Faith Game

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"दिपाली... पळ जा... तुझ्या मम्मीला काय झालेत ते बघ... आणि त्यांना विचार त्या का रडताहेत... तसेच काही असेल तर मला बोलव..."

दिपाली पटकन आपल्या जागेवरून उठली आणि आत पळाली... मी हतबल होवून मागे सोफ्यावर रेलून बसलो आणि विचार करायला लागलो... काय झाले दिपालीच्या मम्मीला? ती माझ्या पप्पांचा फोटो पाहून का घाबरली? त्यांचा फोटो पाहून ती का रडायला लागली? रडता रडता त्यांनी माझ्या गालाला का हात लावला?? नंतर दिपालीच्या गालालाही का हात लावला?? पुढे काही न बोलता त्या रडत आत का पळाल्या?? त्या माझ्या वडिलांना ओळखत असतील का? त्यांना माझ्या वडिलांबद्दल काही माहिती असेल का? काय गौडबंगाल आहे हे? कसा खुलासा व्हायचा ह्याचा??...

विचार करून करून माझे डोके फिरायची वेळ आली!... दिपालीची मम्मी आत पळाली होती आणि दिपालीही आत गेली होती... आता जोपर्यंत दिपाली बाहेर येत नव्हती तोपर्यंत काही खुलासा होणार नव्हता... दिपालीही बराच वेळ बाहेर येत नव्हती... काय चालले होते आत कोणास ठाऊक??... आपणच आत जावून बघावे का?? कदाचीत तिच्या मम्मीची अवस्था पाहून दिपालीही रडत असावी... मम्मीची स्थिती पाहून तिला भानच राहिले नसेल की मला बोलवावे... कदाचीत आत त्या दोघींना माझी गरज असावी पण त्या मला बोलवू शकत नसतील... मलाच आत जावून पहायला पाहिजे...

असा विचार करून मी माझ्या जागेवरून उठलो आणि आत जायला पाऊल उचलले... तेवढ्यात दिपाली बाहेर आली... ती रडत होती आणि बाहेर आल्यावर ती सरळ माझ्याजवळ आली आणि माझ्या गळ्यात पडून रडायला लागली... मी तिला कवेत घेतले आणि तिचे तोंड वर करत तिला विचारू लागलो,

"दिपाली... काय झाले?... तुझी मम्मी कशी आहे??... ती ठिक आहे ना?... काही झाले का?... तू का रडतेस?... अग बोल ना... मला सांग ना काहितरी... माझे तर डोकेच फिरत चालले आहे... प्लिज बोल ना..."

माझ्या बोलण्याने दिपाली भानावर आली आणि तिने आपले रडणे कमी केले... मी तिला कवेत घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला दिलासा देत होतो... हळु हळू तिचे रडणे कमी कमी होत गेले... मी तिला मिठीत धरून मागे सोफ्यावर बसलो... ती मला बिलगून माझ्या बाजुला बसली आणि हुंदके देत राहिली... मी तिचा चेहरा वर करत तिला विचारले,

"दिपाली बोल ना... नुसतीच रडतेस काय?... मला सांग ना काय झाले ते?... तुझी मम्मी ठिक आहे ना?"

"हं... हो!... मम्मी ठिक आहे... आय मीन... ती अजूनही रडतेय... पण ठिक आहे ती..." दिपालीने कसेबसे म्हटले.

"पण का रडतेय ती?... माझ्या पप्पांचा फोटो पाहूनच त्यांना काहितरी झाले... काय झाले त्यांना? तू विचारलेस का त्यांना??" मी अधीरपणे तिला विचारले.

"हो विचारले... पण ती काही सांगतच नाही... नुसती म्हणतेय..." दिपाली हुंदके देत देत म्हणाली.

"काय म्हणतेय??" मी उत्सुकतेने विचारले.

"तुमचे लग्न होणे शक्य नाही... तुम्ही दोघे एकमेकांना विसरून जा..." दिपाली रडत रडत म्हणाली...

"काय??... काय म्हणालीस??" ते ऐकून मला धक्काच बसला!

"हो!... मम्मी हेच म्हणतेय... तुमचे लग्न होवू शकत नाही... ते कदापी शक्य नाही..."

