Shruti Madam's Visit

Story Info
Marathi Erotic Story.
13.1k words
4.3
32.2k
5
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

श्रुती मॅडमची विजीट

मी लॉगीन करून मेल चेक केले तर इतर मेलबरोबर 'श्रुती मॅडम' चा मेल होता. मेल पाहून मला आश्चर्य वाटले आणि पटकन मेल ओपन करून वाचला...

'तू नेहमी आग्रह करत असतो दुबईमध्ये ये ये तेव्हा मी येत आहे... पुढच्या आठवड्यात आमचे एक 'आय-टी' चे सेमीनर दुबई मध्ये आहे ज्यासाठी मी ४ दिवस दुबईमध्ये येत आहे... एखाद्या हॉटेलमध्ये माझ्यासाठी रूम बूक करून ठेवणे... फ्लाइटचे डिटेल्स मी नंतर कळवते...'

तो मेल वाचून मी एकदम खूष झालो. लगेच तिला रिप्लाय केला...

'यू आर मोस्ट वेलकम!... पण मुलांना सध्या उन्हाळ्याची सुटटी असल्याने रुपाली त्यांना घेवून मुंबईला गेली आहे. तेव्हा ते तुला भेटणार नाहीत. तिचीही फार इच्छा होती की तू कॅनडा-मुंबई जात येत असताना जमलेच तर व्हाया दुबई जावे व काही दिवस आमच्याबरोबर रहावे. एनी वे! तुझे सेमीनार असल्याने तुझे येणे जरूरीचे असणार पण नो प्रॉब्लेम!... मी आहे ना... पण हॉटेल वगैरे काही नाही... माझे एवढे मोठे घर पडले असताना तुला हॉटेलमध्ये रहायची गरज काय??... तेव्हा मी घरी एकटाच आहे... तू आलीस तर चार दिवस मला चांगली कंपनी मिळेल... फ्लाईटच्या डिटेल्सची वाट पहात आहे...'

श्रुती मॅडमला रिप्लाय करून मी तिच्या आठवणीने भुतकाळात हरवलो... श्रुती मॅडमला आम्ही 'मॅडम' म्हणतो कारण तिच्याकडून आम्ही काही सॉफ्टवेअरचे ट्रेनींग घेतले होते. ती आमची टिचर होती तेव्हा तिला आम्ही मॅडम म्हणतो नाहीतर ती काही वयस्कर बाई वगैरे नव्हती. माझ्यापेक्षा फक्त पाच वर्षाने मोठी म्हणजे ३८ वर्षाची होती ती...

साधारण दहा वर्षापुर्वी मी मुंबईमध्ये जॉब करत होतो त्यावेळी श्रुती मॅडमचा नवरा, श्रवण आमच्या ऑफीसमध्ये मॅनेजर होता आणि त्याची आमची चांगली मैत्री होती... आमची म्हणजे मी आणि माझी ऑफीसमधली गर्लफ्रेंड रुपाली, जी आता माझी बायको आहे. नव्वदच्या दशकात जेव्हा कॉम्प्युटरचे प्रस्थ वाढले तेव्हा आमच्या ऑफीसमध्येही नवीन पिसीज घेतले गेले... अकाऊंट्स रिलेटेड सॉफ्टवेअर शिकण्यासाठी जेव्हा आम्ही चौकशी करत होतो तेव्हा श्रवण सर आम्हाला म्हणाला की 'अरे माझी बायको ट्रेनींग देते कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरचे... तुम्हाला हवे असेल तर ती देईल तुम्हाला ट्रेनींग...'

आमची काही हरकत नव्हती तेव्हा आम्ही लगेच 'हो' म्हणालो. मग एक दिवस श्रवण सरांनी मला आणि रुपालीला पार्ल्याला त्यांच्या घरी नेले आणि तेथे श्रुती मॅडम आणि आमची पहिली भेट झाली... ती दिसायला गोरी गोरी आणि सुंदर होती. ऊंची साधारण ५ फूट ४/५ इंच असेल. अंगाने सडपातळ होती पण बारीक नव्हती... केसांचा तिने बॉब-कट केलेला होता तेव्हा ती एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत होती... तिचे डोळे किंचीत घारे होते त्यामुळे ती सेक्सी वाटायची. एकूणच श्रुती मॅडमला पाहून मी इंप्रेस झालो होतो.

