Secret Desire

Story Info
Marathi Erotic Story.
35.9k words
4.35
47.9k
4
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

सुप्त इच्छा

माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप्त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाहिजे असेही काही नाही. तरी पण जर त्या पुर्ण झाल्या तर त्याला काय म्हणायचे? मी नेहमी विचार करते की त्या दिवशी मी सोनालीकडे जर गेले नसते तर जे काही घडले ते घडले असते का?

सोनाली माझी जिवलग मैत्रिण! अगदी शाळेत असल्यापासून आमची गटटी जमली ती आजपर्यंत कायम आहे. वयाने आम्ही दोघी सारख्याच आहोत आणि आमचे जीवनही पहिल्यापासून सारखेच आहे. आमचा स्वभाव मिळता-जुळता आहे, आमच्या आवडी-निवडी सारख्या आहेत. मी जितकी मनमिळाऊ स्वभावाची होते त्यापेक्षा सोनाली थोडी जास्तच खुल्या स्वभावाची होती. शाळा आणि नंतर कॉलेज आम्ही एकत्रच केले. स्टडी, स्पोर्ट्स, पिकनिक, सिनेमा, पार्टी वगैरे सगळे आम्ही दोघी एकत्रच करत असे. आयुष्यातल्या अनेक पहिल्या गोष्टी आम्ही एकत्रच केल्या आहेत. डिग्री घेतल्यानंतर आम्ही दोघी एकाच कंपनीत जॉब करायला सुरुवात केली.

बाय द वे... माझे नाव मृणाल आणि मी ३२ वयाची जॉब करणारी एक गृहिणी आहे. माझ्याच नावाची जी एक मराठी अभिनेत्री आहे तिच्यासारखीच मी दिसायला आहे. गोरा रंग, गोल चेहरा आणि किंचीत भरलेली अंगकाठी असे बरेचसे साम्य त्या अभिनेत्रीत आणि माझ्यात आहे. आणि योगायोग पहा की सोनाली सुद्धा तिचेच नाव असलेल्या सिनिअर मराठी अभिनेत्रीसारखीच दिसायला आहे. आम्हाला ओळखणारे बहुतांशी लोक आम्हाला त्या अभिनेत्रींसारखेच समजतात. त्या दोन अभिनेत्री प्रत्यक्षात मैत्रिणी आहेत की नाही ते आम्हाला माहीत नाही पण आम्हाला दोघींना त्या दोघींच्या नावाची जोडी म्हणुनच सगळे बोलत असतात.

माझा स्वभाव खेळकर होता. मी घरात बसणारी, लाजरी बुजरी गृहणी नव्हते तर थोडी बिनधास्त अशी, बाहेर फिरणारी किंचीत डॅशिंग अशी होते. मला माणसे आवडतात आणि नवनवीन लोकांबरोबर ओळख करुन घ्यायला, त्यांच्याशी मिळुन मिसळुन वागायला आवडते. फंक्शन, पार्टी आणि प्रोग्राम अटेंड करायला मला आवडते आणि मी ते पुर्ण एंजॉय करते. आणि माझ्या ह्या लाईफ-स्टाईलमध्ये मला सोनालीची फूल कंपनी मिळते. म्हटले तर मी मुक्त स्वभावाची होते पण स्वछंदी नव्हते. पहिल्यापासून अनेक मुले आणि पुरुषांशी माझी मैत्री होती पण त्यांच्याशी असलेल्या रिलेशनमध्ये, वागण्या-बोलण्यात, मी कधी मर्यादा ओलांडली नाही.

मी दिसायला सुंदर होते आणि म्हटले तर सेक्सीही होते. पण मी कधी कोणाशी कोठले सेक्स्युअल रिलेशन प्रस्थापित केले नाही की कधी कोणाला त्याची हिंटही दिली नाही. त्यामुळेच माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्या मुलांशी, पुरुषांशी माझी फक्त निखळ मैत्री होती. याचा अर्थ असा नव्हता की माझे सेक्स्युअल फिलिंग विक होते किंवा सेक्स्युअली मी ॲक्टिव नव्हते. लग्नाआधी मी स्वत:चे समाधान स्वत: करत होते आणि लग्नानंतर माझ्या नवऱ्याकडुन स्वत:ची तृप्ती करुन घेत होते.