"अग पण का?... काय प्रॉब्लेम आहे??... का होवू शकत नाही??... तू विचारले नाहीस का त्यांना??" मी आश्चर्याने वेडापिसा होत तिला विचारले.

"मी विचारले... पण ती काही सांगायलाच तयार नाही... नुसतेच म्हणतेय... तुम्ही एकमेकांना विसरून जा... तुमचे लग्न होवू शकत नाही... तू त्याचा नाद सोड... वगैरे वगैरे..." दिपाली स्फुंदत स्फुंदत म्हणाली.

"अग पण का म्हणून?... का आपण एकमेकांना विसरायचे? का आपले लग्न होवू शकत नाही?? तू जरा खडसावून विचारायचेस ना..." मी वैतागून म्हटले.

"विचारले... मी अगदी खोदून खोदून विचारले... पण ती कारणच देत नाही... उलट आणि मला विचारत होती... तुमचे प्रेमप्रकरण किती पुढे गेले आहे?... तुम्ही कितपत एकमेकांच्या जवळ आला आहात?... तुम्ही वेगळ्या भावनेने एकमेकांना 'स्पर्श' तर केला नाही आहे ना?... तुमच्यात काही 'नाजूक' संबंध तर झाले नाही आहेत ना?... वगैरे..." दिपालीने थोडे सावरत सांगितले.

"असे का एकदम तिने विचारले? आणि मग तू काय सांगितलेस? तू सांगितलेस का आपण किती 'जवळ' आलो आहोत ते?" मी म्हटले.

"हॅऽऽऽ... ते मी कसे काय सांगणार?... मी काय इतकी निर्लज्ज आहे का?... मी तिला खोटेच सांगितले... आम्ही फक्त मनाने एकमेकांच्या जवळ आलो आहे आणि अजूनतरी आम्ही एकमेकांना वेगळ्या तऱ्हेने स्पर्श केलेला नाही..." दिपाली म्हणाली.

"मग काय म्हणाली ती? पुढे काही बोलली का?" मी उत्सुकतेने विचारले.

"हो... म्हणाली... बरे झाले!... तू अजिबात त्याच्याशी जवळीक करू नकोस... त्याचा नाद सोडून दे... त्याला तुला विसरायला लाव... तू तो जॉब सोडून दे... म्हणजे त्याच्याशी काही संबंध रहायचा प्रश्नच रहाणार नाही..." दिपालीने सांगितले.

"काय??... आता हे काय भलतेच??..." मी चक्रावून म्हटले, "तुझी मम्मी चक्क आपल्याला दूर करत आहे... आपल्याला संबंध तोडायला सांगतेय... बरे कारण विचारले तर सांगत पण नाही... हे तर काही अजबच आहे!..." मी आश्चर्याने म्हटले.

"बघ ना... सगळे विचीत्रच आहे... मम्मीला वेडबीड तर लागले नाही ना?..." दिपालीने वैतागत म्हटले.

"नाही... म्हणजे... त्या तसे सांगताहेत तर त्याला काहीतरी कारण असावे... खास करून ते कारण माझ्या पप्पांशी रिलेटेड आहे... पण ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत असे कसे आपण त्यांचे म्हणणे ऐकायचे?..." मी विचार करत म्हणालो.

"हो!... मी पण तेच म्हणतेय... तिने सांगावे ना... का आम्ही एकमेकांना विसरावे?... त्या मागचे कारण काय..." दिपालीही विचारात पडत म्हणाली.

"दॅट्स ईट!... दिपाली... धिस ईज टू मच!... आपण त्यांना जावून विचारूया... त्यांना आपल्याला सांगायलाच पाहिजे... आफ्टर ऑल!... वुई हॅव राईट्स टू नो दॅट... एकदा कारण कळले की मग आपण ठरवू काय करायचे ते..." मी ठामपणे म्हटले आणि तिला माझ्यापासून दूर केले...

दिपाली उभी राहिली आणि मी पण उभा राहिलो... मी तिचा हात पकडला आणि तिला ओढत पुढे चालत म्हणालो,

"लेट्स गो टू युवर मम्मा... आपल्याला त्यांच्याशी बोलायलाच हव... आय ॲम सॉरी! त्यांची अवस्था ठिक नसेल... पण आपली पण हालत ठिक नाही... वुई हॅव टू डिस्टर्ब हर..."