मग त्यानंतर रुपाली आणि माझा श्रुती मॅडमबरोबर कॉम्प्युटर क्लास चालू झाला. आठवड्यातून ४ दिवस आम्ही तिच्याकडे क्लाससाठी जावू लागलो. लवकरच आमची चांगली मैत्री होवून गटटी जमली. रुपाली आणि मी एकमेकांच्या प्रेमात होतो आणि लग्न करणार होतो तेव्हा श्रुती मॅडमला आमचे फार कौतुक वाटायचे. काही दिवसातच ती आमच्याबरोबर इतकी क्लोज झाली की आमची फार जुनी मैत्री असल्यासारखे आम्ही वागू लागलो.

श्रुती मॅडम आणि श्रवण सरांचेही लव-मॅरेज होते. श्रवण सरांच्या घरून त्यांच्या लग्नाला विरोध होता तरीही त्यांनी श्रुती मॅडमबरोबर लग्न केले होते आणि ते भाड्याने घर घेवून आपल्या आईवडीलांपासून वेगळे रहात होते. त्यांचे आईवडील पार्ल्यातच रहात होते. कालांतराने त्यांच्या आईवडीलांचा विरोध मावळला पण हे दोघे वेगळेच रहात होते. श्रुती मॅडम सांगायच्या की जरी श्रवण सरांच्या आईवडीलांनी तिचा स्विकार केला होता तरी त्यांच्या मनात अजुनही नाराजगी होती. पण ते वेगळे रहात असल्यामुळे तिला त्यांचा काही त्रास नव्हता.

श्रुती मॅडम दिसायला सुंदर होत्या आणि सेक्सीही होत्या तेव्हा मला खास करून त्यांचा सहवास आवडायचा. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनेकदा लैंगीक विचार आले होते. त्यांच्या सहवासात असताना कोणाच्या नकळत मी अनेकदा त्यांच्या सेक्सी फिगरचे निरीक्षण केले होते. कित्येकदा मी त्यांच्या आठवणीने मूठ मारून विर्यही गाळायचो. त्यांच्याबद्दल मला लैंगीक आकर्षण वाटायला लागले त्याला दोन घटना कारणीभूत होत्या...

एक घटना म्हणजे... एके दिवशी संध्याकाळी मी आणि रुपाली त्यांच्या घरी क्लासला गेलो होतो. त्यांचा कॉम्पुटर त्यांच्या बेडरूममध्ये होता तेव्हा आम्ही तेथे बसून ट्रेंनींग घेत होतो. नंतर श्रुती मॅडमनी त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्हाला काही एक्जरसाईज करायला दिल्या आणि म्हणाल्या की 'तुमचे झाले की मला हाक मारा मग मी येते आणि चेक करते' असे बोलून त्या बाहेर हॉलमध्ये श्रवण सर टिव्ही पहात होते त्यांच्याबरोबर जावून बसल्या.

ॲक्च्युअली ही एकदम नॉर्मल गोष्ट होती. आम्हाला ट्रेंनींग देत असताना जेव्हा त्या आम्हाला काही एक्जरसाईज करायला द्यायच्या तेव्हा त्या बाहेर जावून त्यांची इतर कामे करत असत किंवा हॉलमध्ये बसून टिव्ही वगैरे पहात असत. जर श्रवण सर घरी असतील तर ती त्यांच्याकडे जायची... जेव्हा आमचे काम व्हायचे तेव्हा आम्ही त्यांना हाक मारायचो. मग त्या यायच्या आणि आम्ही केलेले काम चेक करायच्या. तेव्हा त्या दिवशीही त्यांनी आम्हाला काम दिले आणि त्या बाहेर जावून बसल्या...

जेव्हा मी आणि रुपाली एकटे असू तेव्हा मी चान्स मारत रुपालीला अनेकदा चोंबाळायचो. तिचे गालाचे चुंबन घेणे किंवा तिच्या ओठांचे चुंबन घेणे. तिच्या छातीला हात लाव किंवा तिची मांडी किंवा नितंबावरून हात फिरव असे बरेच चाळे मी एकांत मिळाला की रुपालीबरोबर करत असे. रुपालीलाही माझे हे चाळे आवडायचे तेव्हा किंचीत लटका विरोध करत ती मला चाळे करू देत असे... तेव्हा श्रुती मॅडम बाहेर गेल्या की मला आनंद व्हायचा.