योगायोग काय असेल तर असो पण माझे आणि सोनालीचे लग्नही एकाच वर्षी एका विशिष्ट महिन्यात ठरले. माझी एंगेजमेंट 'मनोज'शी झाली आणि सोनालीची एंगेजमेंट 'सागर'शी झाली. आम्ही दोघी तर म्हणत होतो की आमचे लग्नही एकाच दिवशी एकाच हॉलमध्ये व्हावे. पण त्याबाबतीत बाकी योगायोग जुळला नाही व तसे काही घडले नाही. म्हणजे तसे घडायचा पुर्ण योगायोग होता पण माझा होणारा नवरा 'मनोज' ह्याचा बिझनेस आड आला आणि आमच्या लग्नाची तारीख ५ महिने पुढे ढकलली गेली. त्यामुळे सोनालीचे लग्न माझ्या लग्नाच्या ५ महिने आधी झाले. लग्नाच्या बाबतीत ती मला सिनिअर ठरली!

तिच्या लग्नानंतर जेव्हा केव्हा आम्ही दोघी एकांतात बोलत असू तेव्हा ती तिच्या मॅरिड लाईफबद्दल बोलायची आणि अर्थात तिच्या सेक्स लाईफबद्दल बोलायची. तिच्या सांगण्यावरुन कळायचे की तिचा नवरा, सागर हा सेक्समध्ये एक्सपर्ट होता आणि तिला तो भरभरून कामसुख द्यायचा. प्रणयाची वेगवेगळ्या प्रकारे मजा कशी लुटायची हे त्याने सोनालीला दाखवले होते आणि संभोगाचा मनमुराद आनंद ते दोघे लुटत होते. म्हणजे आमचे एकदम काही डिटेलमध्ये बोलणे व्हायचे नाही पण सुचकपणे आणि चावटपणे आम्ही जे काही बोलायचो त्याने मला माझ्या हनीमुनची आणि प्रणय जीवनाची उत्सुकता लागली होती.

सोनालीच्या लग्नानंतर ५ महिन्यांनी शेवटी एकदाचे माझे लग्न मनोजशी झाले! लग्नानंतरची आमची पहिली रात्र मी अपेक्षा केली होती तशी अविस्मरणीय होती! लग्न ठरल्यापासुन ते होईपर्यंतच्या ५ महिन्यात आमची चांगली ओळख झाली होती तेव्हा पहिल्या रात्री आमच्यात काही संकोच नव्हता. पण स्त्री-सुलभ लज्जेने म्हणा मी थोडी नर्व्हस होते आणि मनोजने ते बरोबर ओळखले. मनोज खुप समजुतदार आणि प्रेमळ होता. त्यामुळे पहिल्या रात्री त्याने सेक्स करण्यास मला फोर्स केला नाही की कसला दबाव माझ्यावर आणला नाही. त्या रात्री आम्ही खुप गप्पा मारल्या आणि एकमेकांची आवड-निवड, एकमेकांच्या कल्पनांबद्दल जाणुन घेतले. आमची पहिली रात्र आम्ही मनसोक्त गप्पा मारत, एकमेकांना मिठीत घेवुन, एकमेकांना हळुवारपणे कुरवाळत, किसींग करत घालवली. त्याने मी खुप खुष झाले आणि मनोजबद्दलचा माझा आदर वाढला!

दुसऱ्या दिवशीच्या रात्री आम्ही खऱ्या अर्थाने प्रणय केला आणि आमचे वैवाहिक कामजीवन संपन्न केले. मी ज्याची आणि जशी कल्पना केली होती त्यापेक्षा जास्त संस्मरणीय असा आमचा प्रणय-संभोग झाला. मनोज हळुवारपणे प्रेम करणारा प्रियकर होता. त्याने नाजुकपणे मला हातळत प्रणयसुख घेतले आणि मलाही भरभरून सुख दिले. आणि मग प्रणयसुखाची ही उधळण पुढे ५/६ महिने चालु राहिली. मनोजच्या बिझनेसमुळे आम्ही 'हनीमुन' ट्रिप म्हणुन कोठे गेलो नव्हतो पण घरातच रोज रात्री आमचा हनीमुन साजरा होत होता. सगळे जीवन कसे प्रसन्न आणि प्रफुल्लित होते. रोज रात्री मिळणारे प्रणयसुख हे आसक्तीने भरलेले आणि शरीरातील कामभावना चेतवणारे होते. जितके जास्त सुख मी मनोजकडुन घेत होते तितके जास्त मला ते हवेहवेसे वाटत होते.