असे बोलून मी दिपालीला पुढे केले आणि तिच्या मागे चालत चालत आम्ही आत गेलो... तिच्या मम्मीच्या रूमच्या बाहेर आम्ही एक क्षण थांबलो आणि आम्ही एकमेकांकडे पाहिले... आम्ही नजरेनेच एकमेकांना दिलासा दिला. मग दिपालीने तिच्या मम्मीच्या रूमच्या दरवाज्यावर टकटक केली आणि 'मम्मी' करत ती दरवाजा उघडून आत शिरली... ती थोडी पुढे गेली आणि आत बेडवर पडलेल्या तिच्या मम्मीला म्हणाली,

"दिनेशला तुझ्याशी बोलायचेय, मम्मी!" असे बोलून तिने माझ्याकडे पाहिले आणि आत यायचा इशारा केला...

मी रूममध्ये शिरलो आणि दिपालीची मम्मी बेडवर पडली होती ती उठून बसली.. रडून रडून तिचे डोळे लाल लाल झाले होते. त्यांची अवस्था एकदम खराब दिसत होती... पण त्यांच्या त्या अवस्थेत त्यांच्याशी बोलल्याशिवाय आम्हाला काही पर्याय नव्हता... बेडच्या जवळ एक चेअर होती त्यावर जावून मी बसलो... दिपाली बेडवर आपल्या मम्मीच्या जवळ बसली... मी त्यांच्या मम्मीकडे पाहिले आणि त्यांनी अगतिकपणे माझ्याकडे पाहिले... त्यांच्या डोळ्यात मला भिती, दु:ख, लाचारी, अगतिकता असे सगळे भाव दिसत होते आणि ते पाहून मला त्यांची किव आली! तरीही मी धीर करत त्यांना म्हटले,

"मम्मी!... सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय... तुम्ही खूपच डिस्टर्ब आहात हे मला दिसतेय... पण काही गोष्टींचा खुलासा तुम्ही केलात तर खूप बरे होईल... आय मीन... आम्ही नंतरही तुम्हाला विचारू शकलो असतो पण ते आत्ताच जाणून घेणे आम्हाला गरजेचे आहे... आय होप! तुम्ही सांगाल... मग मी विचारू का?"

"बेटा... तू काय विचारणार आहेस हे मला माहीत आहे...," दिपालीची मम्मी आपल्या डोळ्यातून ओघळणारे पाणी पुसत पुढे म्हणाली, "पण खरच तू ते मला विचारू नयेस... आणि मी तुला ते सांगू नये... ह्यातच तुमचे भले आहे..."

"तुम्ही असे म्हटले तर बोलणेच खुंटले...," मी उदास होत म्हटले, "पण तुम्ही का आम्हाला एकमेकांपासून दूर व्हायला सांगत आहात? त्याच्या मागचे कारण कळले तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू..."

"मी म्हटले ना... तुम्ही विचारू नका... आणि मी सांगत नाही... तुम्ही फक्त इतकेच लक्षात घ्या... तुमच्या दोघांचे लग्न होणे शक्य नाही!... तेव्हा तुम्ही एकमेकांना विसरून जा आणि आपापले मार्ग वेगळे करा..." दिपालीच्या मम्मीने ओघळत्या डोळ्यांनी म्हटले.

"अहो पण..." मी पुढे काही बोलायला गेलो तर त्यांनी मला मध्येच थांबवत म्हटले,

"प्लिज बेटा!... माझे जरा ऐक... मी जेव्हा तुम्हाला असे सांगतेय... तर त्याला खरोखरच तसे कारण आहे... फक्त ते कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही... तेव्हा माझे ऐका आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या..."

"नाही मम्मी... तुला आम्हाला सांगायलाच पाहिजे...," अचानक दिपाली मध्ये बोलत म्हणाली, "काहीही कारण असेल... आम्ही ऐकायला तयार आहोत... असे काय कारण आहे जे तू आम्हाला सांगू शकत नाही??"

"दिपाली बाळा... उगाच हटट करू नकोस!... माझे ऐक जरा..." दिपालीची मम्मी तिला समजावत म्हणाली.