असेच त्या दिवशी आम्ही श्रुती मॅडमने दिलेली एक्जरसाईज करताना चाळे करत होतो... रुपाली लटका विरोध करत होती असे म्हणून मी श्रुती मॅडम येतील आणि मी तिला सांगत होतो की ती आपण बोलावल्याशिवाय येणार नाही... शेवटी माझ्या चाळ्यांनी वैतागून रुपाली उठली आणि म्हणाली की 'बाहेर जावून श्रुती मॅडमला बोलावून आणते' मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती पटकन बाहेर पळाली. गेली तशी काही सेकंदात परत पळत आत आली. चेअरवर बसून ती तोंड दाबून हसायला लागली...

"काय झाले?" मी तिला आश्चर्याने विचारले.

"गंमत झाली!..." हसू दाबत रुपाली म्हणाली, " मी बाहेर गेले आणि हॉलकडे चालले होते... मला श्रुती मॅडमचा किंचीत हसण्याचा आवाज आला... म्हणून मी हळूच हॉलच्या दरवाज्याजवळ गेले... दरवाज्याचा परदा ओढलेला होता म्हणून मी परद्या मागून हॉलमध्ये हळूच पाहिले तर श्रवण सर आणि श्रुती मॅडम किसींग करत होते..."

"काय म्हणतेस?..." मी आश्चर्याने म्हणालो.

"अरे खरच... मी तशीच परत आले..." रुपालीने हसून म्हटले. तिचा चेहरा शरमेने लाल झाला होता.

"थांब मी बघून येतो..." असे बोलून मी उठलो तर रुपालीने माझा हात पकडत म्हटले,

"तू कशाला जातोस?... त्यांनी तुला पाहिले तर??"

"नाही बघणार... मी गुपचूप पहातो..." मी म्हणालो.

"अरे पण ते किसींग करताहेत... ते तू कशाला पहातोस?" रुपालीने मला विचारले.

"अग, गंमत म्हणून ग..."

रुपाली तरीही मला थांबवायला बघत होती पण मी पटकन बाहेर आलो... मागे पाहून मी चेक केले तर रुपाली माझ्या मागे आली नव्हती. मग मी दबक्या पाऊलाने पॅसेजमधून बेडरूमच्या दरवाज्याकडे गेलो. मलाही श्रुती मॅडमचा हसण्याचा आवाज येत होता... हळूच पुढे जात मी दरवाज्याजवळ आलो आणि दरवाज्याचा परदा किंचीत बाजूला करत मी आत पाहिले...

आत श्रवण सर सोफ्यावर रेलले होते आणि त्यांनी श्रुती मॅडमना आपल्या मिठीत घेतले होते. ते तिच्या ओठांचे चुंबन घेत होते आणि श्रुती मॅडम हसून त्यांना लटका विरोध करत होत्या... श्रुती मॅडम श्रवण सरांच्या मांडीवर बसल्या होत्या... त्यांचा पुढचा हात, ज्याने त्यांनी तिला पकडले होते, तो मध्ये मध्ये तिच्या छातीच्या उभारावर फिरत होता... तर दुसरा हात तिच्या मांडीवरून फिरत होता... श्रुती मॅडमने स्कर्ट घातलेला होता तेव्हा श्रवण सर तिचा स्कर्ट थोडा वर करून तिच्या मांडीवर हात फिरवत होते... त्याने श्रुती मॅडमची एक मांडी बऱ्यापैकी दिसत होती...

तो सीन पाहून मी गरम होवू लागलो... श्रुती मॅडमबद्दल त्या आधी माझ्या मनात कधी लैंगीक विचार आले नव्हते पण त्याक्षणी त्यांना आपल्या नवऱ्याबरोबर तसे चाळे करताना पाहून माझी त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलून गेली... त्यांचे लटका विरोध दाखवत हसणे, त्यांच्या छातीचे उभार, त्यांची दिसत असलेली एक मांडी पाहून मी कामोत्तेजीत झालो. माझा लंड कडक होवू लागला...

जास्त वेळ मी आतला तो सीन पहात राहिलो तर माझा लंड चांगलाच कडक होईल आणि माझ्या पॅन्टमधला तंबू रुपालीच्या नजरेपासून लपवणे मला कठिण जाईल हे मी ओळखले आणि नाईलाजास्तव तेथून मी निघून आलो. रुपालीने उत्साहाने मला विचारले की मला काय दिसले? मी तिला सांगितले की ते दोघे किसींग करत होते पण मी तिला इतर डिटेल्स सांगितले नाही कारण मग ती मला म्हणाली असती की त्यांचे चाळे मी इतका वेळ का बघत बसलो?

