लस्ट इन फॉग सिजन 01 भाग 05

Story Info
मनात लपलेल्या सुप्त वासनेची गोष्ट "लस्ट इन फॉग सिजन१-भाग५".
1.7k words
5
270
00

Part 5 of the 10 part series

Updated 06/10/2023
Created 04/28/2021
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

बाहेर विजांचा जोरदार कडकडाट झाला. बाहेरील काळ्या ढगांतून जोरदार वीज कडकली. विजेच्या कडकडण्यामुळे संपूर्ण घर प्रकाशात उजळून निघालं. विजेचा लोळ अंगणात नाही तर पवनच्या अंगावर पडावा तसा पवन झोपेतून उठला. अगदी घामाघूम झालेला. त्याने आपले हात डोळ्यासमोर केले. दोन्ही पंजे, नखं पाहू लागला, सगळं काही व्यवस्थित होत. फक्त बाहेरचं वातावरण बदलल होत. त्याने स्वप्नात पाहिलं तस काळ, ढगाळ आणि विजेच्या गटागटाने भरलेले.

अचानक काहीतर लक्षात आल्या सारखं त्याला झालं आणि बेडवर उठला. दूर झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याला विचित्र स्वप्न पडत होती. पण कालच स्वप्न अभद्र होत. त्यात स्वप्नात पाहिलेलं ढगाळ वातावरण प्रत्यक्षात होत. जोरात धावत जिना उतरत सुबोधच्या खोलीत गेला. जोरात श्वास घेत तो सुबोधच्या खोलीत चौकटीत उभा होता. सुबोध झोपला होता. सुबोध च वर खाली होणार पोट त्याचे श्वास चालू असल्याची खात्री देत होत. तो सुबोध च्या जवळ गेला.

डोळे मिटून सुबोध शांत झोपला होता. बाजूच्या टेबलवर त्याची डायरी पडली होती. उघडी. खरं तर तो वाचणार नव्हता पण त्याची नजर पानांमधून अर्धवट बाहेर आलेल्या फोटो कडे पडली. पवन आणि सुबोधचा फोटो होता तो ज्यात पवन ने सुबोध ला खांद्यावर उचलून घेतलं होतं. नकळत पणे त्याने ती डायरी उचलली आणि तो वाचू लागला.

सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. काही कळत नव्हतं. अस वाटत होतं की आता मी आयुष्यभर एकटा राहणार. कसाबसा दिवस ढकलत होतो. आनंद, उत्साह, समाधान, मोकळेपणा, आशा, महत्त्वाकांक्षा, सुख सगळं कसं एखाद्या पोकळीत शोषून घेतल्यासारखं कोठच्या कोठे गेलं आहे अस वाटत होतं. सगळ्या ईच्छा आकांक्षा मेल्या होत्या. माणूस जगतो तो आपल्या माणसांसाठी पण माझं आता कोणीच नव्हतं. आई बाबा गेले. मला कायमचे सोडून. पवन पण दूर होता. विदेशात.

पण तो आला. माझ्यासाठी. सगळं काही सोडून इथे स्थायिक झाला. तसं तर तो माझा काका आहे. मी लहानपनी त्याला काका बोलायचो. मी त्याला काकाच म्हणायचो पण एकदा त्याने मला नावाने हाक मारायला सांगितल, तेही अरे-तुरे. म्हणाला की आपलं नात मैत्रीचं आहे! मग मी पण त्याला काका ऐवजी पवन म्हणायला लागलो. पावन पण मला मित्रासारखा आहे. तो मित्रच आहे माझा. जेव्हा जेव्हा तो विदेशातून यायचा माझ्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊनच यायचा. तो विदेशात शिकायला गेलेला.

आमच्या गावातून विदेशात शिकायला जाणारा तो पहिला होता. त्यानंतर त्याला नोकरी पण तिथेच मिळाली. आख्या गावाला त्याचा अभिमान होता. माझ्या आई-बाबांना त्याचा अभिमान होता. मला पण आहे अभिमान त्याचा. जेव्हा केव्हा तो विदेशातून घरी यायचा तेव्हा तो मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावर हात फिरवून गालगुच्चे घ्यायच, माझी पापी घायचा. पवन आला की तो, मी, बाबा पोहायला जायचो, तेही भर थंडीत. कधी कधी आम्ही दोघे जायचो पोहायला. बाबांची नजर चुकवून तो मला न्हयायचा.