पण म्हणतात ना 'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो'... तसे लग्नानंतरच्या ६ महिन्यांनी मनोज आपल्या बिझनेसमध्ये बिझी होत गेला. त्याचा बिझनेस नवीन असल्याने आणि त्याला त्यात जम बसवायचा असल्याने तो जास्तच कामात गुरफटत गेला. त्याच्या बिझनेसचा संबंध वेगवेगळ्या शहराशी असल्याने तो वरचेवर बिझनेस टूरवर जावु लागला आणि बरेचदा घराबाहेर राहू लागला. लग्नानंतर आम्ही स्वतंत्रच रहात होतो आणि मनोज टूरवर जावु लागल्याने आता मी घरी एकटीच राहु लागले. नशीब सोनालीसारखी मैत्रिण मला होती आणि मी जॉब करत होते. त्यामुळे माझा बराचसा वेळ सोनालीच्या सोबतीत जावु लागला.

सोनालीचा नवरा सागर एका कंपनीत मोठा मॅनेजर होता. तो सुद्धा बिझनेस टूरवर जायचा पण माझ्या नवऱ्यापेक्षा तरी कमीच टूरवर जायचा. आमचे नवरे टूरवर गेले असले की सोनाली आणि मी मोस्टली एकत्रच वेळ घालवायचो. आमच्या गप्पांमध्ये अनेक विषय असायचे आणि त्यातला एक म्हणजे आमचे सेक्स्युअल लाईफ. मग आमचे नवरे काय आणि कशी प्रणयसुखाची उधळण करतात ह्यावर आमच्या गप्पा होत असत.

मोस्टली सोनाली तिच्या नवऱ्याचा रसिकपणा आणि वेगवेगळ्या प्रकारे मजा घ्यायच्या गंमतीजमती सांगत रहायची. सोनाली अगदी उत्साहाने सांगायची की ती आणि सागरने सेक्सचा कोठला कोठला प्रकार ट्राय करुन पाहिला आहे. ती सांगायची की सेक्सच्या बाबतीत सागर किती ऑब्सेस होता आणि सेक्समधले अनेक विचित्र चावट प्रकार करण्यात तो कसा उत्साही असायचा. आणि ते चावट प्रकार करण्यात त्याला साथ देताना सोनालीलाही अनोखे सुख मिळायचे.

जेव्हा मी तिला विचारले की कोठले विचित्र चावट प्रकार सागर करतो तर तिने सांगितले की ते दोघे एकत्र बसुन 'ब्लू-फिल्म' बघतात आणि एकमेकांना कुरवाळत, चेतवतात. मग तो ब्लू-फिल्ममध्ये पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या पोजीशनमध्ये तिच्याशी संभोग करतो. सोनालीकडे सांगण्यासारखे भरपूर असायचे कारण तिचा नवरा सागर होताच एकदम काम-रसिक. नाही म्हटले तरी तिचे ऐकुन मी खाली थोडी ओली व्हायचे. मोस्टली मी फक्त ऐकण्याचे काम करायचे. निव्वळ कमीपणा नको म्हणुन मी माझा नवरा मनोजच्या न केलेल्या गंमतीबद्दल खोटे खोटेच सांगायची.

माझ्या लग्नाला आता ५ वर्षे झाली आहेत आणि सर्वसाधारण हायर मिडल-क्लास जोडप्याप्रमाणे आमचे मॅरिड लाईफ सुखी आणि समाधानी(?) होते. लग्न झाल्यानंतर सर्वसाधारण जोडप्याप्रमाणे आम्ही जेथे आठवड्यातुन चार वेळा प्रणयाचा आनंद लुटायचो ते प्रमाण नंतर आठवड्यातुन दोनदा किंवा एकदा असे झाले. हल्ली तर आम्ही दर दोन आठवड्यातुन क्वचित एकदा प्रणयाचा आनंद घेत होतो. अर्थात त्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती कारण मी सोशिक होते. मनातुन मी खटटु असायचे की सोनालीच्या नवऱ्यासारखा रसिकपणा माझ्या नवऱ्याने टिकवला नव्हता आणि तिचा नवरा करतो तसे माझ्या नवऱ्याने करावे अशी 'सुप्त इच्छा' मनात घर करुन रहायची.

*****

एकदा असेच ऑफीस सुटल्यानंतर मी सोनालीबरोबर तिच्या घरी कॉफी प्यायला गेले होते. तिचा नवरा सागर ऊशीरा घरी येणार होता आणि माझा नवरा मनोजबद्दल तर काय सांगायचे? टूरवर गेलेला नसला तरी गेल्यासारखाच होता. म्हणजे ऊशीरा घरी येणे पाचवीला पुजल्यासारखे होते. सोनालीच्या घरात हॉलमध्ये बसुन आम्ही कॉफी पित होतो तेव्हा मध्येच सोनाली स्वत:शीच हसली.