श्रुती मॅडमना तसे पाहून मी एक्साईट झालेलोच होतो तेव्हा मग मी रुपालीला मिठीत घेतले आणि उत्कटपणे तिला किसींग करू लागलो... किसींग करता करता मी रुपालीचे उभार कुस्करू लागलो... किसींग करता करता रुपालीच्या डोळ्यात किंचीत आश्चर्य होते की मी इतका उतावळा का वागतोय? आता तिला काय सांगणार की श्रुती मॅडमची मांडी पाहून मी एक्साईट झालो होतो ते... मग रुपालीने जबरदस्तीने माझ्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि श्रुती मॅडमना जोराने हाक मारली...

मग एका मिनीटांनी श्रुती मॅडम आत आली आणि आम्ही केलेले काम पाहू लागली... श्रुती मॅडम अश्या वागात होत्या की बाहेर जावून त्या नवऱ्याबरोबर तसे चाळे करून आल्या होत्या हे अजिबात कळत नव्हते... त्या आम्हाला काहितरी समजावून सांगत होत्या पण माझ्या नजरेसमोर तो बाहेरचाच सीन होता... मला श्रुती मॅडमचे किसींग करत असलेले ओठ दिसत होते, श्रवण सर दाबत असलेली छाती दिसत होती आणि तिची मांडी दिसत होती... नंतर त्या जे काही शिकवत होत्या त्याच्याकडे माझे लक्षच नव्हते... त्या दिवशी रात्री पहिली वेळ मी श्रुती मॅडमना आठवून मूठ मारली... त्यांच्या आठवणीने लंड गाळल्यावर मला किंचीत शरम वाटली पण ते फिलींग नंतर परत राहिले नाही...

दुसरी घटना म्हणजे... एके दिवशी श्रुती मॅडम आम्हाला कॉम्प्युटरवर काही शिकवत होत्या... रुपाली मध्ये बसली होती आणि श्रुती मॅडम तिच्या डाव्या हाताला तर मी तिच्या उजव्या हाताला बसलो होतो... श्रुती मॅडम रुपालीला स्क्रिनवर काही समजावून सांगत होत्या आणि मध्ये मध्ये त्या कि-बोर्डवरून काही काही टाईप करत होत्या. त्यामुळे त्या आणि रुपाली स्क्रिनच्या समोर बसल्या होत्या आणि मी थोडा बाजूला बसलो होतो... मी आळीपाळीने श्रुती मॅडम, रुपाली आणि कॉम्प्युटर स्क्रिनकडे पहात होतो...

श्रुती मॅडमना त्या दिवशी श्रवण सरांबरोबर चाळे करताना पाहून माझी त्यांच्याकडे पहाण्याची नजर बदलली होती तेव्हा आता जेव्हा मी श्रुती मॅडमकडे पहात होतो तेव्हा माझी नजर त्यांच्या अंगावरही जात होती... मी किंचीत बाजूला आणि मागे बसलेलो असल्याने माझी नजर कोठे आहे हे श्रुती मॅडमना लगेच कळणार नव्हते की रुपालीच्या लक्षात येणार नव्हते. त्याचा फायदा घेत मी श्रुती मॅडमच्या अंगावरून नजर फिरवत होतो...

श्रुती मॅडमने त्या दिवशी एक स्लिव्हलेस टॉप आणि स्कर्ट घातला होता... त्या टॉपचा गळा खोल नव्हता पण हाताचे स्लिव्हलेस होल थोडे मोठे होते... तेव्हा जेव्हा त्या पुढे वाकून हात पुढे करून कि-बोर्डवर काही टाईप करायला जायच्या तेव्हा त्या स्लिव्हलेस होलमधून त्यांच्या व्हाईट ब्रेसीयरमध्ये कासलेला उभारांचा भाग दिसायचा... कधी जेव्हा त्या क्रिनवर बोट ठेवून दाखवताना हात वर करायच्या तेव्हा हाताच्या होल मधून त्यांच्या उभाराचा 'गोळा' मला दिसायचा...

नॉर्मली असा टॉप त्यांनी कधी घातला तर ब्रेसीयरच्या वर स्लिप घातलेली असायची पण त्यादिवशी त्यांनी स्लिप घातलेली नव्हती तेव्हा त्यांची ब्रेसीयर दिसत होती. आणि आम्ही आता त्यांचे चांगले मित्र झालेलो असल्याने आमच्यासमोर त्या कपड्याच्या बाबतीत थोड्या केअरलेस झाल्या होत्या. त्याचा फायदा मला मिळत होता आणि मला त्यांच्या केअरलेस कपड्यामधून त्यांच्या आतल्या 'नजाऱ्याचे' दर्शन मिळत होते...