"नाही, मम्मी... तुझे मी नेहमीच ऐकत आले आहे... पण ह्या बाबतीत मी ऐकणार नाही... हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे... तुला कारण सांगितलेच पाहिजे... मग ते काहीही असेल..." दिपाली पुन्हा निक्षून म्हणाली आणि तिने माझ्याकडे पाहिले. मी नजरेनेच तिला अनुमोदन दिले.

"बाळांनो... तुम्ही का माझे ऐकत नाही आहात?... मी सांगतेय ना तुम्हाला... असे काही कारण आहे की तुम्हाला सांगता नाही येणार... फक्त एवढेच लक्षात ठेवा... तुमचे लग्न होणे कदापी शक्य नाही..."

"मग ठिक आहे, मम्मी!... तुला जर सांगायचे नसेल तर मग आम्हीही तुझे ऐकणार नाही... जोपर्यंत तू आम्हाला त्या मागचे कारण सांगत नाहीस तोपर्यंत आम्ही एकमेकांशी संबंध तोडणार नाही... असे बोलून दिपालीने माझ्याकडे निग्रहाने पाहिले.

"हो, मम्मी... मीही दिपालीशी सहमत आहे... माझे पण हेच उत्तर आहे... एकतर तुम्ही आम्हाला खरे काय ते कारण सांगा नाहीतर आम्ही तुमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू..." मी दिपालीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटले.

मग पुढे काही क्षण दिपालीची मम्मी आम्हाला समजावून सांगू लागली की कारण माहिती करून घ्यायच्या भानगडीत पडू नका आणि आम्ही तिचे न ऐकता तिला कारण सांगच म्हणून प्रेशर करत होतो... शेवटी मी किंचीत वैतागत उठलो आणि त्यांना निर्वाणीचे सांगितले,

"हे बघा, मम्मी... तुम्हाला कारण सांगायचे नाही तर सांगू नका... पण मग तुमचे म्हणणे ऐकायची सक्ती आमच्यावर करू नका... आम्ही एकमेकांशी संबंध ठेवणार म्हणजे ठेवणार... हा आमचा फायनल निर्णय आहे आणि आम्ही तो बदलणार नाही... मी येतो आता... नमस्कार!..." असे बोलून मी त्यांच्याकडे पाठ फिरवून चालायला लागलो...

"हो, मम्मी... माझा पण हाच फायनल निर्णय आहे... मी दिनेशला बाहेर सोडून येते..." असे बोलून दिपालीही माझ्या मागे निघाली...

आम्ही दोघेही तिच्या बेडरूमच्या दरवाजा जवळ पोहचलो आणि आम्हाला तिच्या मम्मीची हाक ऐकू आली...

"थांबा! जावू नका!"

आम्ही जागच्या जागी थबकलो आणि वळून त्यांच्याकडे पहायला लागलो... त्यांच्या डोळ्यातून अजुनही अश्रूं वहात होते... त्यांनी नुसती मान हलवून आम्हाला जवळ यायचा इशारा केला... आम्ही परत फिरलो आणि त्यांच्या जवळ गेलो... दिपाली परत पहिल्यासारखी तिच्या मम्मीजवळ बसली आणि मी त्यांच्या समोरील चेअरवर पहिल्यासारखा बसलो... काही क्षण त्या खाली मान घालून रडत राहिल्या आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब केले नाही... नंतर मग त्यांनीच स्वत:ला सावरले आणि आपले डोळे पुसत त्यांनी वर पाहिले... माझ्याकडे पाहून त्या अगतीकपणे म्हणाल्या,

"तुम्ही जर मला कारण सांगायला असे फोर्स करत आहात तर मी तुम्हाला ते सांगते... पण तुम्ही मला वचन द्या की कारण कळल्यानंतर तुम्ही मी सांगेन ते ऐकाल... "

"ते कारण काय आहे त्यावर डिपेन्ड असेल... तुम्ही आधी कारण सांगा तर खर..." मी ठामपणे म्हणालो.

"नाही!.. आधी मला वचन द्या... तरच मी सांगेन..." दिपालीची मम्मीही हटट करू लागली.