ते पाहुन मी तिला विचारले, "काय ग... एकदम असे हसायला काय झाले?"

सोनाली हसत म्हणाली, "काही नाही ग... असेच काहितरी आठवले आणि हसूं आले..."

ते ऐकुन मी उत्सुकतेने म्हणाले, "तु चावटपणे हसतेय म्हणजे नक्कीच काहितरी सागरच्या चावटपणाशी रिलेटेड असेल... हो ना?"

सोनाली हसूं दाबत म्हणाली, "अगदी बरोबर! तु कसे ओळखलेस?"

मी हसुन म्हटले, "तु हसलीसच अशी की मी सहज ओळखले की सागरने काहितरी वेगळा चावटपणा केला असावा... काय ते सांग ना मला..."

सोनाली उत्साहाने सांगायला लागली, "अग, दोन दिवसापुर्वी सागरने ब्लू-फिल्मची एक नवीन डिव्हिडी आणली आहे. त्या डिव्हिडीची आठवण आली आणि गंमत आठवुन मला हसूं आले. इथे हॉलमध्येच आम्ही ती डिव्हिडी पाहुन खुपच एक्सायटींग संभोग केला होता."

"हंम्म्म्म... नवीन डिव्हिडी काय... तुला आठवुन इतकी गंमत वाटतेय म्हणजे नक्कीच इंटरेस्टिंग असणार... सांग ना मला... काय होते त्या डिव्हिडीमध्ये?" मी उत्सुकतेने विचारले.

"आता काय सांगु तुला?... ते सांगण्यासारखे नाही तर बघण्यासारखे आहे. तुला इतका इंटरेस्ट वाटतोय तर दाखवू का तुला ती डिव्हिडी?" सोनालीने अचानक म्हटले.

"चल काहितरीच काय... अशी कशी मी डिव्हिडी बघु??" मी गडबडत म्हणाले.

"मग काय झालं... तु तर म्हणालीस की मनोज तुला पण अश्या डिव्हिडी दाखवतो म्हणुन... आणि तुम्ही पण कधी कधी डिव्हिडी बघुन सेक्स करता..." सोनाली म्हणाली.

"हो ग... अग पण... ते... आम्ही दोघे असतो तेव्हा ना...," मी भांबावत उत्तर दिले.

खरे तर मी कधीही मनोजबरोबर ब्लू-फिल्म पाहिली नव्हती की ब्लू-फिल्म पाहुन आम्ही कधी संभोग केला नव्हता. ते तर मी तिला असेच अनेकदा खोटे खोटे सांगितले होते. पण आता ती मला सोडायला तयार नव्हती.

"अग मनोज नसला म्हणुन काय झालं... मी आहे ना...," सोनाली लाडात येवुन मला डोळा मारत म्हणाली, "तसेही बरेच दिवस आपण एकत्र 'गंमत' केलेली नाही..."

तिचे बोलणे ऐकुन माझा चेहरा लाजेने लाल झाला आणि मी लाजुन हसलें. सोनाली माझ्या लाजण्याला माझी संमती समजली आणि पटकन डिव्हिडी लावायला उठली. ती खरोखर डिव्हिडी लावायला चाललीय हे पाहुन माझी छाती धडधडायला लागली आणि मी हडबडत तिला म्हणाले,

"अग ये... काय करतेस?... तु खरोखर ती डिव्हिडी लावतेस की काय?... अग पण... मी... कसे..."

"ओह मृणाल... असे काकुबाईसारखी बोलू नकोस हं... आपले नवरे असतील तरच आपण मजा घेतली पाहिजे का? असे काही नाही ग... नो मॅटर व्हाट... आपण त्यांच्याशिवाय पण मजा करु शकतो..." असे बोलुन सोनाली वॉल युनीटजवळ जावुन डिव्हिडी चालु करू लागली.

"अग पण सागर आला तर?" मी शंकेने विचारले.

"तो नाही येणार इतक्यात... अजुन २ तास तरी तो येणार नाही... तेव्हा डोन्ट वरी ॲन्ड रिलॅक्स... जस्ट एंजॉय..."

असे बोलुन सोनालीने ती डिव्हिडी लावली आणि ती माझ्या जवळ येवुन सोफ्यावर बसली... माझी नजर टिव्ही स्क्रिनवर खिळली आणि मी मागे बॅकरेस्टला रेलुन रिलॅक्स झाले... डिव्हिडी चालु झाली आणि पहिला सीन स्क्रिनवर आला. एक स्त्री टिव्ही स्क्रिनवर ब्लू-फिल्म पहात स्वत:ची कामतृप्ती स्वत: करुन घेत होती. ती पुर्ण नग्न होती आणि एक डिल्डो घेवुन तो आपल्या मदनदाण्यावर घासत होती तर आपल्या योनीत घालत होती...