जे मला दिसत होते ते रुपालीला दिसत होते की नाही कोणास ठाऊक पण नॉर्मली तिच्या जर ते लक्षात आले असते तर तिने सुचकपणे माझ्याकडे पाहिले असते... ज्या अर्थी तिने माझ्याकडे पाहिले नव्हते म्हणजे तिच्या ते लक्षात आले नव्हते. श्रुती मॅडमच्याही लक्षात येत नव्हते की मला त्यांच्या स्लिव्हलेस होलमधून त्यांचा उभार दिसत आहे... जेव्हा जेव्हा त्या हात वर करून आम्हाला काही दाखवत होत्या तेव्हा तेव्हा मला त्यांची ब्रेसीयर आणि उभार दिसत होता आणि मी चोरून त्याकडे पहात होतो...

ह्या दोन घटनांनी माझ्या मनात श्रुती मॅडमबद्दल लैंगीक भावना जागृत झाल्या. खरे तर लैंगीक भावनेबाबत मी अतृप्त वगैरे अजिबात नव्हतो. रुपालीबरोबर माझे लैंगीक संबंध तेव्हापासूनच होते आणि तिच्याकडून मी एकदम संतुष्ट होतो. पण शेवटी मी पुरुष होतो तेव्हा श्रुती मॅडमसारख्या सुंदर आणि सेक्सी स्त्रीचे आकर्षण मला वाटणे सहाजिकच होते. अर्थात रुपाली माझी गर्लफ्रेंड असल्याने मी श्रुती मॅडमबद्दलचे आकर्षण कधी तिला किंवा श्रुती मॅडमला जाणवू दिले नाही पण श्रुती मॅडमचे मला आकर्षण वाटायचे हे सत्य होते...

यथावकाश आमचे ट्रेनींग संपले पण आम्ही श्रुती मॅडमच्या घरी जाणे सोडले नाही. आम्ही तिच्याकडे इतरही काही सॉफ्टवेअरचे ट्रेनींग घेत राहिलो. ट्रेनींग व्यतिरीक्त इतरही वेळी आम्ही त्यांच्या घरी जायचो व गप्पा वगैरे मारायचो. अनेकदा आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जात असू किंवा सिनेमा, नाटक पहायला जात असे. श्रवण सर थोडे सिरियस टाईप व्यक्ती होते तेव्हा सहसा ते आमच्यात जास्त मिक्स होत नसत. ते ऑफीसच्या कामामध्ये जास्त इनवॉल्व असल्याने कित्येकदा ते आमच्यात नसत. तेव्हा मी, रुपाली आणि श्रुती मॅडम असे त्रिकुट धमाल करत असू. श्रुती मॅडमना आमची कंपनी आवडायची आणि आम्हालाही त्यांची कंपनी आवडायची.

साधारण २ महिन्यानंतर श्रवणसरांनी आमच्या कंपनीतला जॉब सोडला आणि ते दुसऱ्या कंपनीत जॉब करू लागले. ते जरी कंपनी सोडून गेले तरी आमचे त्यांच्याशी आणि श्रुती मॅडमशी कॉन्टॅक्ट होते. मध्ये एकदा २/३ महिन्याकरीता मी आणि रुपाली ऑफीसच्या कामामध्ये फारच बिझी झालो. त्या काळात आम्हाला श्रुती मॅडमशी काही कॉन्टॅक्टही ठेवता आले नाही. साधारण तीन महिन्यानंतर आम्हाला जेव्हा फुरसत मिळाली तेव्हा आम्ही श्रुती मॅडमच्या घरी फोन केला. तर फोन कोणी उचलला नाही. आम्ही ३/४ दिवस ट्राय करत होतो पण फोन कोणी उचलत नव्हते.

आम्ही श्रवण सरांच्या नवीन कंपनीत फोन लावून त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळी ते ऑफीसमध्ये नाहीत असे उत्तर आम्हाला मिळाले. त्या काळात मोबाईल आलेले नव्हते तेव्हा लॅन्डलाईन फोनवरच कॉन्टॅक्ट करावा लागत असे. शेवटी रुपाली आणि मी श्रुती मॅडम रहात होत्या त्या घरी गेलो तर ते घर बंद होते. आम्ही बाजुच्यांकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितले की ते घर खाली करून श्रुती आणि श्रवण दुसरीकडे रहायला गेले होते. मग आम्ही श्रुती मॅडमच्या नातेवाईकांकडे चौकशी करून तिचा फोन नंबर मिळवला आणि आम्ही तिला कॉन्टॅक्ट केले...