"नाही!... जोपर्यंत कारण कळत नाही तोपर्यंत आम्ही वचन देणार नाही... कारण तसेच योग्य असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला वचन देवू... मी आधी वचन देत नाही पण शब्द देतो... मी माझा शब्द फिरवणार नाही..." मी निश्चयाने म्हणालो.

त्यावर दिपालीची मम्मी थोडी विचारात पडली... वचन न घेता ह्यांना सांगावे की नाही ह्याचा बहुतेक ती विचार करत होती... शेवटी तिने मनाचा हिय्या केला आणि ती म्हणाली,

"ठिक आहे!... मग सांगते मी कारण... पण तुम्ही आपला शब्द नाही फिरवायचा..."

"हो!... मी शब्द देतो..." मी म्हणालो.

त्यानंतर परत दिपालीची मम्मी दोन मिनीटे गप्प बसून राहिली... ती काही बोलत नव्हती आणि आम्ही काही विचारत नव्हतो... ती बहुतेक काय आणि कसे सांगावे ह्या विवंचनेत होती... पण शेवटी ती बोललीच,

"मी कारण सांगितल्यानंतर तुमच्यावर 'बॉम्ब' पडणार आहे!... धरणीकंप झाल्यासारखे तुम्हाला वाटेल... मी तुम्हाला हे सांगितले नसते तर बरे झाले असते असे तुम्हाला वाटेल... आपण उगाच कारण जाणून घ्यायची जिद्द केली असे तुम्हाला वाटेल... तेव्हा अजून एकदा शेवटचा विचार करा..." ती आम्हा दोघांकडे बघून म्हणाली.

"मम्मी... तुम्ही बिनधास्त सांगा... आमची काहीही ऐकायची तयारी आहे..." असे मी ठामपणे बोलून दिपालीकडे पाहिले आणि तिनेही होकारार्थी मान हलवली. खरे तर ती मनातून हादरलेली वाटत होती...

"ठिक आहे... मग लक्ष देवून ऐका... तुमच्या दोघांचे लग्न होवू शकत नाही... कारण... कारण..." पण पुढे सांगायची त्यांची डेअरींग झाली नाही...

"कारण काय, मम्मी??... सांगा एकदाचे..." मी शेवटी किंचीत वैतागत म्हटले.

"कारण तुम्ही दोघे 'भाऊ-बहिण' आहात!!..."

त्या काय बोलल्या ते एक क्षण आम्हाला कळलेच नाही... त्या वाक्याचा इको साऊंड जळत्या तेलासारखा आमच्या कानात शिरला आणि मेंदूकडे पोहचला... 'कारण तुम्ही दोघे 'भाऊ-बहिण' आहात...' मेंदुला त्या वाक्याचा अर्थ कळला आणि खरोखर आमच्या मेंदुमध्ये भुकंप झाला!! धरणीकंप झाल्यासारखे आम्हाला वाटले आणि आमच्या मनातील सगळे विचार त्या भुकंपात उध्वस्त झाल्यासारखे आम्हाला वाटायला लागले... कोणीतरी आम्हाला एका उंच टेकटीच्या टोकावर नेवून तेथून खाली ढकलून दिल्यासारखे आम्हाला वाटले! दोन मिनीटे तर कोणालाच काही बोलायची शुद्ध नव्हती... स्टॅच्यु केल्यासारखे आम्ही तिघेही एकदम स्तब्ध बसून होतो... काही हालचाल करायचे बळही अंगात नसल्यासारखे वाटत होते...

'मी आणि दिपाली भाऊ-बहिण... आम्ही भाऊ-बहिण??... कसे काय??... कसे शक्य आहे ते??... भाऊ-बहिण म्हणजे एकाच आई-वडीलांची अपत्य ना?... मग मी आणि दिपाली एकाच आई-वडीलांची मुलं आहोत??... कोठल्या आई-वडिलांची??? तिच्या का माझ्या??... का अजून कोणाच्या??... आम्ही सख्खे भाऊ-बहिण आहोत की सावत्र??... ओह गॉड!... काय चालले आहे हे??... हे काय ऐकतोय मी??...'