तिच्या चेहऱ्यावर एक कपडा येतो आणि तिचे डोळे बांधले जातात. आणि मग एक नग्न पुरुष स्क्रिनवर दिसतो जो त्या स्त्रीला हळुवारपणे कुरवळायला लागतो आणि तिला कामोत्तेजीत करायला लागतो... मी भान हरपून तो सीन बघत होते आणि माझ्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. नकळत माझ्या योनीला पाणी सुटायला लागले होते आणि मी तापायला लागले होते.

अचानक एका स्पर्शाने मी दचकले! मग माझ्या लक्षात आले की सोनाली मला चिटकुन बसली होती. मी वळुन फक्त तिच्याकडे पाहिले आणि आम्ही दोघी एकमेकींकडे पाहुन सुचकपणे हसलों. मग मी पुन्हा स्क्रिनवर पहायला लागले. मी स्कर्ट घातला होता आणि रिलॅक्स होवुन बसल्याने माझा स्कर्ट गुढग्याच्या वर सरकलेला होता. सोनाली माझ्या मांडीवरुन हात फिरवायला लागली आणि मी पण तिच्या मांडीवरुन हात फिरवू लागले... तिनेही स्कर्ट घातलेला होता पण तिचा स्कर्ट तिने बराच वर केलेला होता.

स्क्रिनवरील तो पुरुष त्या स्त्रीची योनी चाटायला आणि चोखायला लागला... तसे माझ्या योनीतुन कामसलील झिरपायला लागला... नकळत मी मांड्यांची हालचाल करु लागले आणि सोनालीचा माझ्या मांड्यांवर फिरणारा हात बरोबर माझ्या जांघेकडे जावू लागला... सोयीस्कर पडावे म्हणुन सोनालीने माझ्या मांडीवरील हात काढला आणि वर आणुन माझ्या मानेमागुन माझ्या दुसऱ्या खांद्यावर टाकला. मला जवळ ओढुन तिने माझे लक्ष तिच्याकडे वेधुन घेतले आणि जसे मी तिच्याकडे पाहिले तसे तिने आपले ओठ माझ्या ओठांवर ठेवले

आता सोनाली मला उत्कटपणे किस करू लागली लागली आणि न रहावुन मी पण उत्सुकतेने तिला साथ देवु लागले... सोनालीचा दुसरा हात आता माझ्या मांडीवर फिरू लागला आणि तेथे जास्त न रेंगाळता तो माझ्या जांघेत शिरू लागला... मी पण तिच्यासारखे करत तिच्या मांडीवरील माझा हात फिरवत तिच्या जांघेत नेवू लागले... ती डिव्हिडी पहात असताना आम्हा दोघींची कामोत्तेजना भडकत होती आणि त्या भरात आम्ही एकमेकींना स्पर्श करत होतो.

अचानक स्क्रिनवरील स्त्रीने एक मादक हुंकार सोडला तसे आम्ही किस करायचे थांबवत स्क्रिनवर पाहिले. स्क्रिनवरील पुरुषाने आपली जीभ त्या स्त्रीच्या योनीत घातली होती आणि जीभेने तो तिला भोगायला लागला... न रहावुन माझा हात सरळ सोनालीच्या जांघेत गेला आणि तिच्या योनीवर दाबला गेला. सोनालीनेही तेच करत तिचा हात माझ्या योनीवर दाबला. सोनालीची पॅन्टीही माझ्या पॅन्टीसारखी ओली झाली होती. म्हणजे माझ्याप्रमाणेच ती सुद्धा पाझरत होती. एकमेकींच्या पाझरत्या योनीला पॅन्टीवरून कुरवाळत आम्ही दोघी स्क्रिनवरील उत्तेजक द्रुश्य पाहू लागलो.

स्क्रिनवरील स्त्री आता बेभान झाली होती आणि ती त्या पुरुषाचे डोके धरुन आपल्या योनीवर दाबत खालुन वर धक्के देवु लागली. ते पाहुन सोनाली चेकाळली आणि तिने सरळ माझी पॅन्टी माझ्या योनीवरुन बाजुला करत आपले एक बोट माझ्या योनीत घातले. आई ग! माझा जीव कासावीस झाला तिच्या ह्या हालचालीने. मी पण तिचे अनुकरण करत तिच्या योनीवरील पॅन्टी बाजुला करत माझे बोट तिच्या योनीत घातले. मग आम्ही दोघी एकमेकींच्या योनीत बोट आत-बाहेर करू लागलो...