जवळ जवळ चार महिन्यानंतर आमचे श्रुती मॅडमबरोबर कॉन्टॅक्ट झाले आणि त्यांचा आवाज आमच्या कानी पडला. त्यांनी आम्हाला त्यांच्या नवीन घराचा पत्ता दिला आणि घरी भेटायला बोलावले. एके दिवशी संध्याकाळी आम्ही अंधेरीमध्ये असलेल्या त्यांच्या नवीन घरी गेलो. मग त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्याने आम्हाला धक्काच बसला!!

श्रवण सर आमच्या कंपनीतील जॉब सोडून जेव्हा दुसऱ्या कंपनीत जॉब करू लागले त्यानंतर त्यांनी ते आधीचे भाड्याचे घर सोडले आणि ते आपल्या आईवडीलांच्या घरात रहायला गेले. काही दिवस सुरळीत गेले पण नंतर श्रुती मॅडमना त्यांचे सासू-सासरे जाच करू लागले. आधी आधी श्रवण सर श्रुती मॅडमची बाजू घ्यायचे पण नंतर नंतर ते आपल्या आईवडीलांचे ऐकू लागले आणि श्रुती मॅडमना ब्लेम करू लागले. श्रुती मॅडमचे क्लासेस आणि बाहेर जाणे तिच्या सासू-सासऱ्यांना आवडत नव्हते तेव्हा ते तिच्याशी भांडत असत व तिला घरीच रहाण्याबद्दल सांगत असत.

पण श्रुती मॅडमना काकूबाईसारखे घरात बसून घरकाम करण्यात रस नव्हता तेव्हा तिने त्यांचे म्हणणे कधी मान्य केले नाही... पण आता श्रवण सरही तिला घरी रहाण्याबद्दल फोर्स करू लागले. शेवटी त्यांच्यात भांडणे होवू लागली आणि त्याला कंटाळून श्रुती मॅडम वेगळी राहू लागली. ती वेगळी रहायला लागल्यानंतर तिच्या सासू-सासऱ्यांनी ह्या गोष्टीचा बाऊ करत श्रवण सरांना फितवले आणि श्रवण सरांना श्रुती मॅडमकडे डायवोर्स मागण्यास भाग पाडले... आणि श्रवणसरांनी श्रुती मॅडमकडून डायवोर्स घेण्यासाठी कोर्टात केस केली... डायवोर्स मिळण्यासाठी नवराबायकोने कमीत कमी सहा महिने वेगळे रहायला हवे म्हणून आता दोघेही तो पिरीयड संपायची वाट पहात होते...

श्रुती मॅडमची कहाणी ऐकून आम्ही दोघेही सुन्न झालो! खरे तर श्रवण सर आणि श्रुती मॅडमनी विरोधाला न जुमानता लव-मॅरेज केले होते आणि त्यांचे मॅरेज लाईफ यशस्वी होते तेव्हा ते दोघे रुपाली आणि माझा 'आदर्श' होते. पण त्यांच्याच आयुष्यात इतकी उलथापालथ झाली होती की त्याने आम्ही अचंबीत झालो होतो! आम्ही आमच्या परीने श्रुती मॅडमला धीर दिला व त्यांचे सांत्वन केले. त्या खरे धीराच्या होत्या आणि आयुष्यातील ह्या संकटाला खंबीरपणे तोंड देणाऱ्या होत्या. आम्हाला आश्चर्य श्रवण सरांचे वाटत होते. त्यांनी श्रुती मॅडमचा कसा विश्वासघात केला ते ऐकून आम्हाला त्यांचा तिरस्कार वाटू लागला...

