवळली.. तिची नाजुक मुलायम डाव्या हाताची बोट त्यात गढून गेली..आणी डावा हात थोपटत तिला विश्वासची जाणीव देउ लागला.. हिने अचानक झुकत तिचे डोके याच्या उजव्या खंद्यावर ठेवले..

त्याचा मजबूत खंदा तिला विश्वासक वाटु लागला..त्याच्या कॉटनच्या शर्टातून होणारा त्याचा तो उबदार स्पर्श.. त्याच्या शरीराचा तो गंध तिची ती सुखद गुंगी वाढवू लागला. तीने त्याच्या हातात असणारी तिची बोटे आवळली.. दुसरा उजवा हात त्याच्या हातवार ठेवत प्रेमाने कुरवाळत शांतपणे डोळे मिटून सरकुन त्याला रेलुन बसली.. त्याच्या उजव्या हातचा तिचा डाव्या हाताला होणारा स्पर्श तिला सुखद वाटू लागला..

इकड त्याची अवस्था वेगळी नव्हती.. तीने आपल्या खंद्यावर डोक ठेवाव किंवा तिची ही कृती त्यान विचार देखील केली नव्हती.. तिने ती आवळुन धरलेली बोटे.. तिचा कुरवाळनारा हात.. तिच्या त्या डाव्या दंड आणी मनगट याचा होणारा सुखद स्पर्श अलौकिक होता... तीच्या मऊ गालाचा स्पर्श त्याच्या मजबूत खंद्याला सुखद वाटू लागला.. तिन आपल्यावर पूर्णपणे विश्वास बहाल केला आहे याची जाणिव त्याला झाली.. तिचे मऊ मुलायम रेशमी केस याच्या गालाला लागु लागले.. वर्याच्या झुळकेनी काहि केस याच्या चेहर्यावर येवु लागले.. याने त्याचा उजवा गाल तिच्या डोक्यावर घासला आणि आपले हात आवळत तिला स्पर्शाने विश्वास देत आपली उजवीकडे मान वळवली आणी खंद्यावर ठेवलेल्या तिच्या त्या रेशमी केसात वर डोक्याला हळुवारपणे ओठाने किस केले.. आणी पुन्हा आपले डोळे मिटुन उजवा गाल घासत पडुन राहिला.. बस हाच तो सुरु झालेला प्रेमळ क्षण जिथ माणुस शब्दापेक्षा स्पर्शाने बोलू लागतो.. एक्मेकना प्रेम, काळजी आणि ओढ याची जाणीव स्पर्शात देऊ शकतो..

यान आपला उजवा हात हातातून सोडवला.. हळुवारपणे दोघामधून काढत तिच्या उजव्या खंद्यावर ठेवला.. त्याचा तो आश्वासक स्पर्श होताच हिने हळूच मान उचलून त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले.. माहित नाही पण त्याने तिच्या नजरेत नजर रोखून त्यान दिलेल कातिल स्मितहास्य खूप दिलासादायक वाटू लागले.. बस्स कुछ तो बात थी... अचानक तिच्या पोटात हळुवार फुलपाखरे फडफडल्यासारख झाल.. हा आयुष्यातला एकदम सुखद अनुभव तिला वाटु लागला... तीने पुन्हा त्याच्या खांद्यावर डोके ठेवून डावा हात त्याच्या हातातून काढला, दोघांच्या मधून त्याच्या मागे नेत त्याच्या पाठिवर सरकवत डाव्या कमरेवर ठेवला.. तिचा तो सरकत गेलेला हळुवार स्पर्श याला पूर्णपणे जाणवला.. घट्टपणे पकडल्याने तिची बोटे त्याच्या कमरेत रुतली.. ती आणखी जवळ सरकली तिच्या डाव्या अंगाचा पूर्णपणे स्पर्श आता त्याच्या उजव्या बाजूने उबदारपणे जाणवू लागला..