स्क्रिनवर आता तो पुरुष त्या स्त्रीच्या पुढे जावुन उभा राहिला आणि त्याने आपले लिंग त्या स्त्रीच्या तोंडावर ठेवले. अधाश्यासारखे ती स्त्री त्याचे लिंग आपल्या तोंडात घेवुन चोखायला लागली. नकळत आम्हा दोघींची बोटे एकमेकींच्या योनीत अजुनच घुसली आणि जितक्या आसक्तीने स्क्रिनवरील स्त्री त्या पुरुषाचा लंड चोखत होती त्याच आसक्तीने आम्ही दोघी एकमेकींची योनी खोदू लागलो. पुन्हा एकदा आमची तोंडे एकमेकींना भिडली आणि आम्ही दोघी एकमेकांची जीभ चोखायला लागलो. एकमेकींची जीभ चोखताना वर आम्ही पेटलो होतो की खाली आमच्या योनीत आग लागली होती ते कळत नव्हते पण दोन्हीकडे आम्ही होरपळत होतो.

अचानक सोनालीने माझ्या योनीवरील मदनमण्याला छेडले आणि माझ्या अंगाला एक झटका बसला. मग ती माझ्या मण्याशी खेळू लागली आणि मी कंबर हलवू लागले. सहाजिकच मी पण तिच्या योनीवर तेच केले. मी पण तिचा मदनमणी छेडायला लागले आणि ती पण आपली कंबर हलवायला लागली. खुप काळानंतर मी असे सोनालीशी शारिरीक लगट करत होते आणि कामोत्तेजनेचा वेगळा आनंद घेत होते. माझ्या अंगातुन कामलहरी अश्या वहात होत्या की माझे अंग किंचीत थरथरत होते. तिची अवस्थाही वेगळी नव्हती आणि ती सुद्धा माझ्यासारखीच कामोत्तेजना अनुभवत होती.

अचानक स्क्रिनवरील स्त्रीचे जोरजोराचे हुंकार ऐकायला यायला लागले तसे परत आम्ही स्क्रिनकडे बघितले. आता तो पुरुष त्या स्त्रीच्या योनीत आपले भले मोठे लिंग घालुन तिला भोगायला लागला होता... आम्ही दोघीही एकमेकींची योनी बोटाने भोगत होतो आणि भान हरपून स्क्रिनकडे पहात होतो... जसे स्क्रिनवर त्यांचा संभोगाचा वेग वाढला तसे येथे आमच्या बोटांचा स्पीड वाढला. बघता बघता माझी कामवासना शिगेला पोहचायला लागली. सोनाली ज्या तऱ्हेने कंबर हलवत होती त्यावरुन कळत होते की ती सुद्धा जास्त मागे नव्हती.

मला मग सहन झाले नाही आणि दबकी किंचाळी मारत मी कामतृप्त व्हायला लागले. झोपाळ्यावर बसुन उंच भरारी मारल्यानंतर खाली येताना जसे हलके झाल्यासारखे वाटते तसे मला वाटायला लागले... कंबर हलवुन हलवुन मी सोनालीच्या बोटावर कामरत होत होते. माझ्या मागे एका मिनीटाने सोनालीचाही कडेलोट झाला आणि ती सुद्धा झडायला लागली. आम्ही दोघीही कंबर हलवत होतो आणि एकमेकींना तृप्तीचा आनंद देत होतो, घेत होतो. कंबर हलवुन, झडुन आम्ही दोघीही किंचीत थकलो आणि रिलॅक्स होवुन पडुन राहिलो.

स्क्रिनवर त्या स्त्री-पुरुषाचा उत्तेजक सेक्स चालुच होता आणि आता तो पुरुष त्या डोळे बांधलेल्या स्त्रीला वेगवेगळ्या पोजीशनमध्ये भोगायला लागला... नंतर भानावर आल्यावर सोनाली मला म्हणाली की त्या दिवशी सागरने तिलाही असेच डोळे बांधुन हॉलमध्ये वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या पोजीशनमध्ये भोगले होते. ते ती सांगायला लागली आणि मी पुन्हा तापायला लागले. सोनाली सांगत असलेली त्यांची गंमत आणि स्क्रिनवर चालु असलेला त्या स्त्री-पुरुषाचा संभोग ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे मी पुन्हा कामोत्तेजीत व्हायला लागले.