मग श्रुती मॅडम एकट्याच वेगळ्या राहू लागलेल्या होत्या. अधून मधून रुपाली आणि मी त्यांना भेटत असू व त्यांची विचारपूस करत असू. जमलेच तर त्यांना छोट्या-मोठ्या कामात आम्ही मदत करत असू... डायवोर्सबद्दल त्यांची कोर्टात केस चालली होती तेव्हा श्रवणसरांच्या फायनान्सींग सिच्युएशनबद्दल ते जॉब करत असलेल्या कंपनीतून काही रेकॉर्ड श्रुती मॅडमला हवे होते. मी माझे कनेक्शन वापरून ते रेकॉर्ड श्रुती मॅडमना मिळवून दिले. त्याचा वापर करून श्रुती मॅडमने कोर्टात श्रवणसरांचे काही दावे खोटे सिद्ध केले आणि कोर्टातर्फे श्रवणसरांकडून नुकसानभरपाई मिळवली...

त्यांचा डायवोर्स झाला आणि श्रुती मॅडम घटस्फोटीत झाल्या. तसे तर नंतर ती आपल्या आईवडीलांकडे परत जावू शकत होती पण ती स्वतंत्र विचारसरणीची स्त्री होती तेव्हा तिला आईवडीलांवर बर्डन न टाकता स्वत:चे आयुष्य जगायचे होते. ती फ्रि-लान्सींग काम करत होती तेव्हा तिला फायनांशियल प्रॉब्लेम नव्हता. तेव्हा ती एकटी राहून जॉब करून आयुष्य जगू लागली... कधी लागलीच तर तिने आपल्या आईवडीलांची आणि आमच्यासारख्या खऱ्या मित्रमैत्रिणींची मदत घेतली पण शक्यतो तिने एकटीनेच धडाडी दाखवत आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत पुढे वाटचाल केली.

नंतर मग आम्ही आमच्या आयुष्यात व्यस्त झालो. यथावकाश मी आणि रुपालीनेही लग्न केले, आम्हाला मुले झाली... मला दुबईमध्ये एक चांगली ऑफर आली तेव्हा मी मुंबईतील जॉब सोडून दुबईमध्ये आलो आणि येथेच सेटल झालो. रुपाली मुलांच्या जवाबदारीतून जसा वेळ मिळेल तसे येथे जॉब करत होती नाहीतर घरीच रहायची. एकूण माझे लाईफ येथे दुबई मध्ये मजेत जात होते.

मध्यंतरी श्रुती मॅडमलाही कॅनडामधून एक जॉब ऑफर आली. तिची एक लांबची बहिण तेथे सेटल होती. करिअर ओरिएंटेड श्रुती मॅडमने ही संधी सोडली नाही आणि ती सुद्धा कॅनडाला गेली आणि तेथेच सेटल झाली. आमचे श्रुती मॅडमशी ई-मेल तर कधी फोन वगैरेने कॉन्टॅक्ट होते. एकमेकांची ख्याली-खुशाली आम्ही नियमितपणे एकमेकांना कळवत होतो. आमची प्रगती पाहून तिला नेहमी आनंद व्हायचा व ती नेहमी आमचे कौतुक करायची... तिची धडाडी पाहून आम्हाला तिचा अभिमान वाटायचा आणि आम्ही तिची तारीफ करायचो...

श्रुती मॅडम आता कॅनडामध्ये एका मोठ्या फर्ममध्ये जॉब करत होती आणि तेथे तिने स्वत:चे घरही घेतले होते. आम्ही एकदा तिला पुन्हा लग्न करण्याबद्दल विचारले होते तर तिने उत्तर दिले की 'सध्या मला त्याबाबत विचार करायला अजिबात वेळ नाही'. तिच्याबरोबरील चर्चेवरून आमच्या लक्षात आले होते की ती कोणा पुरुषाबरोबर जवळीक करायला घाबरत होती. न जाणो तो पुरुष श्रवणसारखा कृतघ्न निघाला तर पुन्हा प्रेमभंगाचे दु:ख तिला भोगावे लागेल म्हणून ती कोणा पुरुषाशी सलगी वाढवत नव्हती... आम्ही आमच्या परीने तिला पुन्हा लग्न करण्याबद्दल सांगत होतो पण ती त्याबाबत काही बोलत नसे...

कित्येकदा तिने आम्हाला कॅनडाला विजीट देवून तिच्याकडे रहायला बोलावले होते पण माझ्या कामामुळे आणि मुलांच्या शाळेमुळे आम्हाला ते जमत नव्हते. श्रुती मॅडम वर्षातून २/३ वेळा कॅनडावरून मुंबईला जायची. आम्ही प्रत्येकवेळी तिला सांगायचो जाताना किंवा येताना एकदा तरी दुबईमध्ये ट्रांजीट घेवून आमच्या घरी ये म्हणून. जमलेच तर दुबई शॉपींग फेस्टीवल पिरियडमध्ये येवून महिनाभर आमच्याकडे रहा म्हणून. ती येईन म्हणायची पण तिला त्यासाठी 'मुहूर्त' मिळत नव्हता. म्हणजे तिच्या कामामुळे तिला ते जमत नव्हते. पण शेवटी आता तिला दुबईला आमच्याकडे विजीट द्यायला जमत होते...