अश्या विचारांचे चक्रिवादळ माझ्या डोक्यात चालले होते... दिपालीच्या डोक्यातही असेच काही विचार असणार ह्याची मला खात्री होती... दिपाली मघाशी म्हणाली ते खरे असावे काय? तिच्या मम्मीला वेड तर लागले नाही ना?... बहुतेक तसेच असावे... त्याशिवाय असे काही स्टुपीड स्टेटमेंट ती करणार नाही... त्या सिरीयस परिस्थितीतही मला हसूं आले आणि मी किंचीत हसत उपहासाने त्यांना म्हणालो,

"मम्मी... तुम्हाला मी पसंत नसेल तर तसे सरळ सांगा... पण असे काहीतरी जगावेगळे सांगून आमची मस्करी करू नका... उगाच काहितरी सांगून आम्हाला भरकटवू नका!..."

"मी तुम्हाला म्हटले होते... जे कारण मी सांगेन ते बॉम्ब फुटल्यासारखे असेल... तुमचा त्यावर विश्वास बसणारच नाही... म्हणून मी सांगत नव्हते... नियतीचा खेळ एकदम निराळा आहे... नियती तुमच्याबरोबर क्रूर खेळ खेळली आहे!..." त्या विषन्नपणे म्हणाल्या.

"अहो पण हे कसे शक्य आहे?... आम्ही दोघे भाऊ-बहिण कसे असू शकतो??... आम्ही सावत्र भाऊ-बहिण आहे असे तुम्हाला

म्हणायचे आहे का??" मी संभ्रमात विचारले.

"नाही!... तुम्ही 'सख्खे' भाऊ-बहिण आहात!..." त्यांनी शांतपणे म्हटले...

"सख्खे?... कसे शक्य आहे ते??... माझे सख्खे आई-वडिल काय मला माहीत नाहीत का? ते तिकडे नागपुरला आहेत ते माझे आई-वडिल नाहीत असे तुम्हाला म्हणायचेय काय??" मी अचंब्याने विचारले...

"ते वडिल तुझेच आहेत... पण आई तुझी नाही... तुझी आई मी आहे..." दिपालीच्या आईने पुन्हा अजून एक बॉम्ब टाकला!

"तुम्ही माझ्या आई आहात?... मग ती कोण आहे? आणि मी तिच्या पोटी जन्म कसा काय घेतला?" मी गोंधळून विचारले.

"तू तिच्या पोटी जन्मलेला नाहीस... तू माझ्या पोटी जन्मलेला आहेस..." त्या म्हणाल्या.

"अहो पण मी तुमच्या पोटी कसा जन्म घेईन?... आणि घेतला असे मानले तर मग मी तिकडे कसा गेलो? आणि मग माझे वडिल कोण? ते तिकडे आहेत ते की इकडे असलेले दिपालीचे वडिल माझे वडिल आहेत??" मी वेड लागल्यासारखे प्रश्न विचारू लागलो...

"दिपालीचे वडिल तिचे वडिल आहेत पण तुझे नाही... ते तिकडे असलेले तुझे वडिल तुझेच आहेत पण दिपालीचे नाही..." त्या समजवायला लागल्या...

"मला काहीच कळत नाही... ते माझे वडिल आहेत... हे दिपालीचे वडिल आहेत... मग आम्ही दोघे भाऊ-बहिण कसे??" मी किंचीत वैतागत विचारले.

"अरे... मला असे म्हणायचे आहे की... तुमच्या दोघांचे वडिल वेगवेगळे आहेत... पण आई मीच आहे... तुम्ही दोघांनी माझ्याच पोटी जन्म घेतला आहे..." दिपालीची मम्मी शांतपणे म्हणाली...

"मम्मी... तू काय सांगतेय ते तर माझ्या डोक्यावरून चालले आहे...," इतका वेळ गप्प असलेली दिपाली पण वैतागून म्हणाली, "तु आम्हाला जरा व्यवस्थित समजावून सांगा ना... तू दिनेशच्या वडीलांना ओळखतेस काय? त्यांच्याबरोबर तुझे काही संबंध आहेत का?... जरा सविस्तर सांगशील का?"

"हश्शऽऽऽ... ठिक आहे!... सांगते मी तुम्हाला समजावून... अगदी पहिल्यापासून... नियतीचा हा खेळ फार वर्षापुर्वी चालू झाला होता..." असे बोलून दिपालीची मम्मी आम्हाला तिची कहाणी थोडक्यात सांगायला लागली...