नंतर मग पुन्हा आम्ही दोघी एकमेकींना चोंबाळु लागलो, घासू लागलो, बोटाने भोगू लागलो... पुन्हा थोड्या वेळाने आम्ही दोघी शिगेला पोहचलो आणि परत एकदा झडलो. जवळ जवळ पाऊणतास आम्ही ती डिव्हिडी बघत होतो आणि एकमेकींना चोंबाळत, तापवत दोन वेळा कामतृप्त झालो. नंतर थकुन आम्ही दोघी तश्याच पडुन राहिलो. मला खुप हलके हलके वाटत होते आणि फार दिवसांनी मला तृप्त झाल्यासारखे वाटत होते.

नंतर मी सोनालीकडे फ्रेश झाले आणि माझ्या घरी निघुन आले. माझ्या डोक्यात ती डिव्हिडी आणि त्यातील प्रसंगच होते. त्या डिव्हिडीमध्ये दाखवले तसे सोनाली आणि सागरनी संभोग केला होता असे तिने सांगितले होते. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्या दोघांची प्रतिमा उभी रहात होती. डिव्हिडीतील दृश्यात मला आता सोनाली आणि सागर दिसत होते आणि त्याची कल्पना करुन मी तापत होते. माझी योनीत सतत पाझरत होती आणि योनीत काहितरी गरम गरम घालुन तिला थंड करावी असे मला वाटत होते.

रात्री मनोज आला की त्याच्याशी मनासारखा संभोग करुन योनीतली आग शांत करुन घ्यायचा मी निश्चय केला. त्याच्याकडुन चांगले कुटून घेवुन तृप्ती करुन घेतली तरच मी शांत होणार होते. तेव्हा रात्री तो यायच्या आधी मी छानपैकी अंघोळ करुन फ्रेश झाले. एक मादक परफ्युम मारुन मी हलकासा मेकप केला. माझे रेशमी मुलायम केस मी अवखळपणे मोकळे सोडले. अंगात सेक्सी अंर्तवस्त्रे आणि एक पारदर्शक सेक्सी गाऊन घालुन मी त्याची वाट पहात बसले.

मनोज घरी आल्यावर माझ्याकडे पहातच राहिला. तो थकलेला होता तरी मला ह्या मादक रुपात पाहुन तो सुद्धा उत्साही झाला. तो अंघोळ वगैरे करुन फ्रेश झाला आणि मग मी त्याला जेवायला वाढले. मी माझ्या प्रत्येक हालचालीत मादकपणा दाखवत त्याच्या अवतीभोवती वावरत होते आणि त्याला माझ्या सेक्सी अदांनी घायाळ करत होते. जेवण झाल्यानंतर सगळे आवरुन आम्ही जेव्हा बेडरुममध्ये आलो तेव्हा मी जवळ जवळ त्याच्यावर झडपच घातली. त्याने मला विचारलेही की आज मी इतक्या सेक्सी मूडमध्ये कशी काय आलेय. मग त्याला अंगावर घेवुन मी किस करू लागले आणि सोनालीकडे मी कशी ती डिव्हिडी पाहिली ते त्याला सांगू लागले...

अर्थात मी मनोजला सांगितले नाही की मी आणि सोनालीने एकमेकींना तृप्त केले ते. मी त्याला इतकेच सांगितले की सोनालीकडे मी कसे ती एक सेक्सी डिव्हिडी पाहिली ज्याने मी इतकी तापली आहे. डिव्हिडीतील सीनचे वर्णन ऐकुन मनोजशी रंगात आला आणि मला उत्कटपणे किस करू लागला. मी त्याच्या अंगावरील सगळे कपडे काढुन भिरकावले आणि त्याच्या लिंगावर हल्ला चढवला. सहसा मी स्वत:हुन कधी त्याचे लिंग तोंडात घेवुन चोखले नव्हते पण त्या दिवशी मी स्वत:हुन त्याला चोखायला लागले. त्याने तो वेडा झाला आणि कामातूर होवुन मला चोंबाळू लागला.

डिव्हिडीमधील सीनबद्दल चर्चा करत मनोज माझ्याशी झुंजायला लागला. अगदी डिव्हिडीमध्ये दाखवले तसे त्याने काही केले नाही पण एका वेगळ्याच जोशात त्याने माझ्याशी प्रणय संभोग केला. त्या रात्री आम्ही दोघे जवळ जवळ दोन अडीच तास प्रणयसुखाचा आनंद लुटत होतो. मनोज दोनदा माझ्यात गळला होता आणि मी तीन वेळा कामरत झाले होते. जितक्या उत्कटपणे त्याने मला भोगले त्याच्या अनेक पट जास्त आसक्तीने मी प्रणयसुख त्याच्याकडुन घेतले.