तो असला की आम्ही वर एकत्र झोपायचो गच्चीवर. मला खूप आवडायचं त्याच्या बरोबर वेळ घालवायला. मी नेहमी पवनची वाट पाहत असायचो. आई-बाबा अपघातात गेल्यावर ही मी त्याची वाट पाहत होतो. तो आला. सगळं सोडून माझ्यासाठी आला. मी शुद्धीत नव्हतो तेव्हा त्याने माझं सगळं पाहिलं. माझ्या आई बाबांचं कार्य केले.त्याची नक्कीच खूप धावपळ झाली असणार पण मला कधी बोलून नाही दाखवलं त्याने.

इस्पितळातुन आम्ही इथे नवीन घरात आलो. त्याच काम सांभाळून त्याने माझी काळजी घेतली. त्याला सलग बाहेर फिरायची सवय तरीही तो आज माझ्यासाठी घरी थांबून काम करत आहे. मला दिसत तो ही काळजीत असतो, पण नाही मला कधी बोलत तो. आता आम्ही दोघेच आहोत या घरात. एकमेकांना सोबती. मी लवकर बरा होईल. त्याच्यासाठी. जेणेकरून त्याला माझा त्रास नाही होणार. त्याने जे जे केले त्याची मी परतफेड नक्कीच करेन.

डायरीच पान संपलं. पवनच्या डोळ्यातून अश्रु ओघळून डायरीच्या पानावर पडले.त्याने एक नजर सुबोध वर फिरवली. पापण्या मिटल्या तसे डोळ्यातील पाणी खाली ओघळत आलं. त्याला काल रात्रीच स्वप्न आठवलं.

हे मी काय पाहिलं! अस कस होऊ शकतं! नाही नाही नाही! तो स्वतःशी बडबडत होता.

तो माझ्या वर एवढं प्रेम करतो आणि मी मी अस वागलो त्याच्याशी, मी एवढा घाणेरडा विचार केला त्याच्या विषयी! मी चुकलो मी मी... पवन तोंडावर हात ठेवून हुंदके देऊ लागला. भूतकाळातील एक काळी आठवण त्याच्या मनात चमकली. स्वतःच दुःख मोकळं करताना त्याला सुबोध ची झोप नव्हती खराब करायची.

आता अस काही नाही होणार. मी माझ्या चुकांची माफी मागतो. मी तुझी सगळी जबाबदारी घेणार. मी तुला दत्तक घेणार. पवन कसं बस आसव गाळत म्हणाला. तसा सुबोध जरासा हलला. त्याची झोपमोड होतेय हे पाहून पवन त्याची डायरी तशीच टेबल वर ठेऊन बाहेर निघाला. दिवाणखान्यात येताच त्याला जाणवलं मुख्य दरवाजात कोणीतरी उभं आहे कोणी तरी आवाज दिला.

"हाय का कुणी घरात?"

पवन ने दरवाजात पाहिलं तर म्हातारा रघु उभा होता. त्यावेळी त्याचा चेहरा दिनवाना नव्हता. वेगळीच चमक होती. जणू तो पवन ला खरीखोटी सुनवायला आलाय अशा अविर्भावात होता तो.

"तुम्ही? इथे?" पवन ने विचारलं.

"काय सगळं ठीक हाय ना?" रघू ने हसत विचारलं.

"हो आहे सगळं ठीक." पवनने उत्तर दिलं.

"टिन्याने मला संमद सांगितल. मी नको बोलत हुतो तरी तू त्यो दरवाजा उघडला."

पवन ने मुठ्या अवळल्या. अगोदरच तो कालच्या स्वप्नामुळे वैतागला होता.

"नक्कीच काय तरी वंगाळ झालंय ना! नक्कीच काय तरी वंगाळ सपान?" रघु पवनच्या घामाने भिजलेल्या कपड्यांकडे पाहत म्हणाला.

पवन दचकला. ह्याला कसं माहीत?

"तुला जाणवत नसलं तरी मला कळतंय घरात काहीतरी बदल झाला आहे आणि तो बदल चांगला नाही. त्याचेच हे परिणाम हाय. घरावर कसलीतरी अभद्र छाया पडलीया. या छायेखाली मन कसं उदास, खिन्न, निराश, हताश होऊ पाहतं."

"मला तुमचं प्रवचन नकोय. तुमच्या वयाचा मान राखून मी त्या दिवशी गप्प बसलो पण खूप झालं आता. इथून गपचूप निघा नाहीतर उगाच मला माझी मर्यादा ओलांडावी लागेल." पवन रागावून म्हणाला.

"तुला आता कळणार नाही मी काय बोलतोय. ही दाढी ही केस उगाच पांढरी नाय झाली. मी घर घ्यायच्या आधी भी तुला समजावलं हुत, ज्या दिवशी ह्या घरात आला तवा बी ताकीद दिली. पर तू काय ऐकायला तयारच नाय. तू नुसता दरवाजा नाय उघडला. मृत्यूचा दरवाजा उघडलाय. लवकर या घरात परत मृत्यू तांडव करल. तू माझ्याकडं येशील पण लय उशिर झाला असलं त्यावेळी." रघु ने तोंडातून आग ओकली. त्याचे हात पाय रागाने थरथरत होते.