******

दिपालीची मम्मी, म्हणजे प्रिया... त्यावेळी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होती... २० वर्षाची प्रिया थोडी अल्लड होती... त्यांच्या कॉलेजमध्येच माझे वडील, म्हणजे प्रमोदही शिकत होते... २२ वर्षाचे प्रमोद उंचेपुरे आणि हॅन्डसम होते... जरी ते प्रियाला सिनीयर होते तरी एकाच कॉलेजमध्ये असल्याने त्यांची भेट होत होती... भेटीचे रुपांतर ओळखीत झाले आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही... पुढची २ वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले... आपापला स्टडी सांभाळून ते आयुष्याची इतर मजाही मनमुरादपणे लुटत होते...

प्रेमाच्या ह्या खेळात ते एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात लग्ना आधीच शारिरीक संबंध प्रस्थापित झाले... दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या तेव्हा प्रियाला आपले सर्वस्व प्रमोदच्या स्वाधीन करण्यात काही गैर वाटले नाही... प्रमोदही मनापासून तिच्यावर प्रेम करत होते आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते... पण ते शिकत होते आणि शिकण्यासाठीच नागपुरहून पुण्याला आले होते... एकदा शिक्षण झाले की ते प्रियाशी लगेच लग्न करून तिला नागपुरला नेणार होते...

पण काहितरी गडबड झाली!... त्यांची 'प्रिकॉशन' घेण्यात थोडी चूक झाली आणि त्यांना कळले की प्रिया 'गरोदर' राहिली आहे... प्रियाचा पिरीयड थोडा इरिग्युलर होता तेव्हा दोन अडीच महिने तिला पिरीयड आला नाही तरी तिने त्याची काळजी केली नाही... जेव्हा चेकप केले तेव्हा तिला तिसरा महिना लागला होता... ते कळल्यावर दोघांचेही धाबे दणाणले! काय करावे हे त्यांना सुचेना... प्रमोद तिला ॲबॉरशन करायला सांगत होते पण प्रियाला ते मान्य नव्हते. शेवटी त्यांच्याकडे एकच मार्ग होता की लग्न करणे...

प्रियाने आपल्या घरी आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले तेव्हा अपेक्षेप्रमाणे तिला घरातून विरोध झाला... पण जेव्हा तिने आपल्या प्रेग्नंसीबद्दल आपल्या आई-वडीलांना सांगितले तेव्हा त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता आणि त्यांना तिला प्रमोदबरोबर लग्न करायची परवानगी द्यावीच लागली... प्रमोदनेही आपल्या गावी आपल्या आईवडिलांना त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले. त्यांच्या घरातून विरोध नव्हता तेव्हा त्यांनी प्रमोद-प्रियाचे लग्न लावून दिले... शिकायच्या वयात दोघे लग्नाच्या बेडीत अडकले आणि त्यांचा संसार चालू झाला... दोघेही अजून शिकत होते तेव्हा पुण्यात एक घर भाड्याने घेवून त्यात ते रहात होते...

यथावकाश नऊ महिने पुर्ण झाल्यावर 'दिनेश'चा जन्म झाला... आपला स्टडी सांभाळून लहानग्या दिनेशला सांभाळायची कसरत प्रिया कशीबशी पार पाडत होती... त्यामुळे तिला प्रमोदकडे लक्ष द्यायला वेळ मिळेनासा झाला... हळु हळू त्या दोघांच्यात खटके उडू लागले... नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले होते आणि संसाराचे खरे चटके त्यांना बसायला लागले... त्यांना काही आर्थीक अडचण नव्हती पण त्यांचे एकमेकांशी वागण्यावरूनच खटके उडू लागले... छोट्या छोट्या कुरबुरीचे रुपांतर भांडणात व्हायला लागले आणि भांडणाची परिणिती शेवटी प्रमोदने प्रियाच्या अंगावर हात टाकून व्हायला लागली...