पण रुपाली नेमकी मुलांना घेवून मुंबईला सुटटीवर गेली होती. नॉर्मली आम्ही सगळे एकत्रच सुटटीवर जायचो पण रुपालीच्या एका मावसबहिणीचे लग्न होते तेव्हा ती महिनाभर आधी गेली होती. रुपालीला फोन करून मी जेव्हा हे सांगितले तेव्हा ती पण खटटू झाली. ती म्हणाली की श्रुती मॅडमला ट्रिप पुढे ढकलायला सांग पण मी तिला सांगितले की ती एका सेमीनारसाठी येतेय तेव्हा तिचे येणे पुढे ढकलता येणार नव्हते. श्रुती मॅडम दुबईमध्ये आमच्या घरी येणार आणि नेमकी तीच तेथे नसणार ह्याचे रुपालीला खूप वाईट वाटले.

मग दोन दिवसांनी श्रुती मॅडमने मला फ्लाईटचे डिटेल्स पाठवले. ४ दिवसानंतर ती संध्याकाळच्या फ्लाईटने येणार होती. मला पण ते बरेच होते कारण संध्याकाळी ऑफीसमधून एक तास लवकर निघून मी तिला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर जावू शकत होतो... श्रुती मॅडम येणार आणि जवळ जवळ ३ वर्षानी मी तिला भेटणार होतो म्हणून मी जाम खूष होतो... तिच्याबद्दल अजुनही मला 'आकर्षण' होते तेव्हा ती आता कशी दिसत असेल आणि तिची फिगर आता कशी झाली असेल याची मला फार उत्सुकता होती.

तसे तर मध्ये तिने एकदा दोनदा तिचे फोटो पाठवले होते पण त्यावरून तिच्या खऱ्या फिगरची कल्पना येत नव्हती... तेव्हा तिला रिअलमध्ये पहाण्यास मी उतावळा झालो होतो. आणि त्या उप्पर ती माझ्या घरात चार दिवस रहाणार होती. आम्ही दोघे एकटे असणार होतो. तेव्हा चान्स मिळाला तर मी तिच्याबरोबर 'काहितरी' करण्याच्या विचारात होतो. अर्थात! आमच्यात कधी सेक्स्युअल इंसिडेंट घडले नव्हते. जे काही घडले होते ते फक्त माझ्या मनात होते. तेव्हा तिच्यात आणि माझ्यात काही सेक्स्युअल एनकाऊंटर घडतील याची शक्यता काहीच नव्हती पण मी होप्स ठेवून होतो...

श्रुती मॅडम येणार त्या दिवशी मी तिला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर गेलो... फ्लाईट अर्धा तास ऊशीरा आले. बॅगेची ट्रॉली घेवून तिला समोरून येताना मी पाहिले आणि मी जाम खूष झालो! मी आनंदाने हात वर करून हलवला आणि तिचे लक्ष वेधून घेतले. मला पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि ती लगबगीने माझ्या दिशेने येवू लागली... मी झरकन श्रुती मॅडमचे वरपासून खालपर्यंत 'स्कॅनींग' केले...

श्रुती मॅडम माझ्या अपेक्षेप्रमाणे पहिल्यापेक्षा जास्त सुंदर आणि सेक्सी दिसत होती. तशी तिची अंगकाठी शेलाटी होती पण आता ती थोडी जाड झाली होती... तिने जीन्स आणि टि-शर्ट घातलेले होते तेव्हा तिच्या फिगरचा खरा अंदाज येत नव्हता पण ती बऱ्यापैकी 'भरीव' दिसत होती... तिच्या चेहऱ्यावरील ते चिरपरिचीत हास्य बाकी तसेच होते... हसताना तिच्या एका गालावर प्रिती झिंटा सारखी छोटी खळी पडायची आणि त्याने ती अजूनच मोहक दिसायची... एकूणच तिला पाहून मी जाम खूष झालो! तिच्याबरोबर चार दिवसाचा सहवास मिळणार ह्या विचाराने माझ्या मनात गुदगुल्या होवू लागल्या...