एक क्षणासाठी पवन पण घाबरला. आपण काय बोललो त्याचा विचार करू लागला. तोपर्यंत रघु निघून गेला होता.

पवनला काही सुचत नव्हतं. काही वेळ तो सोफ्यावर बसून होता. त्याला स्वतःच्या घामाचा वास जाणवला तसा तो उठला. पवन विचार करू लागला. न्हानी घरात जाऊन त्याने हात पाय तोंड धुतले. त्याला अंघोळीसाठी वेगळा वेळ हवा होता. सगळी काम आटपून अंघोळ करू या विचाराने त्याने स्वतःची खोली आवरली, सुबोध ला उठवलं, त्याचं पण आवरलं,त्याची पण खोली आवरली.

आपले घामाचे कपडे उतरवून पवन शॉवर खाली उभा राहिला. पाण्याचा वर्षाव होताच त्याला हलकं वाटलं. त्याने एक नजर बाथटब टाकली. अस वाटलं त्यात पाणी भरून स्वतःला त्यात बुडवून घ्यावं. तासनतास तास त्यात पडून राहावं. पण वेळ नव्हता. आज त्याला शहरात जायचं होतं. ऑफिस मध्ये काही कामे होती. कदाचित घरी यायला रात्र होईल. तो तसाच आजच्या दिवसाचा विचार करत पाण्याच्या धारांखाली उभा राहिला.

म्हाताऱ्या राघूचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. नक्कीच काय तरी वंगाळ सपान?... घरावर कसलीतरी अभद्र छाया पडलीया... या छायेखाली मन कसं उदास, खिन्न, निराश, हताश होऊ पाहतं...या घरात परत मृत्यू तांडव करल.

त्याने वैतागून नळ बंद केला. टॉवेल गुंडाळून तो आपल्या खोलीकडे निघाला होता तेवढ्यात त्याला घरच्या बाहेर, प्रवेशद्वारातून आत येताना कोणी तरी दिसलं. हातात बॅग घेऊन कोणी तरी येत होत. तो दरवाज्या जवळ गेला. त्याने नीट पाहिलं. अझलान! तो अझलान होता. तो आता उंबरठ्यावर वर आला होता. त्याला पाहताच पवन त्याच्या कडे खेचला गेला.

अझलान आत पाय टाकणार तेवढ्यात पवन ने त्याला मिठी मारली. अझलान काही पवन च्या मिठीत मावला नाही पण पवन ने त्याला घट्ट मिठी मारली होती. तो जवळजवळ त्याच्या ओठांच चुंबन घेणार होता, पण त्याच्या लक्षात आलं की सुबोध पण दिवाणखान्यातच आहे.

"तू टॉवेल वर काय, नागड्याने जरी माझं स्वागत केलं तरी माझा राग जाणार नाही." अझलान त्याच्या कानात खुसपुसला. कदाचित ते पवन ने ऐकलं नाही.

"तू अचानक कसा आलास? मला कळवायचं ना! मी.. मी आलो असतो घ्यायला तुला." पवन बाजूला होत म्हणला.

"मी म्हणलेलो लवकरच येईल." अझलान शांतपणे म्हणला.

"पण सांगायचं ना की आज येणार आहेस." पवन म्हणाला.

"मी काल रात्री तुला खूप कॉल,मेसेज केले पण रिप्लाय नाही मग मी आलो सरळ इथे."

"तुला पत्ता कसा माहीत इथला?" पवन चटकन बोलून गेला.

"तू सांगितलं होतास चॅट वर! मी आपला चॅट तपासला त्यात मिळाला. नाही तर मला हॉटेल वर थांबव लागलं असत." अझलान दात खात म्हणाला.

"खरंच सॉरी. काल रात्री खूप गाढ झोप लागली आणि त्यात... "तो बोलता बोलता थांबला. कारण पाठी सुबोध होता.

पवन ने अझलानला आत बोलवलं. त्याला सोफ्यावर बसवलं. तो पण स्वतः तयार होऊन आला. तोपर्यंत सुबोध त्याच्याकडे एक टक पाहत होता.

आझलान होताच असा कोणी ही त्याच्याकडे पाहत बसेल. पहिलवानाला पण लाजवेल अशी भरगच्च शरीरयष्टी. त्याला शोभेल असा आवाज. नजर पडताच डोळ्यात भरते ती त्याची गोल पसरट छाती. एखाद्या गोल खांबा सारखे पाय. इथल्या वातावरणा मुळे त्याचे लाल झालेले गाल, लाल ओठ, जाड भुवया त्याखाली सुरमा घातलेले डोळे. त्याची आणि अझलानची नजरानजर होताच एक स्मितहास्य तो देत. सुबोध जरा कचरत होता त्याच्याशी बोलायला.