प्रिया-प्रमोदचा असलेला राजा-राणीचा संसार आता कलहगृह बनला होता... एकमेकांची वर्ष-दोन वर्षापुर्वीची जी गोष्ट आवडत होती ती आता आवडेनासी झाली... त्यांच्यातील भांडणे इतकी विकोपाला गेली की शेवटी 'घटस्फोटा'पर्यंत पाळी आली... प्रमोदने प्रियाच्या मागे घटस्फोटासाठी तगादा लावायला सुरुवात केली... ऐन तारुण्यात असलेली प्रिया दीड वर्षाचे मुल घेवून आपले पुढचे आयुष्य कसे काढणार होती हे तिचे तिलाच कळत नव्हते... शेवटी तिने आपल्या आई-वडीलांची मदत मागितली... सुरुवातीला त्यांनी तिला दोष दिला पण शेवटी आपलेच मूल म्हणून तिला पुन्हा पदरात घेतले...

यथावकाश घटस्फोटासाठी केस फाईल झाली आणि पुढच्या सहा महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला!... प्रियाच्या आई-वडीलांनी तिला एका अटीवर मदत केली होती की घटस्फोटात तिने मुलाचा ताबा सोडावा आणि मूल बापाच्या हवाली करावे... तो निर्णय तिला मान्य नव्हता पण तिच्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता... प्रमोदही आपल्या मुलाला प्रियाच्या स्वाधीन करण्यात राजी नव्हते... तेव्हा कोर्टात त्यांनी मुलाची कस्टडी मागितली आणि प्रियाच्या वकिलाने ऑलरेडी तिला मुलाला सांभाळण्यात असमर्थता सिद्ध केली होती... तेव्हा मुलाचा ताबा प्रमोदकडे गेला...

दोन वर्षाच्या दिनेशला घेवून प्रमोद आपल्या गावी नागपुरला निघून गेले... प्रियाला आपल्या हृदयाचाच एक भाग कोणी हिरावून नेल्यासारखे वाटले आणि काही महिने तिने फक्त रडण्यात आणि दिनेशची आठवण काढण्यात घालवले... हळु हळू ती स्वत:ला सावरत गेली... प्रमोद आणि दिनेश हे प्रकरण प्रियाच्या आयुष्यातून संपल्यानंतर सहा महिन्याने ती नॉर्मल झाली आणि आपले अर्धवट शिक्षण पुरे करू लागली... स्वत:ला सतत बिझी ठेवण्यासाठी ती साईड बाय साईड पार्ट-टाईम जॉब करायला लागली...

प्रमोदबरोबरील घटस्फोटानंतर एका वर्षातच प्रियाच्या आईवडिलांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले... प्रिया लग्नाला आधी तयार नव्हती पण आई-वडीलांच्या दबावापुढे तिचे काही चालले नाही... नवऱ्याकडच्यांना अर्थात प्रियाचे पहिले लग्न आणि घटस्फोटाबद्दल तिच्या आई-वडीलांनी काही कळू दिले नव्हते... मुलगा मुंबईचा होता आणि ती लग्नानंतर तिकडे रहाणार होती तेव्हा तिला आपल्या पुण्यातील आयुष्याच्या कटु-आठवणी सतावणार नव्हत्या... जड अंत:करणाने प्रिया लग्न करून मुंबईला आपल्या नवऱ्याच्या घरी निघून गेली... लग्नानंतरही ती फार क्वचितच पुण्याला आपल्या माहेरी येत होती...

यथावकाश प्रियाच्या दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरात तिला मुलगी झाली... तिच ही दिपाली!... तिचा दुसरा नवरा, म्हणजे दिपालीचे वडिल प्रेमळ होते आणि आपल्या प्रेमाच्या वर्षावात त्यांनी कधी प्रियाला कसली ऊणीव भासू दिली नाही... झाले गेले ते सगळे विसरून प्रिया आपल्या नवीन संसारात गुरफटून गेली... दिपालीचे वडिल आणि दिपाली हेच आपले आता सर्वस्व आहे हे सत्य तिने स्विकारले आणि आपल्या संसारात मग्न झाली... कधी कधी तिला आपला पहिला मुलगा दिनेशची आठवण यायची... तो कोठे आणि कसा असेल ह्याचा विचार तिच्या मनात यायचा आणि ती उदास व्हायची... पण नियतीचा खेळ तिने स्विकारला होता तेव्हा स्वत:ला ती सावरत असे...