याने तिच्या उजव्या खंद्यावर दाब देत आणखी जवळ ओढले.. ही एका बाजुने कुशित किंचीत शिरली आपली आपला चेहरा तीने त्याच्या गळ्याजवळ नेला तिच्या गरम श्वासाच सुखद अनुभव त्याच्या गळ्याजवळ होवू लागला.. यान त्याची हनुवटी तिच्या डोक्यावर टेकवली.. आणी डावा हात तिच्या मुलायम केसात फिरवू लागला.. त्या रेशमी केसातून सळसळ करत प्रेमाने त्याचा हात फिरू लागला.. त्याच्या हाताची उब आणी स्पर्श तिला एक विश्वास आणि काळजी याची जाणिव देवू लागला.. तीने अलगद पणे उजवा हात पुढुन त्याच्या खांद्यावर ठेवायचा प्रयत्न केला पण अंतर जास्त असल्याने तो त्याच्या छातीवर विसावला.. ब्स्स तिच्या साठि तो सुवर्णक्षण होता.. कारण त्याच्या हृदयाची ते लयबद्ध ठोके तिला अविस्मरणीय जाणिव देणारे होते.. त्याचे हृदय जणू तिच्या साठि हदरत होते...

तिचा पुर्ण पंजा त्याच्या छातीवर विसावला होता.. त्या पंजाचा उबदार ओला स्पर्श त्याला त्या हृदयापर्यंत जाणवत होता.. ती त्याच्या हृदयाचा नाही तर जणू मनाचा ठाव घेत होती याची त्याला जाणीव झाली.. ती म्हणजे याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर लावन्यावती होती. जिला निसर्गाने खास उत्कृष्ट कलाकृती म्हनुन निर्मिती केली होती.. आणि जिला पाहातच साक्षात भगवान देवेंद्राला देखील हिची हाव निर्माण व्हावी.. अशी सौंदर्याची खाण असलेली ती.. याच्या साठि अमुल्य ठेवन होती.. आपल्याकडून जिची फुलपाखरांप्रमाणे हताळून.. अगणित काळजी घ्यावी.. तिला जगातील सर्व सुखांचा लाभ करुन द्यावा.. जिला कायम मान सन्मान आणि आदरच आपल्याकडून मिळवा ही इछा असलेली एकमेव सौंदर्यवती ती आणि फक्त तिच होती..

ती म्हणजे खरच फुलपाखरांप्रमाणे होती जिला अलगदपणे हताळाव.. स्वच्छंद पणे आयुष्य जगुन द्यावं.. तिच्या सर्व इछा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मुक्त पणे विहार करुन द्याव.. तिच्या अपेक्षा ही जास्त मोठ्या किंवा नसंपणार्या हव्यासी नव्हत्या.. थोडया लहाण स्वप्नात खुश होणारी.. प्रचंड इछाशक्ती बाळगुन ध्येयाकडे झेप घेणारी ती होती..

हव्यास म्हणून या फुलपाखराला पकडाव तर ती त्या मुठीत तुटुन जाणारी पण मोड़ताना स्वताच्या पंखावरिल प्रेमळ आणि काळजी रुपी सुन्दर रंग आपल्या तळहातावर सोडून देणारी.. आणि तिच्यावर मनाविरुद्ध झालेल्या क्षणांना निमुटपणे भावनीकतेने सहन करत समोरच्याला कोणताही त्रास न देत कोलमडून जाणारी हळवी होती..

एका बाजूने ती बर्यापैकि जणू मिठित आली होती.. दोघाना एकमेकांचा सहवास हा सुखद होता.. एकमेकांचा तो स्पर्श त्याना एकमेकांबद्दलची ओढ; आदर आणि प्रेम याची जाणिव करुन देणारा होता.. त्याचा प्रत्येक स्पर्श हा फक्त तिच्या बद्दलची काळजी आणि जिव्हाळा याची जाणिव करुन देणारा होता.. त्यात कोणताच राकटपणा किंवा वासना तर अजिबात नव्हती त्यामूळे तिला त्याच्या सहवासात आणखी सुरक्षित वाटु लागल.