"हा माझा सर्वात जवळचा मित्र, अझलान" पवनने सुबोध ला ओळख करून दिली. "आणि हा माझा पुतण्या सुबोध."

अझलान ला अंदाज आला की पवन ने अजून सुबोध ला त्यांच्या नात्याबद्दल खरं सांगितलं नाही.

"हो मी याचा सर्वात जवळचा मित्र" अझलान हात पुढे करत सुबोध ला म्हणाला. सुबोध ने त्याच्याशी हात मिळवला. सुबोध ला जरा वेगळंच वाटलं. त्याचा स्पर्श उष्ण होता. सगळ्यांच चहापाणी झालं. पवननेच केलेला चहा.

त्याने अझलान ला स्वतःच्या खोलीत नेलं. ते एकत्रच राहणार होते. खोलीत जाताच अझलान बॅग फेकली आणि पवनवर झडप टाकली. वेड्यासारखा दोघे एकमेकांना बिलगले. एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करू लागले. जणू खूप वर्षांनी दोघांची भेट झाली होती. पण जास्तीतजास्त काही महिने झाले असतील. अझलानने आपला हात पवनच्या प्यांट मध्ये टाकला. त्याचा लंड तो चापचू लागला.

नेहममीकडक असणारा आठ इंचाचा दांडा खूप वेळ झाला तरी एका वाळक्या काडी प्रमाणे होता. खूप वेळ झालं तो निर्जीवच राहिला. अझलानला अचानक अस वाटलं की आपणच त्याच्या तोंडात तोंड घालतोय, त्याच्याकडून काही प्रतिसादच नाही! अझलान थांबला पवन कडे बघू लागला.

"काय झालं?" अझलान ने विचारलं.

"मला...मला काही सुचत नाही काय बोलू." पवन चाचरत म्हणाला.

"काही काळजी करू नकोस मी आलोय ना!" एवढं बोलुन अझलान ने त्याला मिठीत घेतलं. काही क्षण ते तसेच राहिले. पवनचा चेहरा पाहिला. डोळ्यात तेज नव्हतं. चेहरा तुकतुकीत नव्हता. काळी वर्तुळ निर्माण झाली होती. त्याच्यातून जणू कोणी हळूहळू त्याची शक्ती शोषून घेते होत.

"मला निघायला हवं. आज ऑफिस मध्ये बोलवलं आहे." पवन बाजूला सरत म्हणला. "मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आपण बाहेर जाऊ जेवायला."

"नको! तू येणार केव्हा परत आणि आपण जाणार केव्हा." एकच गाडी असल्याने अझलान म्हणाला. "मी बघतो तू नीट जा!"

पवन आवरून ऑफिस साठी निघून गेला. इकडे सुबोध आणि अझलान दोघे पण घरी. दोघांची काही ओळख नसल्यामुळे एक अस्वस्थता होती घरात.

अझलान घरात फिरत घर बघत होता. त्याची पण नजर त्या दरवाजा वर पडली. त्या वर विचित्र प्रकारे कोरलेले वर्तुळ त्याचे लक्ष खेचत होते. या वेळी तो दरवाजा उघडा होता आणि त्याच्या पार ते जंगल. काही जागा असतात त्या नजर खिळवून ठेवण्यासाठीच.

अझलान पण टक लावून बाहेर बघत बसला.अन सुबोध त्याला. अझलानचा फोन वाजला आणि सुबोध ने नजर दुसरीकडे फिरवली.

"मी आजच पोहोचलो आहे. अजून तरी बोलणं झालं नाही पण लवकरच मी विषय काढेल आणि कागदपत्रे हस्तगत करेल."अझलानच फोनवरील संभाषण ऐकून सुबोध आवाज न करता आपल्या खोलीकडे सरकला.

क्रमशः

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

लस्ट इन फॉग सिजन 02 भाग 01 लस्ट इन फॉग सिजन1 मधील घटनांची उकल!in Gay Male
एकमेव साक्षीदार - भाग 01 समलैंगिक शृंगारिक रहस्य खुन (मर्डर मिस्ट्री) कथा!in Gay Male
किशोर आणि नरेश जेव्हा दोन भाऊ खूप वर्षा नंतर भेटतात.in Gay Male
कुशलची कहाणी भाग १ कुशल आणि त्याच्या मित्राच्या वडिलांची गोष्ट!in Gay Male
कुशलची कहाणी भाग २ कुशल आणि त्याच्या मित्राच्या वडिलांची गोष्ट!in Gay Male
More Stories