सोनालीकडे ती डिव्हिडी पाहुन माझ्यातली कामवासना इतकी चेतली होती की माझ्या अंगातील गरमी पाहुन मनोजही अवाक झाला होता! अश्या तऱ्हेने प्रचंड उत्तेजनेचा संभोग या आधी आम्ही कधीही केला नव्हता. माझ्या अंगावर मनोजने केलेल्या बळजबरीचे, चावल्याचे व्रण उठले होते. माझे उभार आणि निप्पल दाबुन चोखुन मनोजने इतके लालीलाल केले होते की ते दुखत होते. माझ्या योनीची तर त्या रात्री पुर्ण वाट लागली होती आणि ती खुप ठणठणत होती. प्रणयाचा उत्कट आनंद घेवुन आम्ही इतके गलितगात्र झालो की तसेच नग्नपणे एकमेकांच्या मिठीत झोपुन गेलो.

दुसऱ्या दिवशी जेव्हा सोनाली आणि मी भेटले तेव्हा रात्री काय घडले ह्याबद्दल आमचे बोलणे झाले. जेव्हा मी तिला सांगितले की आदल्या रात्री मी आणि मनोजने उत्कट संभोगाचा कसा भरभरून आनंद घेतला तेव्हा तिला त्याची मजा वाटली. तिने सांगितले की त्या रात्री तिनेही सागरबरोबर आमच्यासारखाच प्रचंड आसक्तीने भरलेला रांगडा संभोग केला. त्या डिव्हिडीबद्दल आणि आम्ही रात्री घेतलेल्या मनसोक्त मजेबद्दल भरभरून चर्चा केल्यानंतर आम्ही दोघींनी ठरवले की आठवड्यातुन एकदा तरी त्या दिवशीप्रमाणे आम्ही एकत्र डिव्हिडी बघायची आणि रात्री आपापल्या नवऱ्याबरोबर उत्कट सेक्सची मजा लुटायची.

आणि मग आमचे ते एक रुटीन झाले. जेव्हा जेव्हा आमचे नवरे टूरवर गेलेले नसायचे तेव्हा तेव्हा आम्ही संध्याकाळी एकत्र बसुन डिव्हिडी बघुन आमची कामोत्तेजना पेटवुन घ्यायचो आणि रात्री नवऱ्याकडुन ती शमवुन घ्यायचो. कधी आम्ही डिव्हिडी तिच्या घरी पहायचो तर क्वचित कधी माझ्या घरी पहायचो. सेक्समध्ये सागर जास्त रसिक असल्याने तोच नेहमी ब्लू-फिल्मच्या डिव्हिडी घेवुन यायचा. सोनाली त्या डिव्हिडी पहाण्यात आणि त्या पाहुन सेक्स करण्यात जास्तच रस घेवु लागली होती म्हणुन सागर वरचेवर नवनवीन डिव्हिडी आणू लागला होता. डिव्हिडी पाहुन आम्ही दोघी वरवर एकमेकींना सॅटिस्फाय करत होतो पण खरी तृप्ती आमच्या नवऱ्याकडुन चांगले कुटून घेवुन आम्ही करुन घेत होतो. आमच्या हल्लीच्या ह्या उफाळलेल्या कामोत्तेजनेने आणि उत्कट संभोगाने दोघींच्या नवऱ्याची काही तक्रार नव्हती आणि आम्ही सगळेच आनंदी आणि समाधानी होतो.

अर्थात, ब्लू-फिल्ममध्ये दाखवलेल्या सगळ्यात गोष्टी आम्ही करत होतो असे नव्हते. खास करुन मनोज जास्त काही वेगळे करायचा नाही आणि नवनवीन प्रकार ट्राय करायला तो उत्सुक नसायचा. त्यामुळे तो जितके देईल आणि मला जितके घेता येईल तितक्याच सुखावर मला समाधान मानावे लागायचे. सोनाली आणि सागरची गोष्ट वेगळी होती. सागर मुळातच सेक्स-रसिक होता त्यामुळे ते अनेक वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे आणि सोनालीला त्याच्याकडुन नानाविविध प्रकारे कामसुख मिळत होते. कामक्रिडेतल्या आणि कामसुखातल्या काही सुप्त इच्छा माझ्या मनात होत्या ज्या मनोजने पुऱ्या कराव्या असे मला वाटायचे. पण तो ते करत नव्हता आणि मी डिव्हिडीमध्ये पाहून किंवा सोनालीने सागरबरोबर जे केले ते ऐकुन माझे समाधान करुन घेत होते.