तिच्या केसांत फिरणार त्याचा तो प्रेमळ डावा हात आता सळसळत त्या रेशमी केसांतुन तिच्या उजव्या कानावर गेला.. तिचा तो सूंदर कोरीव कान त्याला खूप आवडायचा.. जणु निसर्गाने तिची सौंदर्यमुर्ती बनवताना अलगद पणे कोरलेला.. त्यात जणू कोंदलेल तिच ते सोन्याच कणातल त्याची शोभा वाढवत होत... त्याचा तो कानाला होणारा स्पर्श तिला गुदगुल्याकरु लागला.. तीने न राहुन त्याच्या खांद्यावरील डोक उचलल..आणि त्याच्याकडे पाहू लागली.. हा शांतमुद्रेत तिच्या त्या चंद्रमुखाकडे पाहू लागला.. याच्या कानावर स्पर्श करताना तिचे किंचीत विस्कटलेले काहि ब्राऊनिश केस व बटा आता त्या सुमुखावर रेंगळत होत्या.. वार्याच्या किंचीत झुळकेत त्या हलत होत्या.. शांत मुद्रेत एक प्रेम आणि प्रचंड विश्वासाने ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्म विश्वासाने पहात होती.. जणू तिला एक जगातलं विश्वसनीय, प्रेमळ, काळजी करणार आणि हक्काच कोणीतरी मिळाल होत.. खरच अप्रतिम दिसत होती ती.. तिचे

गुलाबी कमळाच्या पाकळ्यासारखे असणारे मुलायम गाल.. तिच्या त्या काळ्याभोर रेखीव टोकदार भुवया.. त्यातील तिन भुवई एक किंचीत उचलत पुन्हा लाटेप्रमाने वर खाली केली.. या कृतीतून जाणवतं होत की, जणु काहीतरी विचार ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून करत होती.. यान फक्त दोन्ही भुवया उंचावून डोळ्यानि "काय" आस विचारलं.. हिच्या मनातले विचार लपवत हिने खुदकन हसत हळुवार "काहि नाही" हे सांगायला नकारर्थी मान डोलवली.. बस तिच ते काहीतरी लपवनार गोड हस्य दिलखेचक होत.. त्या टोकदार नाकाखाली आसनार्या एकदम आखीव रेखीव लयबद्ध गुलाबी ग्लॉसी ओठावर ते शोभून दिसलं.. त्यातुन डोकवनारे तिचे पांढरे शुभ्र सगळे एकसारखेच असणारे दात आणी त्या खाली असणारी रेखीव हनुवटी.. हे सगळ त्या हस्याला जान आणत होत.. बस त्याची नजर बराच वेळ त्या अप्रतिम चुटुकदार ओठांवर खिळून राहिली.. त्यामुळे त्याचे हार्टबीट्स वाढले.. श्वासाचा वेगही वाढला..

तिची सौंदर्याची जादू निसर्गाने चालवली.. तिला त्याच्या भावना.. त्याची ओठावर खीळलेली नजर.. त्याचा वाढलेला श्वास तिला जाणवू लागला.. तिचा त्याच्या छातीवर असणारा उजवा हात त्याच्या वाढलेल्या ठोक्यांची जाणिव देऊ लागला.. या सर्वामुळे याच्या मनाचा पत्ता तिला लागताच.. हिने त्या उजव्या हाताने थाप त्याच्या छातीवर मारली.. त्यामुळे हा त्या विचार भावनेतून जागा झाला.. आता हिने भुवया उंचावून किंचीत स्माईल देत "औय्य मनात काय चाललंय..?" आस विचारलं.. कोणताही शब्द न बोलता याना कृती आणि स्पर्शातुन एकमेकांचे भाव आणि शब्द कळत होते.. याचि मनातली चोरी हिने पकडल्याने याला खुदकन हासू आल.. ती खरच हुशार होती, ही सगळं ओळखू शकते आपण हिच्यापूढे काहि लपवू शकत नाही याची जाणीवच त्याला झाली.. हा दिलखुलास दाद देत हासू लागला..

त्याचे विचार बरोबर ओळखल्याने तिही लटक्या रागात आली.. हळुवारतेनं बुक्की त्याच्या छातीवर मारली आणि त्याच्या मिठित शिरली.. यानेही तिच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताने तिला जवळ खेचून मिठित घेतले.. खरच स्वर्गीय सुखाचा क्षण होता तो.. तोच पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज झाला.. त्याने शुद्धीत येवुन पाहिले तर हातातिल मोबाइल पाण्यात पड्ला होता.. स्वप्नात होता तो. एक मृगजळ होत.. कोणीच आसपास नव्हत.. मोबाइलमधे तिचा तो फोटो पहात हा स्वप्नात गेला होता.. स्वतावर कुत्सीत हसत.. आयुष्यात फक्त स्वप्नातच हे घडू शकतं याची स्वताला जाणीव देत.. उठला.. पाण्यात हळूच उतरत यान तो मोबाइल काढला..

Dkshi
Dkshi
2 Followers
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story